
iran violent protests tehran death toll khamenei shooting order economic crisis 2026
Iran violent protests January 2026 : इराण (Iran) सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या जनक्षोभाचा सामना करत आहे. ७ जानेवारीपासून सुरू झालेल्या देशव्यापी निदर्शनांनी आता हिंसक वळण घेतले असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. राजधानी तेहरानसह इराणच्या २७ प्रांतांमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि ‘टाईम’ मासिकाने उद्धृत केलेल्या दाव्यांनुसार, सरकारच्या दडपशाहीत आतापर्यंत २०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. संपूर्ण इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले असून, जगापासून हा हिंसाचार लपवण्याचा प्रयत्न खमेनी सरकार करत आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी या निदर्शनांसाठी थेट अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. त्यांनी सुरक्षा दलांना ‘दंगलखोरांना धडा शिकवा’ असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशानंतर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) आणि बासिज (Basij) या निमलष्करी दलांनी निदर्शकांवर थेट गोळीबार सुरू केला आहे. तेहरानमधील अनेक विद्यापीठ परिसरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये मृतदेहांचे खच पडले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: ‘आम्ही इशारा दिला होता!’ रशियाने युक्रेनवर डागलं ताशी 13,000 किमी वेगाचं क्षेपणास्त्र; युरोप युद्धाच्या छायेत
या आंदोलनाची ठिणगी आर्थिक कारणांमुळे पडली आहे. २०२५ मध्ये इराण आणि इस्रायल यांच्यात झालेल्या १२ दिवसांच्या युद्धामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. अमेरिकेने ट्रम्प प्रशासनांतर्गत लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे इराणचे तेल कुणीही विकत घेईनासे झाले आहे. परिणामी, इराणी चलन ‘रियाल’ इतिहासातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले असून, १ डॉलरची किंमत १४ लाख रियालच्या पार गेली आहे. अन्नाचे दर ४२ टक्क्यांहून अधिक वाढल्याने सर्वसामान्यांकडे आता गमावण्यासारखे काहीही उरलेले नाही.
🚨 IRAN LEADER FIRES BACK — PROTESTS TURN DEADLY Ali Khamenei delivered an urgent speech amid nationwide unrest driven by economic collapse — a crashing rial, fuel shortages, 42 reported deaths, and a state-imposed internet shutdown. He labeled the protests “terrorist actions,”… pic.twitter.com/hpLuOlrtwH — Naeem Aslam (@NaeemAslam23) January 9, 2026
credit : social media and Twitter
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. “शांततापूर्ण निदर्शकांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये अमेरिकन लष्करी विमानांच्या वाढत्या हालचाली आणि ‘नाईट स्टॉकर्स’ या विशेष पथकाची उपस्थिती यामुळे इराणमध्ये अमेरिका लष्करी हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून, येत्या काही दिवसांत इराणमध्ये सत्तापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Greenland Strategy: अंतराळातून हल्ला झाल्यास ‘ग्रीनलँड’ बनेल ढाल; 75 वर्षांपासून अमेरिकन सैन्य गोठले बर्फात, वाचा सविस्तर
ह्युमन राईट्स वॉचच्या अहवालानुसार, सुरक्षा दले जखमी निदर्शकांना रुग्णालयातून उचलून अज्ञातस्थळी नेत आहेत. अनेक कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह दिले जात नाहीत किंवा गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्याची सक्ती केली जात आहे. इंटरनेट ब्लॅकआउटमुळे इराणमध्ये नेमकं काय चाललंय, हे जगासमोर येणे कठीण झाले आहे, मात्र सोशल मीडियावर झिरपणाऱ्या काही व्हिडिओंनी जगाचा थरकाप उडवला आहे.
Ans: मुख्यत्वे प्रचंड महागाई (४२%), चलनाचा घसरलेला दर आणि इस्रायल-अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे.
Ans: सरकारने संपूर्ण देशात इंटरनेट बंद केले असून, आयआरजीसी (IRGC) या लष्करी दलाला निदर्शकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यात २०० हून अधिक मृत्यू झाले आहेत.
Ans: ट्रम्प यांनी इराणमधील जनतेच्या समर्थनाचे आश्वासन दिले असून, निदर्शकांवरील हिंसाचार न थांबल्यास अमेरिकन सैन्य हस्तक्षेप करू शकते, असा इशारा दिला आहे.