
iran israel war 2000 deaths fouad izadi statement oil refinery attack impact india
Iran Israel War Death Toll 2026 : मध्य-पूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि रक्ताच्या थारोळ्यापर्यंत पोहोचला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने आता अत्यंत भयानक वळण घेतले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमुळे इराणमध्ये आतापर्यंत २,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १६५ लहान मुलींचा समावेश असल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली असून, यामुळे जागतिक स्तरावर संतापाची लाट उसळली आहे.
तेहरान विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक फौद इझादी यांनी या संपूर्ण युद्धाला “अनावश्यक” आणि “बेकायदेशीर” म्हटले आहे. त्यांच्या मते, इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नव्हता, तरीही केवळ इस्रायलच्या दबावापोटी अमेरिकेने या युद्धात उडी घेतली आहे. इझादी यांचा दावा आहे की, इस्रायल या प्रदेशात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकन सैन्याचा आणि त्यांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करत आहे. हे युद्ध केवळ इराणपुरते मर्यादित नसून, यामुळे भारतासह अनेक आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Diego Garcia : महासागरातील अमेरिकेच्या सर्वात ‘सुपर बेस’वर इराणच्या ‘SM-3’चा हल्ला; संरक्षण यंत्रणेचे काढले धिंडवडे
या संघर्षाच्या मुळाशी केवळ विचारधारा नाही, तर ‘काळे सोने’ म्हणजेच तेल असल्याचे बोलले जात आहे. प्राध्यापक इझादी यांनी १९५३ च्या लष्करी उठावाची आठवण करून देत म्हटले की, ज्याप्रमाणे तेव्हा इराणच्या तेलावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाला होता, अगदी तसाच प्रयत्न आता इस्रायल करत आहे. इराणच्या तेल सुविधांना लक्ष्य करणे हे केवळ लष्करी धोरण नसून, देशाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्याचा हा एक आंतरराष्ट्रीय कट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Tehran, Iran: On whether there are spies in Iran giving information to Israel, University of Tehran Professor Foad Izadi says, “We have Mossad agents in Iran… The aim of the current war is to change Iran’s government. They are going to fail again…” pic.twitter.com/3tzHNbbVPl — IANS (@ians_india) March 19, 2026
credit – social media and Twitter
इराणने सुरुवातीला केवळ अमेरिकेच्या लष्करी तळांनाच लक्ष्य केले होते, कारण ते आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ‘वैध लष्करी लक्ष्य’ होते. मात्र, जेव्हा दुसऱ्या बाजूने इराणच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर (रिफायनरीज) हल्ले सुरू झाले, तेव्हा इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. तेल कारखाने हे सहसा नागरी सुविधांमध्ये मोडतात, पण इस्रायलने ही मर्यादा ओलांडल्यामुळे इराणकडे आता प्रतिशोध घेण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही, असे इझादी यांनी ठामपणे सांगितले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: इराणी दादागिरीला चोख प्रत्युत्तर! नेतान्याहूंनी शोधला होर्मुझला ‘हा’ पर्यायी मार्ग, बनणार जगाचं ‘पेट्रोल स्टेशन’
हा संघर्ष भारतासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. आखाती देशांमधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडू शकतात. तसेच, इराणमध्ये राहणाऱ्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. जागतिक स्तरावर राजकीय स्थिरता धोक्यात आली असून, ऊर्जेचे हे संकट आगामी काळात अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
Ans: इराणच्या दाव्यानुसार, आतापर्यंत २,००० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत, ज्यात १६५ पेक्षा जास्त लहान मुलींचा समावेश आहे.
Ans: अमेरिकेने इस्रायलच्या दबावाखाली इराणवर बेकायदेशीर हल्ले केले असून इराणच्या तेलावर नियंत्रण मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे, असा आरोप इराणने केला आहे.
Ans: या युद्धामुळे जागतिक तेलाचा पुरवठा खंडित होऊन भारतात इंधन दरवाढ आणि महागाई वाढण्याची मोठी शक्यता आहे.