Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bahrain Bapco: इराणने बहरीनमध्ये घातला धुमाकूळ! ‘घातक’ हल्ल्यामुळे तेल उत्पादन ठप्प, कुवेतमध्ये अंधार; पाहा धक्कादायक VIDEO

Iran Attack Bahrain: इराणने बहरीनच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखाना, बाप्कोवर (Bapco) केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, ज्यामुळे कारखान्यात भीषण आग लागली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 05, 2026 | 11:42 AM
iran missile attack bahrain bapco refinery kuwait power plant drone strike 2026

iran missile attack bahrain bapco refinery kuwait power plant drone strike 2026

Follow Us
Follow Us:
    • इस्रायलचा भीषण हल्ला
    • इराणचा प्रतिहल्ला
  • ट्रम्प यांचा ४८ तासांचा इशारा

Iran attack Bahrain Bapco refinery 2026 : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष (US-Israel Iran War) आता अशा वळणावर पोहोचला आहे जिथून मागे फिरणे अशक्य दिसत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या युद्धात आता प्रत्यक्ष हल्ल्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर इस्रायलने इराणच्या आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर थेट हल्ला चढवला आहे. या भीषण हल्ल्यात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटला आहे.

इस्रायलचा ‘सर्जिकल’ स्ट्राईक आणि इराणचे नुकसान

इस्रायलच्या हवाई दलाने इराणमधील सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटला लक्ष्य केले. इराणी अधिकाऱ्यांनी अद्याप नुकसानीचा अधिकृत आकडा जाहीर केला नसला तरी, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार प्लांटमधून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत होते. हा प्लांट इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या हल्ल्यामुळे इराणचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, यामुळे इराणच्या तेल आणि गॅस निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: इराणचे नेतृत्व संपवले! डोनाल्ड ट्रम्प यांची स्फोटक पोस्ट; पाहा इराणवर अमेरिकेच्या हल्ल्याचा भयानक VIDEO

इराणचा कुवैतवर ड्रोन हल्ला: जशास तसे उत्तर!

इस्रायलच्या या कारवाईला इराणने अवघ्या काही तासांतच प्रत्युत्तर दिले. मात्र, इराणने थेट इस्रायलवर हल्ला न करता अमेरिका-समर्थित कुवैतला लक्ष्य केले. इराणच्या ड्रोननी कुवेतमधील दोन मोठ्या वीज आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला चढवला. कुवेतच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रवक्त्या फातिमा अब्बास झोहर हयात यांनी पुष्टी केली की, या हल्ल्यामुळे दोन वीज निर्मिती युनिट्स पूर्णपणे बंद पडली आहेत. जरी यात जीवितहानी झाली नसली तरी, कुवेतमधील पाणी आणि वीज पुरवठ्यावर याचे गंभीर परिणाम झाले आहेत.

Moment Bapco oil refinery in Bahrain came under attack. Follow: https://t.co/mLGcUTSA3Q pic.twitter.com/ZvFNDcgXtZ — Press TV 🔻 (@PressTV) April 5, 2026

credit – social media and Twitter

अब्दुल्लाही यांचा अमेरिकेला सज्जड दम

इराणचे सर्वोच्च कमांडर अली अब्दुल्लाही यांनी अमेरिकेला दिलेला इशारा अत्यंत गंभीर आहे. ते म्हणाले, “जर अमेरिकेने किंवा इस्रायलने आमच्या पायाभूत सुविधांना पुन्हा हात लावला, तर पश्चिम आशियातील एकही अमेरिकन लष्करी तळ सुरक्षित राहणार नाही. आम्ही ‘विध्वंसक आणि सातत्यपूर्ण’ हल्ले करण्यासाठी सज्ज आहोत.” अब्दुल्लाही यांनी ट्रम्प यांच्या धमकीला ‘हताश आणि मूर्खपणाची’ संबोधून स्पष्ट केले की, इराण आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: मध्य-पूर्वेत महायुद्धाची नांदी! इस्रायलने इराणचा पेट्रोकेमिकल प्लांट उडवला, 5 ठार; इराणचा कुवैतवर ड्रोन हल्ला

ट्रम्प यांचा ‘ट्रुथ सोशल’वरील अल्टिमेटम

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर इराणला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, जो आता संपत आला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, “वेळ निघून जात आहे. जर ४८ तासांत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणवर असा विनाश कोसळेल जो त्यांनी कधीच पाहिला नसेल.” ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे इराणचे वीज प्रकल्प आता अमेरिकेच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलने इराणच्या कोणत्या क्षेत्रावर हल्ला केला आहे?

    Ans: इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हल्ला केला, ज्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: इराणने कुवैतवर हल्ला का केला?

    Ans: अमेरिका-समर्थित देशांवर दबाव आणण्यासाठी आणि इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने कुवेतमधील वीज प्रकल्पांना लक्ष्य केले.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कोणता अल्टिमेटम दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी ४८ तासांत होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणचे वीज प्रकल्प नष्ट करण्याची धमकी दिली आहे.

Web Title: Iran missile attack bahrain bapco refinery kuwait power plant drone strike 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • iran
  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

FBI ची मोठी कारवाई! लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक; अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये छापेमारी
1

FBI ची मोठी कारवाई! लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक; अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये छापेमारी

US Airstrikes Iran : होर्मुझ तणाव चिघळला! तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; अनेक लष्करी तळांना लक्ष्य
2

US Airstrikes Iran : होर्मुझ तणाव चिघळला! तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; अनेक लष्करी तळांना लक्ष्य

Hormuz Attacks : होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य; कतारच्या जहाजावरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय
3

Hormuz Attacks : होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य; कतारच्या जहाजावरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश
4

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.