Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : अमेरिकेचे ‘सुरक्षा कवच’ अयशस्वी! 6 अमेरिकन सैनिकांचा बळी; कुवेत ते कतारपर्यंत अमेरिकन तळांचे तोडले ‘असे’ लचके

US-Iran War: इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे कुवेत, कतार आणि बहरीनमधील अमेरिकी लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सहा अमेरिकी सैनिक ठार झाले असून, रडार यंत्रणा नष्ट झाल्याचे वृत्त आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 26, 2026 | 12:30 PM
iran missile attack us bases kuwait qatar bahrain 6 soldiers killed 2026 update

iran missile attack us bases kuwait qatar bahrain 6 soldiers killed 2026 update

Follow Us
Follow Us:
  • भीषण रक्तपात
  • सुरक्षा कवच भेदलं
  • विरोधाभासी दावे

6 US Soldiers killed in Kuwait attack : मध्य-पूर्वेतील (US-Israel Iran War) आकाशात सध्या शांतता नाही, तर मृत्यूचे तांडव सुरू आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ धमक्यांपुरता मर्यादित राहिला नसून, तो एका भीषण युद्धाच्या रूपात समोर आला आहे. इराणने केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी कुवेतपासून सौदी अरेबियापर्यंत पसरलेल्या अमेरिकन लष्करी तळांना अक्षरशः हादरवून सोडले आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे अतोनात नुकसान झाले असून, ६ शूर सैनिकांनी आपला जीव गमावला आहे.

कुवेतमध्ये रक्ताचा सडा: टॅक्टिकल सेंटर उद्ध्वस्त

हल्ल्याचा सर्वात भीषण फटका कुवेतला बसला आहे. शुऐबा बंदरातील अमेरिकेचे ‘टॅक्टिकल ऑपरेशन्स सेंटर’ (Tactical Operations Center) इराणच्या अचूक क्षेपणास्त्र माऱ्यात पूर्णपणे जमीनदोस्त झाले. या स्फोटात ६ अमेरिकन सैनिकांचा जागीच मृत्यू झाला. इतकेच नाही, तर ‘अली अल सालेम’ हवाई तळावरील विमानांचे हँगर्स आणि ‘कॅम्प ब्यूहरिंग’ येथील इंधन साठेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. अमेरिकेसाठी हा गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठा लष्करी धक्का मानला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: मोठा दिलासा! अखेर इराणने होर्मुझचं दार उघडलं; भारत आणि ‘या’ देशांना LPG आणि Oil नेण्यासाठी फ्री एन्ट्री

रडार यंत्रणा निकामी: कतार आणि बहरीन टार्गेटवर

कतारमधील ‘अल उदेद’ (Al Udeid) हवाई तळ हा अमेरिकेचा मध्य-पूर्वेतील कणा मानला जातो. मात्र, इराणने या तळाची ‘अर्ली वॉर्निंग रडार सिस्टीम’ (Early Warning Radar System) पूर्णपणे नष्ट केली आहे. डोळे गेल्यावर माणूस जसा आंधळा होतो, तशीच अवस्था आता या भागातील अमेरिकन हवाई दलाची झाली आहे. दुसरीकडे, बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ‘पाचव्या ताफ्या’च्या (5th Fleet) मुख्यालयावरही हल्ले झाले आहेत. यामुळे समुद्रातील अमेरिकेची ताकद कमालीची कमकुवत झाली असून, नौदल कारवायांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सौदी अरेबियातही हाहाःकार: विमानांचे नुकसान

सौदी अरेबियातील ‘प्रिन्स सुलतान हवाई तळा’वरही इराणने ड्रोनचा मारा केला. या हल्ल्यात अमेरिकेची महत्त्वाची दळणवळण उपकरणे आणि आकाशात इंधन भरणारी (Refueling Aircraft) अनेक विमाने निकामी झाली आहेत. सामरिकदृष्ट्या हा तळ अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण इथूनच इराणवर नजर ठेवली जाते. या हल्ल्यांमुळे आता या भागातील अमेरिकन हवाई गस्त पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

🚨 REPORT:
IRAN OPENS NEW FRONT: SYRIA
Iranian proxy groups in Iraq have launched at least 6 suicide drones at the Rmelan military base in northern Syria. There are no U.S. troops at the base
Only Syrian government forces
Reports indicate multiple Syrian soldiers were killed… pic.twitter.com/J3BsqUSiP8 — Mossad Commentary (@MOSSADil) March 23, 2026

credit – social media and Twitter

ट्रम्प यांचा वेगळाच दावा: इराण की अमेरिका, नक्की कोण उद्ध्वस्त?

एकीकडे न्यूयॉर्क टाइम्स आणि जागतिक प्रसारमाध्यमे अमेरिकेच्या नुकसानीच्या बातम्या देत असताना, दुसरीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र वेगळाच पवित्रा घेतला आहे. त्यांनी एका कार्यक्रमात दावा केला की, “अमेरिकेच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमुळे इराण पूर्णपणे कोलमडला आहे. इराण आता युद्ध थांबवण्यासाठी आणि तडजोडीसाठी धडपडत आहे.” ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला असला तरी, जमिनीवर अमेरिकेचे झालेले नुकसान नाकारता येण्यासारखे नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: मला दुसरं काम आहे, युद्ध लवकर संपवा! ट्रम्पच्या एका फोनने सर्वांच्याच मनात उठले भीतीचे काहूर; नेमकी कशाची चाहूल?

 जगासाठी धोक्याची घंटा

इराणने अमेरिकेच्या तळांना अशा प्रकारे लक्ष्य करणे हे जागतिक सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत धोक्याचे आहे. जर हे युद्ध असेच लांबले, तर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडतील आणि जगात महागाईचा भडका उडेल. ६ सैनिकांच्या मृत्यूचा बदला अमेरिका कसा घेते, यावर आता जगाचे भवितव्य अवलंबून आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणच्या हल्ल्यात किती अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत?

    Ans: न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, कुवेतमधील शुऐबा बंदरातील टॅक्टिकल सेंटरवर झालेल्या इराणी हल्ल्यात ६ अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत.

  • Que: अमेरिकेचा कोणता महत्त्वाचा हवाई तळ इराणने लक्ष्य केला?

    Ans: इराणने कतारमधील 'अल उदेद' हवाई तळ लक्ष्य केला असून, तिथली रडार यंत्रणा पूर्णपणे नष्ट केली आहे.

  • Que: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे या परिस्थितीवर काय म्हणणे आहे?

    Ans: ट्रम्प यांनी दावा केला आहे की इराण अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झाला असून ते आता शांतीसाठी तडजोड करण्यास तयार आहेत.

Web Title: Iran missile attack us bases kuwait qatar bahrain 6 soldiers killed 2026 update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Eknath Shinde : जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव
1

Eknath Shinde : जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव

US Visa Revocation : अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्याला हाकललं? कोणत्याही कारणाशिवाय F-1 Visa रद्द
2

US Visa Revocation : अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्याला हाकललं? कोणत्याही कारणाशिवाय F-1 Visa रद्द

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर
3

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार
4

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.