Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War III: युद्ध आर्क्टिकमध्ये! इराण USच्या शत्रूसोबत करणार हातमिळवणी; ‘या’ एका प्रस्तावाने ट्रम्पच्या स्वप्नांना लागणार ग्रहण

US-Iran War : ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर म्हणून इराणने ग्रीनलँडच्या संरक्षणासाठी मदतीचा प्रस्ताव दिला आहे, या विधानातून अमेरिका आणि युरोपीय देशांमधील वाढता तणाव आणि मतभेद दिसून येतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 22, 2026 | 02:34 PM
iran offers protection to greenland trump conflict strait of hormuz update 2026

iran offers protection to greenland trump conflict strait of hormuz update 2026

Follow Us
Follow Us:
  • इराणची ‘आर्क्टिक’ एन्ट्री
  • नाटोमध्ये मिठाचा खडा
  • जागतिक तणावाचा २३ वा दिवस

Iran offers protection to Greenland : जगाच्या राजकारणात सध्या अशा घडामोडी घडत आहेत, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. एकीकडे मध्य-पूर्वेत रक्ताचे सडे पडत असताना, आता या युद्धाची धग थेट आर्क्टिकमधील बर्फाळ प्रदेशापर्यंत, म्हणजेच ‘ग्रीनलँड’ (Greenland) पर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याचा आपला जुना हट्ट पुन्हा एकदा बोलून दाखवला आणि इथूनच एका नवीन जागतिक संघर्षाला सुरुवात झाली. पण यात सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे, ट्रम्प यांचा कट्टर शत्रू इराणने या वादात उडी घेतली आहे.

इराणचा ‘ग्रीनलँड’ प्रस्ताव: ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ!

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष कोणापासून लपलेला नाही. पण आता इराणने आपला हा संघर्ष मध्य-पूर्वेपुरता मर्यादित न ठेवता थेट युरोपपर्यंत नेला आहे. इराणच्या प्रवक्त्याने नुकताच एक धक्कादायक प्रस्ताव दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जर युरोपीय देश अमेरिकेच्या दाबाखाली येऊन ग्रीनलँडचे संरक्षण करू शकत नसतील, तर इराण ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी लष्करी मदत देण्यास तयार आहे.” इराणचे हे विधान म्हणजे ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाला दिलेले एक चोख प्रत्युत्तर मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : ‘इंधनाला हात लावला तर…’ इराणचा अमेरिकेला अल्टिमेटम; US ऊर्जा प्रकल्पांवर इराणी ‘सायबर बॉम्बची’ टांगती तलवार

ट्रम्प यांचा ‘रिअल इस्टेट’ हट्ट आणि युरोपला धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते ग्रीनलँड हे बेट अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील खनिज संपत्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी डॅनिश सरकारला (डेन्मार्क) हे बेट अमेरिकेला विकण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, डेन्मार्क आणि ग्रीनलँडने हा प्रस्ताव केवळ फेटाळलाच नाही, तर ट्रम्प यांच्यावर टीकाही केली. यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर १० ते २५ टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे नाटो (NATO) सदस्य देशांमध्ये मोठी फूट पडली असून, इराण याच संधीचा फायदा घेताना दिसत आहे.

Iran offer to PROTECT Greenland from Trump — ‘just ask… we’ll come’ pic.twitter.com/t0L7zqd2w0 — RT (@RT_com) March 21, 2026

credit – social media and Twitter

मध्य-पूर्वेतील २३ वा दिवस आणि होर्मुझचा धोका

इराणचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा इस्रायल-इराण युद्धाचा २३ वा दिवस सुरू आहे. इराणने आधीच इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने इस्रायलची मदत थांबवली नाही, तर ते जागतिक तेलाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) कायमची बंद करतील. जर हे घडले, तर जगात तेलाचा तुटवडा निर्माण होईल आणि संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळेल. आता ग्रीनलँडच्या वादात उडी घेऊन इराणने अमेरिकेला दोन आघाड्यांवर घेरण्याची तयारी केली आहे.

ग्रीनलँड का आहे इतकं महत्त्वाचं?

ग्रीनलँड हे केवळ बर्फाचं बेट नाही. आर्क्टिक महासागरातील त्याचे स्थान रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेला हवे आहे. तिथे दुर्मिळ खनिजे, गॅस आणि सोन्याचे साठे असल्याचा अंदाज आहे. म्हणूनच ट्रम्प यांना तिथे ताबा हवा आहे. पण इराणच्या एन्ट्रीमुळे आता हा प्रश्न केवळ रिअल इस्टेटचा राहिला नसून, तो जागतिक अस्मितेचा आणि संरक्षणाचा बनला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: इराणचा ‘लिटल इंडिया’वर वार! युद्धाच्या आगीत होरपळला इस्रायली भारतीय समाज; पाहा काळजाचा ठोका चुकवणारे ‘हे’ 5 VIDEO

 जगावर ओढवणार मोठं संकट?

इराणने दिलेला संरक्षणाचा प्रस्ताव अमेरिका कधीही स्वीकारणार नाही, हे स्पष्ट आहे. पण यामुळे नाटो देशांमध्ये जो अंतर्गत कलह निर्माण झाला आहे, त्याचा फायदा इराण आणि रशियासारखे देश घेऊ शकतात. जर ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर लष्करी दबाव वाढवला, तर इराण आणि युरोप यांच्यात एक नवीन समीकरण तयार होऊ शकतं, जे अमेरिकेसाठी सर्वात मोठं दुस्वप्न ठरेल.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने ग्रीनलँडला संरक्षणाचा प्रस्ताव का दिला?

    Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याची धमकी दिल्यामुळे इराणने अमेरिकेला डिवचण्यासाठी आणि युरोपीय देशांमध्ये फूट पाडण्यासाठी हा प्रस्ताव दिला आहे.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का खरेदी करायचे आहे?

    Ans: ग्रीनलँडमधील प्रचंड खनिज संपत्ती आणि आर्क्टिक क्षेत्रातील लष्करी व धोरणात्मक वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिकेला हे बेट हवे आहे.

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी का महत्त्वाची आहे?

    Ans: जगातील तेलाच्या एकूण व्यापारापैकी २० टक्क्यांहून अधिक वाहतूक या मार्गावरून होते. इराणने हा मार्ग बंद केल्यास जागतिक स्तरावर तेलाचे दर गगनाला भिडतील.

Web Title: Iran offers protection to greenland trump conflict strait of hormuz update 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Greenland
  • iran
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
2

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
4

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.