Iran preparing to retaliate against America Will it use dangerous missile
तेहरान: सध्या मध्य पूर्वेत विनाशाचे वादळ उठले आहे. एकीकडे इस्रायल आणि इराणध्ये १० दिवसांपासून लष्करी संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे रविवारी (२२ जून) इराणच्या अणु केंद्रावर हवाई हल्ला केला आहे. यामुळे इराणमध्ये संतापाचे वातावरण आहे. इराणने अमेरिकेच्या या कारवाईला बेकायदेशीर म्हटले आहे. तसेच प्रत्युत्तराचा इशारा देखील दिला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर आता इरान आपल्या सर्वात धोकादायक क्षेपणास्त्राचा वापर करून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे मध्य पूर्वेत कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
अमेरकेने इस्रायल-इराण संघर्षात उघडपणे सहभाग घेतला आहे. अमेरिकेने इराणच्या अणुउर्जा केंद्रावर बॉम्ब हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन महत्त्वाच्या इराणी अणुकेंद्रावर अमेरिकेने हल्ला केला आहे. यामुळे इराणचे गंभीर नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिकेने इराणवर हल्ल्यासाठी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स मिसूरी येथील व्हाईटमन एअर बेसवर पोहोचलेय त्यानंतर या विमानाने इराणच्या दिशेने उड्डाण केले. यानंतर ही विमाने गुआम तळाजवळ दिसली. बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स ३०,००० पौंड वजनाचा बंकर बस्टर बॉम्ब, ऑर्डनन्स पेनेट्रेटर वाहून नेण्यास सक्षम आहेत. बी-२ बॉम्बर्स इराणमधील अणुस्थळांवर हल्ला करण्यास सक्षम मानले जातात.
या हल्ल्यानंतर इराणने तीव्र निषेध केला आहे. तसेच स्वत:च्या संरक्षणासाठी तयार असल्याचे आणि अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचे म्हटले आहे. यामुळे इराण आपले सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र बाहेर काढत आहे. इराणकेड गदर, इमाद, खेबर शेकन अशी मीडियम रेंजच्या क्षेपणास्त्रांचा साठा आहेत.
परंतु सध्या इराणते फत्ताह-१ हापरसॉनिक मिसाईल चर्चेचा विषय ठरत आहे. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या १५ पट वेगाने दावते. यामुळे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेसमोर आणि अमेरिकेसमोर सर्वात मोठे आवाहन उभे राहिले आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूकचेने लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे.
तसेच इराणकडे आणखी एक घातक शस्त्र आहे. खोर्मशहर मिसाइल आहे. हे क्षेपणास्त्रे २००० किमी पर्यंत १५०० किलो वजनी वॉरहेड नेण्याची क्षमता ठेवते. अद्याप इराणने याच्या अधिकृत वापराची घोषणा केलेली नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते इराण या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे मध्ये पूर्वेत संघर्ष तीव्र पेटला आहे. यामुळे इराण या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती गंभीर होत चालली आहे.