पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करून हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे
Iran-Israel War: अमेरिकेने रविवारी इराणमधील तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केले असल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. खोरासान व्हॉइस या वृत्तसंस्थेने इराणच्या सूत्रांचा हवाला देत, हा हल्ला करताना अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला, असा दावा केला आहे.
२१ जून रोजी अमेरिकन हवाई दलाच्या बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी मोंटाना येथील तळावरून उड्डाण केले आणि ग्वामच्या दिशेने निघाले, असेही म्हटले जात आहे. यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून इराणच्या अणु सुविधांवर हल्ले चढवले. मात्र, या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, या हल्ल्याचा पाकिस्तानने तीव्र निषेध केला आहे. अधिकृत निवेदनात पाकिस्तानने हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, या कारवाईत पाकिस्तानने अप्रत्यक्षरित्या सहकार्य केल्याचा आरोप इराणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे इराण आणि अमेरिकेसोबत डबल गेम करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Hindi Language News: हिंदी भाषा सक्तीबाबत खोटे विधान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी गेल्या आठवड्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मुनीर आणि ट्रम्प यांच्या दुपारच्या जेवणाची आणि भेटीची सतत चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण इराणवर हल्ला झाल्यास डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल नक्कीच बोलले असते, असे अनेक तज्ञांचे मत आहे. पण ट्रम्प यांनी मुनीर यांचे कौतुक केले आहे. मुनीरच्या कौतुकाच्या बदल्यात अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याचा करार केला असण्याची शक्यता आहे. इरामवरील हल्ल्यात पाकिस्तानच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृतपणे काही गोष्टी उघड झालेल्या नाहीत.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर, फर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर हल्ला केला आहे. ‘आम्ही इराणच्या तीन अणुस्थळांवर यशस्वीरित्या हल्ले केले आहेत. बॉम्ब टाकल्यानंतर, सर्व अमेरिकन विमाने सुरक्षितपणे परतत आहेत. आता शांततेची वेळ आहे. असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जाहीरही केलं.
Bihar Election 2025 : गरीब कुटुंबाना मिळणार 2 लाख रुपये; नितीश कुमारांची घोषणा, नक्की काय आहे योजना?
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी अमेरिकेवर संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमचा सदस्य असलेल्या अमेरिकेने इराणच्या शांततापूर्ण अणुप्रकल्पांवर हल्ला करून संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर, आंतरराष्ट्रीय कायदा आणि एनपीटीचे गंभीर उल्लंघन केल्याच आरोप केला आहे.