जगातील सर्वात धोकादायक महिला गुप्तहेर
इस्रायलने १३ जून रोजी इराणविरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले. या ऑपरेशनचे लक्ष्य इराणची अणु सुविधा पूर्णपणे नष्ट करणे होते. इस्रायली लढाऊ विमानांनी केवळ अणु स्थळांनाच लक्ष्य केले नाही तर अणुशास्त्रज्ञ आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांवरही हल्ला करून त्यांना ठार मारले. इराणसाठी हा एक मोठा धक्का होता. इस्रायलचे हल्ले इतके अचूक होते की त्यांना प्रत्येक अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्याचे वास्तविक स्थानदेखील माहित होते.
या हल्ल्यांनंतर इराणमध्ये तपास सुरू झाला तेव्हा इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादची सर्वात धोकादायक महिला गुप्तहेर ‘कॅथरीन पेरेझ शकेद’चे या महिलेचे नाव समोर आले. फ्रेंच वंशाच्या या महिला गुप्तहेराने हे संपूर्ण ऑपरेशन इतक्या हुशारीने पार पाडले की तिला आता ‘ब्लॅक विडो’ अशी उपमा देण्यात आली आहे. ही ब्लॅक विडो आता मोसादची सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध गुप्तहेर बनली आहे. पण एक काळ असाही होता, ज्यावेळी एका महिला गुप्तहेराने संपूर्ण युरोपला आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडले होते. या महिला गुप्तहेराला आजपर्यंत जगातील सर्वात धोकादायक गुप्तहेर मानले जाते.
Hindi Language News: हिंदी भाषा सक्तीबाबत खोटे विधान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस
ही कहाणी आहे हेरगिरीच्या जगातली सर्वात रहस्यमय आणि प्रसिद्ध गुप्तहेर माता हरीची. १८७६ मध्ये नेदरलँड्समध्ये जन्मलेल्या ‘गर्ट्रूड मार्गारेथा जेले’ यांना हेरगिरीच्या जगात माता हरी म्हणून ओळखले जाते. माता हरी यांनी सुरूवातीला नृत्यांगना म्हणून आपले काम सुरू केले आणि हे काम करण्यासाठी त्या १९०५ मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाल्या. संपूर्ण युरोप माता हरीच्या शैली आणि सौंदर्याने वेडा झाला होता. फ्रेंच आणि जर्मन सैन्यातील अनेक उच्च अधिकारीही त्यांचे नृत्य पाहण्यासाठी येऊ लागले. इथूनच माता हरीवरचा हेरगिरीचा अध्याय सुरू झाला. आपल्या आकर्षक सौंदर्याचे वेड लावून माता हरीने जर्मन सैनिकांची अनेक गुपिते फ्रेंच सरकारला सांगितली. महत्त्वाची बाब म्हणजे, ती डबल एजंट होती आणि हिटलरच्या सैन्यासाठीदेखील हेरगिरी करत असल्याचे सांगण्यात येते.
Bihar Election 2025 : गरीब कुटुंबाना मिळणार 2 लाख रुपये; नितीश कुमारांची घोषणा, नक्की काय आहे योजना?
जर्मनीसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली माता हरीला १९१७ मध्ये अटक करण्यात आली. न्यायालयात एक सुनावणी झाली, मात्र गुप्तहेरी आरोप तिने फेटाळून लावला. ती कायम स्वत: ला एक नर्तकी म्हणूनच सादर करायची. पण तिच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. माता हरी यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माता हरीच्या मृत्यूनंतर, ती फ्रान्ससाठी हेरगिरी करत होती की जर्मनीसाठी हे एक गूढच राहिले. पण फ्रेंच आणि जर्मन सैन्यातील जवळजवळ सर्व उच्च अधिकाऱ्यांनी त्यांची गुपिते माता हरी यांच्यासमोर उघड केल्याचेही सांगितले जाते.