Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Project Freedom : अमेरिकेची दादागिरी चालणार नाही! ट्रम्प यांचा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ इराणने रोखला; होर्मुझच्या मार्गावर संकटाची चाहूल

Iran on Project Freedom: इराणने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या 'प्रोजेक्ट फ्रीडम'ला स्पष्टपणे नाकारले असून अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या नियंत्रणाखालीच राहील.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 04, 2026 | 11:25 AM
iran rejects trumps project freedom hormuz strait conflict 2026

iran rejects trumps project freedom hormuz strait conflict 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ इराणने धुडकावला
  • शस्त्रसंधीला धोका
  • सागरी वर्चस्वाची लढाई

Trump Project Freedom Iran : जागतिक राजकारणातील सर्वात संवेदनशील भाग असलेल्या मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी नुकतीच ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेली आंतरराष्ट्रीय जहाजे मुक्त करणे हा आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या हालचालीला इराणने कडाडून विरोध केला असून, अमेरिकेचा हा ‘मानवतावादी’ मुखवटा नसून ती लष्करी दादागिरी असल्याचे म्हटले आहे. या वादामुळे जागतिक तेल पुरवठा आणि सागरी सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mayon Volcano: फिलीपिन्सचा सर्वात सक्रिय ज्वालामुखी पुन्हा जागृत; आकाशात राखेचे साम्राज्य अन् हजारो लोकांचे स्थलांतर, VIDEO VIRAL

इराणचा कडक पवित्रा: “अमेरिकेने लक्ष्मणरेषा ओलांडू नये”

इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अझीझी यांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी ही इराणची सार्वभौम भूमी आहे आणि तिथे अमेरिकन नौदलाचा वावर हा आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे. “ट्रम्प यांच्या दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवर जागतिक सागरी व्यवस्था ठरणार नाही. अमेरिकेने जर आमच्या जलक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर तो शस्त्रसंधी कराराचा भंग मानला जाईल आणि त्याचे परिणाम गंभीर होतील,” असा सज्जड दम अझीझी यांनी दिला आहे.

#Iran rejects #Trump’s “Project Freedom,” warning the #US that any interference in the Strait of #Hormuz will be seen as a ceasefire violation and a direct challenge to its sovereignty.https://t.co/DadldCEP5B — Al Mayadeen English (@MayadeenEnglish) May 4, 2026

credit – social media and Twitter

काय आहे ट्रम्प यांचा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एका पोस्टद्वारे ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ (Project Freedom) उपक्रमाची घोषणा केली होती. त्यांच्या दाव्यानुसार, अनेक देशांनी आपल्या जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेकडे मदतीची मागणी केली आहे. ही मोहीम सोमवारी सकाळी सुरू होणार असून, अमेरिकन प्रतिनिधींच्या देखरेखीखाली प्रतिबंधित क्षेत्रातील जहाजे आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले जाईल. ट्रम्प यांनी या मोहिमेचे वर्णन ‘मानवतावादी’ असे केले असले, तरी इराणच्या मते हा त्यांच्या सागरी वर्चस्वावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे.

⚠ WARNING Any American interference in the new maritime regime of the Strait of Hormuz will be considered a violation of the ceasefire. The Strait of Hormuz and the Persian Gulf would not be managed by Trump’s delusional posts! No one would believe Blame Game scenarios! — ابراهیم عزیزی (@Ebrahimazizi33) May 3, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hantavirus outbreak 2026 : समुद्राच्या मध्यभागी भयानक विषाणूचा हल्ला; आलिशान क्रूझवर 3 प्रवाशांचा मृत्यू, WHOचा सतर्कतेचा इशारा

होर्मुझचे महत्त्व आणि जागतिक चिंता

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची ऑईल शिपिंग लेन आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्याचा २०% पेक्षा जास्त भाग याच मार्गावरून जातो. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे या मार्गावर अनिश्चितता पसरली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, ते युद्धपूर्व स्थितीत परत जाणार नाहीत आणि या मार्गाचे व्यवस्थापन केवळ इराण आणि ओमानच्या हातातच राहील. जर अमेरिकेने आपल्या नौदलाचा वापर करून या भागात घुसखोरी केली, तर जागतिक तेल बाजार कोसळण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोंडी फुटणार की पुन्हा संघर्ष पेटणार?

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात कागदी युद्ध सुरू असले, तरी जमिनीवरची परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ अंतर्गत अमेरिकन नौदल प्रत्यक्षात तिथे उतरल्यास इराणकडून लष्करी प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे केवळ दोन देशांमधील शस्त्रसंधीच मोडणार नाही, तर पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने युद्ध सुरू होण्याची भीती आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे इराणच्या सत्ताधाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, पुढील ४८ तास जागतिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांचा 'प्रोजेक्ट फ्रीडम' नेमका काय आहे?

    Ans: होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या विविध देशांच्या व्यापारी जहाजांना अमेरिकन नौदलाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ट्रम्प यांनी सुरू केलेली ही मोहीम आहे.

  • Que: इराण या उपक्रमाला विरोध का करत आहे?

    Ans: इराणच्या मते, होर्मुझवर त्यांचे सार्वभौम नियंत्रण आहे आणि अमेरिकेचा लष्करी हस्तक्षेप हा शस्त्रसंधीचे उल्लंघन असून त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे.

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी का महत्त्वाची आहे?

    Ans: हा जागतिक तेल व्यापाराचा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर तणाव निर्माण झाल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत जगभरात मोठी वाढ होऊ शकते.

Web Title: Iran rejects trumps project freedom hormuz strait conflict 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.