Hantavirus outbreak 2026 : समुद्राच्या मध्यभागी भयानक विषाणूचा हल्ला; आलिशान क्रूझवर ३ प्रवाशांचा मृत्यू, WHOचा सतर्कतेचा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Hantavirus outbreak 2026 : जगावर पुन्हा एकदा एका धोकादायक विषाणूचे सावट निर्माण झाले आहे. कोरोनाच्या सावटातून जग सावरत असतानाच आता ‘हँटाव्हायरस’ (Hantavirus) या जीवघेण्या विषाणूने समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका आलिशान क्रूझ जहाजावर आपले पाय पसरले आहेत. ‘एमव्ही होंडियस’ (MV Hondius) या डच क्रूझ जहाजावर या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ३ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आजारी आहेत. या घटनेमुळे जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
हे क्रूझ जहाज सुमारे तीन आठवड्यांपूर्वी अर्जेंटिनामधून १५० प्रवाशांना घेऊन अंटार्क्टिका आणि इतर ठिकाणांच्या मोहिमेवर निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान काही प्रवाशांना श्वसनाचा त्रास, तीव्र ताप आणि स्नायूदुखी जाणवू लागली. बघता बघता ही परिस्थिती इतकी गंभीर झाली की, दोन डच नागरिक आणि एका अन्य प्रवाशाचा मृत्यू झाला. सध्या हे जहाज केप वर्दे या बेटाजवळ उभे असून, तिथल्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना जहाजावरून उतरण्यास मनाई केली आहे. यामुळे जहाजावरील प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kailash Mansarovar: लिपुलेख वाद पेटला! नेपाळने कैलास मानसरोवर यात्रा रोखली; बालेन सरकारने भारत आणि चीनला पाठवले ‘असे’ पत्र
हँटाव्हायरस हा प्रामुख्याने उंदीर, उंदीरसदृश प्राणी आणि खारींच्या माध्यमातून मानवात पसरतो. जेव्हा या प्राण्यांची विष्ठा, मूत्र किंवा लाळ सुकते आणि धुळीत मिसळते, तेव्हा श्वासावाटे हे विषाणू मानवाच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. ‘यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (CDC) नुसार, या विषाणूमुळे ‘हँटाव्हायरस पल्मोनरी सिंड्रोम’ (HPS) होतो, ज्यामुळे फुफ्फुसात पाणी भरते आणि रुग्णाला श्वास घेणे अशक्य होते. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे, याचा मृत्यूदर ३८% पेक्षा जास्त आहे, जो अनेक मोठ्या आजारांपेक्षा भयानक मानला जातो.
At least one case of hantavirus had been confirmed on the ship, but an investigation is underway. https://t.co/eXykW9bhxE — KARE 11 (@kare11) May 4, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sergio Gor: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी ट्रम्पच्या खास दूताला डावलले; ‘या’ कृत्याने अमेरिकेचा अपमान केल्याचा तज्ज्ञांचा आरोप
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक ब्रिटिश नागरिक सध्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. केप वर्देच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा कारणास्तव प्रवाशांना उतरण्यास मज्जाव केल्याने डच सरकार आणि WHO सध्या राजनैतिक पातळीवर चर्चा करून रुग्णांना मायदेशी नेण्याची व्यवस्था करत आहेत. यापूर्वी हॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींच्या कुटुंबातही अशा संसर्गाच्या घटना समोर आल्याने हा विषाणू आता जागतिक चिंतेचा विषय ठरला आहे.
Ans: संक्रमित उंदीर किंवा खारींच्या मूत्र, विष्ठा किंवा लाळेच्या संपर्कात आल्यास किंवा ती धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास हँटाव्हायरसचा प्रसार होतो.
Ans: तीव्र ताप, स्नायूदुखी, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे आणि नंतरच्या टप्प्यात श्वास घेण्यास प्रचंड त्रास होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
Ans: साधारणपणे हा विषाणू मानवाकडून मानवाकडे पसरत नाही, मात्र दक्षिण अमेरिकेतील काही विशिष्ट प्रकारच्या हँटाव्हायरसमध्ये असा प्रसार दिसून आला आहे, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.






