Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

A-10 Warthog : एका क्षेपणास्त्रात खेळ खल्लास! अमेरिकेच्या गर्विष्ठ ‘वॉरहॉग’ला इराणने क्षणात संपवले; VIDEO मीडियामध्ये लीक

A-10 Warthog Shot Down: इराणने एक धाडसी दावा केला आहे: त्यांनी पर्शियन आखातात अमेरिकेचे एक घातक ए-१० वॉरहॉग विमान पाडले. हवाई दलाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 04, 2026 | 11:10 AM
iran shot down us tank killer a10 warthog video radar attack persian gulf 2026

iran shot down us tank killer a10 warthog video radar attack persian gulf 2026

Follow Us
Follow Us:
  • ‘टँक किलर’ उद्ध्वस्त
  • हल्ल्याचा व्हिडिओ लीक
  • अमेरिकेची प्रतिक्रिया

Iran shot down US A-10 Warthog : मध्य-पूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आता अतिशय भयानक वळण घेतले आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात इराणने अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका दिल्याचे वृत्त समोर येत आहे. जमिनीवरील रणगाड्यांचा कर्दनकाळ मानले जाणारे अमेरिकेचे A-10 वॉरहॉग (A-10 Warthog) विमान इराणने नष्ट केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून, इराणने या हल्ल्याचा पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.

रडारवर ‘लॉक’ अन् काही सेकंदात विमानाचा खात्मा!

इराणची सरकारी वृत्तवाहिनी IRIB ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इराणची हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense System) अमेरिकन विमानाचा पाठलाग करताना दिसत आहे. रडारवर ‘A-10 वॉरहॉग’ला यशस्वीपणे लक्ष्य केल्यानंतर त्यावर क्षेपणास्त्र डागण्यात आले. अवघ्या काही सेकंदात हे ‘टँक किलर’ विमान आगीच्या गोळ्यात रूपांतरित होऊन समुद्रात कोसळले. इराणच्या मते, ही घटना पर्शियन आखाताच्या हवाई हद्दीत घडली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IranUSWar: अमेरिकेचे ‘अजेय’ विमान इराणने पाडले! 82 दशलक्ष डॉलर्सचे F-35 मातीत; स्वदेशी क्षेपणास्त्राने ‘अदृश्य’ शत्रूचा गेम, VIDEO

काय आहे A-10 ‘वॉरहॉग’चे महत्त्व?

A-10 वॉरहॉग हे अमेरिकन हवाई दलाचे असे विमान आहे जे विशेषतः जमिनीवरील लक्ष्यांवर, प्रामुख्याने रणगाड्यांवर (Tanks) हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्याच्या अवाढव्य शस्त्रास्त्रांमुळे आणि भक्कम रचनेमुळे याला ‘टँक किलर’ म्हटले जाते. या विमानात ३० एमएमची गॅटलिंग गन असते, जी एका मिनिटात हजारो गोळ्या झाडू शकते. अशा ताकदवान विमानाला पाडणे हे इराणच्या संरक्षण यंत्रणेचे मोठे यश मानले जात आहे.

🚨 #Breaking
Iran Aerospace Force has released footage showing Iranian air defense downing the American A-10 ‘Warthog’ pic.twitter.com/qTIA6oL0iC
— IRIB (Islamic Republic of Iran Broadcasting) (@iribnews_irib) April 3, 2026

credit – social media and Twitter

अमेरिकेची भूमिका: वैमानिक बचावला, पण विमान का पडले?

या घटनेनंतर अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी मान्य केले आहे की, त्यांचे एक A-10 विमान कोसळले आहे. सुदैवाने, विमानाच्या वैमानिकाने वेळेत ‘इजेक्ट’ केल्यामुळे त्याला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अमेरिकेने हे विमान इराणने पाडले आहे की तांत्रिक बिघाडामुळे कोसळले, यावर अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. इराणने यापूर्वी ‘एफ-१५ई स्ट्राइक ईगल’ देखील पाडल्याचा दावा केला होता, ज्यामुळे अमेरिकन हवाई दलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Politics: ट्रम्प प्रशासनात सत्तेचा रणसंग्राम! अमेरिकेत एका रात्रीत 3 बड्या नेत्यांची हकालपट्टी; काश पटेल, तुलसी गबार्ड रडारवर

युद्धाचा भडका उडण्याची शक्यता

इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणविरोधी कारवाया तीव्र केल्या असतानाच ही घटना घडली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांची संरक्षण यंत्रणा पूर्णपणे सक्रिय असून कोणत्याही घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. या विमानामुळे अमेरिकेचे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले असून, यामुळे मध्य-पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. आता अमेरिका या हल्ल्याचा बदला कसा घेणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने पाडलेल्या A-10 वॉरहॉग विमानाला 'टँक किलर' का म्हणतात?

    Ans: हे विमान जमिनीवरील रणगाडे आणि अवजड लष्करी वाहने नष्ट करण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आले आहे, म्हणून याला 'टँक किलर' म्हणतात.

  • Que: या हल्ल्यात अमेरिकन वैमानिकाचे काय झाले?

    Ans: अमेरिकन लष्कराच्या माहितीनुसार, वैमानिकाला सुखरूप वाचवण्यात आले आहे, मात्र विमानाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: इराणच्या दाव्यानुसार, ही घटना पर्शियन आखातातील (Persian Gulf) हवाई क्षेत्रात घडली आहे.

Web Title: Iran shot down us tank killer a10 warthog video radar attack persian gulf 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • Fighter Plane
  • US-Israel Iran War
  • Video Viral
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.