Iran Supreme Court sentences pop singer Amir Hossein to death
तेहरान: इराणच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध पॉप सिंगर आमिर तातालू यांना निंदा प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तातालू, यांचे खरे नाव अमीर हुसैन मघसूलदसू आहे. त्यांच्यावर पैगंबर मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र सरकारी अभियोजकाच्या अपीलनंतर ही सजा वाढवून त्यांना मृत्युदंडांची शिक्षा देण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टचा निर्णय
इराणच्या सुप्रीम कोर्टाने यासंबंधित एक निवेदन जारी केले असून यामध्ये कोर्टाने सांगितले की, प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात आली आणि तातालू यांच्यावरील ईशनिंदा आणि इतर आरोप सिद्ध झाले. यामुळे त्यांना कठोर शिक्षा देण्याचा योग्य निर्णय घेण्यात आला. याशिवाय, कोर्टने हेही स्पष्ट केले की, हा अंतिम निर्णय नसून त्याविरोधात अपील करता येऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- फक्त 35 शब्दात डोनाल्ड ट्रम्प घेणार शपथ; जाणून घ्या काय बोलतील?
तुर्कीतून अटक
मीडिया रिपोर्टनुसार, 37 वर्षीय तातालू 2018 पासून तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये वास्तव्यास होते. इराणमधील कारवाईपासून बचाव करण्यासाठी त्यांनी देश सोडला असल्याचे म्हटले जात होते. पण डिसेंबर 2023 मध्ये तुर्की पोलिसांनी त्यांना अटक करून इराणच्या अधिकाऱ्यांच्या हवाली केले. तेव्हापासून ते इराणच्या ताब्यात आहेत.
तातालू यांच्यावरील इतर आरोप
तातालू यांच्यावर याआधीही अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 2015 मध्ये त्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाच्या समर्थनार्थ तातालू यांनी एक गाणे सादर केले होते. हे गाणे अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. तसेच, त्यांनी 2017 मध्ये तत्कालीन इराणी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासोबत एका विचित्र टेलिव्हिजन चर्चेत सहभाग घेतला होता. या घटनेनंतर रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.
गाण्यांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते आधीपासूनच सरकारी रडारवर
याशिवाय, तातालू यांना वेश्यावृत्तीला प्रोत्साहन दिल्याने 10 वर्षांची शिक्षा आणि अश्लील सामग्री प्रसारित केल्याबद्दलही शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्यांनी इस्लामी गणराज्याविरोधात दुष्प्रचार केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. मिळालेलल्या माहितीनुसार, सध्या इराण सरकारने धार्मिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि इस्लामविरोधी वक्तव्य केल्याबद्दल तातालू यांना मुख्य आरोपी ठरवले. त्यांच्या गाण्यांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते आधीपासूनच सरकारी रडारवर होते. त्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे जागतिक स्तरावर मोठ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.