
iran threatens 18 us tech companies google apple microsoft white house response 2026
Iran threat to 18 US companies 2026 : मध्य-पूर्वेतील रणांगण (US-Israel Iran War) आता केवळ जमिनीपुरते मर्यादित राहिले नसून ते आता जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता एका अशा धोकादायक वळणावर आला आहे, जिथे केवळ सैनिकच नाही, तर सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आणि कॉर्पोरेट कर्मचारीही दहशतीच्या छायेखाली आले आहेत. मंगळवारी, ३१ मार्च २०२६ रोजी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) दिलेला इशारा हा केवळ राजकीय नसून तो जागतिक अर्थव्यवस्थेला खिळवून टाकणारा आहे.
इराणने अमेरिकेच्या १८ दिग्गज कंपन्यांची एक अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये गुगल (Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ॲपल (Apple), मेटा (Meta), टेस्ला (Tesla), एनव्हिडिया (Nvidia), इंटेल (Intel) आणि बोईंग (Boeing) सारख्या बलाढ्य नावांचा समावेश आहे. इराणचा आरोप आहे की, या कंपन्या इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तसेच गुप्तचर यंत्रणांना तांत्रिक मदत पुरवतात. इराणमध्ये होणाऱ्या प्रत्येक लष्करी कमांडरच्या हत्येमागे या कंपन्यांचे तंत्रज्ञान कारणीभूत असल्याचे इराणचे म्हणणे आहे. “आमच्या प्रत्येक बलिदानाचा बदला या कंपन्यांची युनिट्स उद्ध्वस्त करून घेतला जाईल,” असे IRGC ने आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: इराण युद्धाचा शेवट! ट्रम्प यांनी जाहीर केली तारीख; ‘सत्तापालट’ झाला, आता अमेरिकन सैन्य मायदेशी परतणार
इराणच्या या धमकीमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना दिलेला थेट इशारा. IRGC ने या १८ कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे की, जर त्यांना आपले प्राण प्रिय असतील, तर त्यांनी तात्काळ या कार्यालयांमधून बाहेर पडावे. या धमकीमुळे आखाती देशांमधील (Gulf Countries) अमेरिकन टेक हब्समध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सायबर हल्ल्यांपासून ते प्रत्यक्ष आत्मघाती हल्ल्यांपर्यंत कोणताही मार्ग इराण स्वीकारू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
❗️ Iran threatens Microsoft, Apple, Google & other top US companies ‘For every assassination, one American company will be destroyed’ ‘Expect destruction of their relevant units starting Wednesday, April 1, in response to each assassination in Iran’ pic.twitter.com/RNMaIWBBrH — RT (@RT_com) March 31, 2026
credit – social media and Twitter
इराणच्या या धमकीनंतर अमेरिकेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, “इराणने आता स्वतःची मर्यादा ओळखली पाहिजे. इराणकडून होणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये आता ९० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, कारण अमेरिकन डिफेन्स सिस्टिमने त्यांचे प्रत्येक कारस्थान हवेतच मोडीत काढले आहे.” अमेरिकेने हे देखील स्पष्ट केले की, आपल्या टेक कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिका कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. “इराणने ‘पूर्वी’ काय केले आणि ‘आता’ अमेरिका काय करू शकते, यातील फरक त्यांनी लक्षात ठेवावा,” असा टोलाही व्हाईट हाऊसने लगावला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Iran Oil: संकट टळले! इराण-भारत तेल व्यापार पुन्हा सुरू; खारग बेटावरून 6,00,000 बॅरल कच्चे तेल घेऊन येणारा टँकर तयार
तज्ज्ञांच्या मते, इराण थेट क्षेपणास्त्र हल्ल्यांऐवजी या कंपन्यांवर मोठ्या प्रमाणावर ‘सायबर अटॅक’ (Cyber Attack) करण्याची शक्यता जास्त आहे. गुगल किंवा मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांचे सर्व्हर हॅक करणे किंवा त्यांचा डेटा नष्ट करणे, हा इराणचा प्राथमिक प्लॅन असू शकतो. मात्र, ज्या प्रकारे १८ कंपन्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, ते पाहता इराण आता ‘आरपार’च्या लढाईच्या मूडमध्ये असल्याचे दिसते. या यादीत जेपी मॉर्गन (JP Morgan) आणि जनरल इलेक्ट्रिक (GE) सारख्या आर्थिक आणि पायाभूत सुविधा देणाऱ्या कंपन्यांचा समावेश असल्याने जागतिक शेअर बाजारातही मोठी पडझड होण्याची चिन्हे आहेत.
Ans: इराणने गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, मेटा, टेस्ला आणि एनव्हिडियासह एकूण १८ टेक आणि कॉर्पोरेट कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.
Ans: इराणचा दावा आहे की या कंपन्या अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर संस्थांना तांत्रिक पाठिंबा देतात, ज्याचा वापर इराणी नेत्यांच्या हत्येसाठी केला जातो.
Ans: व्हाईट हाऊसने म्हटले आहे की त्यांचे सैन्य कोणत्याही हल्ल्याला रोखण्यास सक्षम आहे आणि इराणच्या ९०% हल्ल्यांची क्षमता आधीच नष्ट करण्यात आली आहे.