Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shelly Kittleson: अमेरिकन महिला पत्रकार दहशतवाद्यांच्या जाळ्यात; बगदादच्या रस्त्यावरून दिवसाढवळ्या अपहरण, इराकी पोलीस तपासात

US-Iran War: अमेरिकन पत्रकार शेली किटेलसन यांच्या अपहरणामुळे बगदादमध्ये खळबळ उडाली आहे. इराकी सुरक्षा दलांनी एका संशयिताला अटक केली असून, या कटात कताइब हिजबुल्लाहचा हात असल्याचा संशय आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 01, 2026 | 09:30 AM
american journalist shelly kittleson kidnapped baghdad kataib hezbollah suspected 2026

american journalist shelly kittleson kidnapped baghdad kataib hezbollah suspected 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • बगदादमध्ये दिवसाढवळ्या अपहरण
  • दहशतवादी संघटना ‘कताइब हिजबुल्लाह’वर संशय
  • थरारक पाठलाग अन् अटक

Shelly Kittleson kidnapped Baghdad news : युद्ध आणि संघर्षाचे(US-Israel Iran War) वार्तांकन करणाऱ्या एका धाडसी अमेरिकन पत्रकाराचे बगदादमध्ये अपहरण झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. शेली किटेलसन, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून इराक आणि सीरियातील भीषण परिस्थिती जगासमोर मांडत होत्या, त्या आता स्वतःच एका मोठ्या संकटात सापडल्या आहेत. मंगळवारी बगदादच्या गजबजलेल्या भागात ही घटना घडली, ज्याने इराकच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

बगदादच्या रस्त्यांवर थरार: वाहनांचा पाठलाग आणि अटक

इराकी गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी काही सशस्त्र व्यक्तींनी शेली किटेलसन यांना बळजबरीने एका वाहनात बसवले आणि पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच इराकी सुरक्षा दलांनी तातडीने नाकाबंदी करून अपहरणकर्त्यांचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग इतका थरारक होता की, वेगाने पळून जाण्याच्या प्रयत्नात अपहरणकर्त्यांचे एक वाहन उलटले. सुरक्षा दलांनी या वाहनातील एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र, इतर अपहरणकर्ते शेली यांना घेऊन दुसऱ्या वाहनाने पळून जाण्यात यशस्वी ठरले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Iran Oil: संकट टळले! इराण-भारत तेल व्यापार पुन्हा सुरू; खारग बेटावरून 6,00,000 बॅरल कच्चे तेल घेऊन येणारा टँकर तयार

कोण आहेत शेली किटेलसन?

शेली किटेलसन या केवळ एक पत्रकार नसून त्या इराक आणि सीरियातील राजकारणाचे गाढे अभ्यासक आहेत. पेंटागॉनचे माजी अधिकारी ॲलेक्स प्लिट्सास यांनी त्यांची ओळख पटवली असून, किटेलसन या अनेक वर्षांपासून अत्यंत संवेदनशील भागातून रिपोर्टिंग करत होत्या. अटलांटिक कौन्सिलसारख्या प्रतिष्ठित संस्थांशी त्यांचा संबंध राहिला आहे. त्यांच्या अशा प्रकारे अचानक बेपत्ता होण्याने अमेरिकन दूतावासातही तातडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कताइब हिजबुल्लाहचा ‘इतिहास’ आणि दहशतीचा कट

या अपहरणामागे ‘कताइब हिजबुल्लाह’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा दाट संशय आहे. ही संघटना इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) शी थेट संबंधित आहे. अमेरिकेला इराकमधून हाकलून लावणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापूर्वीही एलिझाबेथ त्सुरकोव्ह या विदेशी नागरिकेला या गटाने दोन वर्षे ओलीस ठेवले होते. आता पुन्हा एकदा एका अमेरिकन पत्रकाराला लक्ष्य करून या संघटनेने अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: इराण युद्धाचा शेवट! ट्रम्प यांनी जाहीर केली तारीख; ‘सत्तापालट’ झाला, आता अमेरिकन सैन्य मायदेशी परतणार

सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर धावपळ

सध्या संपूर्ण बगदाद शहराला वेढा घातला असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. इराकी सरकारने आश्वासन दिले आहे की शेली यांची सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय देखील इराकी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, ही घटना अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपहरण झालेल्या अमेरिकन पत्रकाराचे नाव काय आहे?

    Ans: अपहरण झालेल्या पत्रकाराचे नाव शेली किटेलसन (Shelly Kittleson) असून त्या दीर्घकाळापासून इराकमध्ये कार्यरत होत्या.

  • Que: या अपहरणामागे कोणत्या संघटनेचा हात असल्याचा संशय आहे?

    Ans: इराण समर्थक दहशतवादी संघटना 'कताइब हिजबुल्लाह'वर या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • Que: इराकी सुरक्षा दलांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे?

    Ans: सुरक्षा दलांनी एका संशयिताला अटक केली असून घटनेत वापरलेले एक वाहन जप्त केले आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे.

Web Title: American journalist shelly kittleson kidnapped baghdad kataib hezbollah suspected 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • America
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

India Iran Oil: संकट टळले! इराण-भारत तेल व्यापार पुन्हा सुरू; खारग बेटावरून 6,00,000 बॅरल कच्चे तेल घेऊन येणारा टँकर तयार
1

India Iran Oil: संकट टळले! इराण-भारत तेल व्यापार पुन्हा सुरू; खारग बेटावरून 6,00,000 बॅरल कच्चे तेल घेऊन येणारा टँकर तयार

War Update: इराण युद्धाचा शेवट! ट्रम्प यांनी जाहीर केली तारीख; ‘सत्तापालट’ झाला, आता अमेरिकन सैन्य मायदेशी परतणार
2

War Update: इराण युद्धाचा शेवट! ट्रम्प यांनी जाहीर केली तारीख; ‘सत्तापालट’ झाला, आता अमेरिकन सैन्य मायदेशी परतणार

खळबळजनक! पॅलेस्टिनींवर मृत्यूची टांगती तलवार? इस्रायलने जारी केल्या मृत्यूदंडाचा नवा कायदा
3

खळबळजनक! पॅलेस्टिनींवर मृत्यूची टांगती तलवार? इस्रायलने जारी केल्या मृत्यूदंडाचा नवा कायदा

War Alert : इराणनंतर आता आशियाई देशांमध्ये युद्ध पेटणार? जपानने चीनच्या दिशेने तैनाती केली खतरनाक क्षेपणास्त्रे
4

War Alert : इराणनंतर आता आशियाई देशांमध्ये युद्ध पेटणार? जपानने चीनच्या दिशेने तैनाती केली खतरनाक क्षेपणास्त्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.