Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा

Iran-US Tension : अमेरिकेने इराणला आर्थिकदृष्ट्या एकटे पाडण्यासाठी ‘Operation Economic Outcast’ अंतर्गत नवी दबाव मोहीम सुरू केली आहे. इराणच्या तेल व्यापारासह आर्थिक व्यवहारांवर निर्बंध वाढवण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेचा तेहरानने निषेध केला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 28, 2026 | 06:24 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या नव्या आर्थिक मोहिमेवर इराणचा संताप
  • स्वतंत्र देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
  • अमेरिकेच्या दबावामुळे जागतिक व्यापारावर परिणामाची शक्यता
Iran-US Tension : अमेरिकेने इराणला आर्थिकदृष्ट्या एकटे पाडण्यासाठी नव्या दबाव मोहिमेला सुरवात केली आहे . अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट यांनी इराणच्या महसुलाचे स्रोत , तेल व्यापार आणि आर्थिक व्यवहारांवर कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे . या मोहिमेचे नाव ” operation Economics Outcast ” असे ठेवण्यात आले आहे . अमेरिकेच्या या भूमिकेमुळे तेहरान आणि वाशिंग्टनमधील तणाव आणखी वाढला आहे .

Nepal Flood : अचानक आलेल्या पुराचा कहर; मृतांचा आकडा ५३८ वर

अमेरिकेच्या नव्या आर्थिक मोहिमेवर इराणचा संताप

अमेरिकेच्या आर्थिक दबावाच्या नव्या मोहिमेवर इराणने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . तेहरानने यापूर्वीही अमेरिकेच्या निर्बंधांना विरोध केला असून , नव्या मोहिमेमुळे इराणच्या तेल निर्यातीपासून आर्थिक व्यवहारापर्यंत विविध क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे .

अमेरिकेने इराणशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या इतर देशांवर आणि कंपन्यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे . त्यामुळे इराणच्या जागतिक व्यापार आणि आर्थिक नेटवर्क आणखी अडचणीत आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असलयाचे स्पष्ट होत आहे .

स्वतंत्र देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

इराणने अमेरिकेच्या या धोरणावर जोरदार टीका करताना , एका देशाची इच्छा स्वतंत्र राष्ट्रांवर लादण्याचा प्रयत्नाला इतर देशांनी साथ देऊ नये असा इशारा दिला आहे . तेहरानने अमेरिकेच्या आर्थिक दबाव मोहिमेला विरोध करण्याचे आवाहन करत देशांच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे .

इराणच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या निर्बंधामुळे देशाला झुकवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे . दरम्यान इराणने अमेरिकेच्या मोहिमेत सहभागी होणाऱ्या देशांबाबत कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

Nepal flash flood: हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या महापुराने हाहाकार; भारतासह ३० हून अधिक देशांतील नागरिक बेपत्ता

अमेरिकेच्या दबावामुळे जागतिक व्यापारावर परिणामाची शक्यता

अमेरिकेची नवीन आर्थिक मोहीम केवळ इराणपुरती मर्यादित नसून इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे . विशेषतः तेल व्यापार आणि आर्थिक व्यवहारांमध्ये इराणशी संबंध असलेल्या देशांसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते . चीन तुर्की इराक आणि पाकिस्तानसारखे देश इरांसोबतचे संबंध आणि अमेरिकेचा दबाव यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यामुळे पुढील काळात इराण – अमेरिका संघर्षाचा परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरता न राहता जागतिक व्यापार आणि बाजारावरही जाणवू शकतो .

Web Title: Iran us tension iran takes an aggressive stance against us economic pressure issues a warning to all nations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • Economic News
  • Iran News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.