
Trump and Netanyahu
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना एक फोन आला होता. यावेळी त्यांनी अमेरिकेला इराणवर हल्ला न करण्याचे आवाहन केले.वॉशिंग्टन पोस्टने, व्हाइट हाउसच्या सूत्राचा हवाला देत सांगितले आहे की, नेतन्याहूंनी ट्रम्प यांना इराणवर हल्ला न करण्याचे आवाहन दिले होते.
अहवालानुसार, नेतन्याहूंनी ट्रम्प यांना सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने हल्ला केल्यास इस्रायल त्याला प्रत्युत्तर देण्यास सक्षम नसल्याचे ट्रम्प यांना म्हटले. यामुळे ट्रम्प यांनी आपला हल्ला मागे घेतला असल्याचा दावा केला जात आहे. नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले की, अमेरिकेने इराण जवळच्या प्रदेशामध्ये पुरेसे सैन्य तैनात केलेले नाही. तसेच इस्रायलला ही इराणी हल्ल्यापासून बचावासाठी पुरेसे क्षेपणास्त्र आणि ड्रोन पुरवण्यात आलेले नाही.
यामुळे इस्रायल स्वत:चे रक्षण करु शकणार नाही. परिणामी अमेरिकेला याचा गंभीर परिणाम भोगावा लागला. कारण इस्रायल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेच्या सैन्यावर अवलंबून आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी ट्रम्प आणि नेतन्याहूंमध्ये चर्चा झाली होती.
दरम्यान याच वेळी सौदी अरेबियाने ट्रम्प यांना इराणवर हल्ला न करण्याचा इशारा दिला होता. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांना कॉल केला होता. त्यांनी प्रादेशिक सुरक्षेच्या कारणास्तवर हल्ला न करण्याचा सल्ला ट्रम्प यांना दिला होता. यामुळे इस्रायल आणि सौदी अरेबियाच्या या सल्ल्यामुळेच ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचा निर्णय मागे घेतला असल्याचे म्हटले जात आहे. विशेषत: नेतन्याहूंच्या दबावामुळेच इराणवर अमेरिकेचा संभाव्य हल्ला टळला आहे.
Ans: अमेरिकेला इराणवर हल्ला न करण्याचा सल्ला इस्रायल आणि सौदी अरेबियाकडून मिळाला होता. यामुळे इस्रायलीच्या विनंतीवरुन अमेरिकेने इराणवर हल्ला केला नसल्याचे म्हटले जात आहे.
Ans: इस्रायलकडे अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणी हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेसे शस्त्र नव्हते. यामुळे इस्रायल स्वत: चे संरक्षण करु शकला नसता. म्हणून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यापासून रोखले.