
फोटो सौजन्य सोशल मीडिया
जागतिक राजकारणाच्या वर्तुळात असे बोलले जाते कि मध्यस्थी करणारा देश हा महत्वपूर्ण असावा . त्याच्या शब्दाला दोन्ही देशांसमोर वजन असावे . विश्वास असावा लागेल तरच इराण आणि अमेरीकेमध्ये मध्यस्ती करून शांतता प्रस्थापित करता येईल . यासाठी चीन हा सर्वोत्तम मार्ग आहे . कारण चीन ची गरज ही दोन्ही देशांना आहे . पण प्रत्यक्षात मात्र चीन आणि अमेरिका यांमध्ये छुपे वर्चस्व युद्ध सुरु असताना अमेरिका चीनचा पर्याय स्वीकारेल असे सध्या तरी वाटत नाही . आता येणारा काळ याची उत्तरं देऊ शकतो .
इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आता राजनैतिक पातळीवरही हालचाली वाढताना दिसत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या निमित्ताने अमेरिका इराणसोबत चर्चेसाठी तयार असल्याचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष बैठक अद्याप निश्चित झालेली नाही. इराणच्या अणुकार्यक्रमासह प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याने, यूएनच्या व्यासपीठाकडे आता आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.
Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी NBC News ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला इराणच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास हरकत नाही. मात्र, अमेरिका-इराण बैठक अद्याप अधिकृतपणे ठरलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रुबिओ यांच्या म्हणण्यानुसार, अशी बैठक झाली तर तिच्यामधून ठोस आणि सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता असणे आवश्यक आहे. अमेरिकेच्या भूमिकेतील प्रमुख मुद्दा म्हणजे इराणने अण्वस्त्र मिळवू नये, हा आहे. त्यामुळे संभाव्य चर्चेत इराणचा अणुकार्यक्रम हा महत्त्वाचा विषय ठरू शकतो.
US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यूयॉर्कमध्ये येण्याची परवानगी अमेरिकेने दिली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना एकाच ठिकाणी येऊन अनौपचारिक किंवा औपचारिक चर्चा करण्याची संधी निर्माण झाली आहे. दरम्यान, इराणकडूनही काही अटींवर हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची तयारी व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, या घडामोडींना सध्या अधिकृत अमेरिका-इराण करार किंवा निश्चित बैठकीचा निर्णय मानता येणार नाही. रुबिओ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बैठक अद्याप शेड्यूल झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत यूएनमध्ये दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष चर्चा होते का, याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.