
Middle East War
‘यावेळी निशाणा चुकणार नाही’ ; इराणची थेट ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी, मध्यपूर्वेत युद्ध पेटणार?
मार्शल लॉ लागू केल्यानंतर इराणमध्ये अनेक निर्बंध लागू झाले आहे. देशभरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहेत. तसेचजमावबंदी आणि प्रवासावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इंटरनेट आणि मोबाईल सुविधा बंद असल्याने इराणमधील परिस्थितीबाबत नेमकी माहिती मिळणे अधिक कठणी झाले आहे. सामान्य नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण पसरले आहे. त्यांचे दैनंदिन जीव विस्कळीत झाले आहे. याशिवाय सरकारने रिव्होल्यूशनरी गार्ड आणि लष्कराला नियंत्रण दिल्याने मार्शल लॉचे उल्लंघन झाल्यास थेट कारवाई होण्याची शक्यता आहे.
याच वेळी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला वाढत्या हिंसक आंदोलन आणि सरकारच्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे इराणी सरकार अधिक आक्रमक झाले आहे. इराणने त्यांच्या देशातील हिंसक परिस्थितीसाठी अमेरिका (America) आणि इस्रायल (Israel) कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने हल्लेखोरांना इराणी जनतेला भडकण्याचे आदेश दिले असून यामुळेच त्यांच्या देशात अस्थिरता निर्माण झाले असल्याचे म्हटले खामेनी सरकारचे मत आहे.
तसेच अमेरिकेकडून लष्करी कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर इराणने देखील ट्रम्प यांना थेट हत्येची धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने मार्शल लॉ लागू केला असून यामुळे अमेरिकेची कारवाई अपयशी ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
२८ डिसेंबर २०२५ रोजी इराणच्या सरकारविरोधी निदर्शने सुरु झाली होती. वाढती महागाई, देशांतर्गत आर्थिक संकट आणि बेरोजगारी विरोधात सुरुवातीला निदर्शने सुरु होती. परंतु आंदोलकांना चिरडण्यासाठी बळाचा वापर करण्यात आल्याने ही निदर्शने अधिक हिंसक झाली. पुढे या निदर्शनाला धार्मिक स्वरुप प्राप्त झाले. शिवाय राजेशाही पुन्हा स्थापित करण्याची मागणीही होऊ लागली. या निदर्शनांमध्ये आता पर्यंत हजारोंचा बळी गेला आहे, अनेकजण जखमी झाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माय झाले आहे.
Iran Crisis : इराणमधील परिस्थिती बिकट! MEA चा भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा इशारा
Ans: इराणमध्ये वाढत्या सरकाविरोधी आंदोलन, हिंसाचार आणि कायदा-सुव्यवस्था बिघडल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे.
Ans: मार्शल लॉ लागू केल्यामुळे कर्फ्यू, जमावबंदी, प्रवासावर निर्बंध, आणि इंटरनेट-फोन सेवाबंद असणार आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिकट होऊन हिंसाचार वाढण्याची शक्यता आहेत. तसेच लष्कराकडे नियंत्रण असल्याने परिस्थिती अधिक बिकट होण्याची भिती आहे.
Ans: इराणमधील अस्थिरता आणि दडपशाहीमुळे अमेरिका इराणमधील तणाव अधिक वाढेल, यामुळे दोन्ही देशात संघर्ष होण्याची शक्यता आहे.