Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

Iran Trolls UN : इराणच्या दूतावासाने डॉक्टर स्ट्रेंज आणि 'शोले'मधील ठाकूर यांना दाखवणारे एक मीम शेअर करून संयुक्त राष्ट्रांवर टीका केली आहे. या पोस्टमध्ये संयुक्त राष्ट्रांची बलस्थाने आणि मर्यादा यांची तुलना करण्यात आली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 30, 2026 | 02:29 PM
Iranian Embassy Trolls UN Iran Sholay Thakur Meme UN in Books vs UN in Reality

Iranian Embassy Trolls UN Iran Sholay Thakur Meme UN in Books vs UN in Reality

Follow Us
Follow Us:
  • ‘शोले’च्या ठाकूरशी तुलना
  • पुस्तकातील विरुद्ध वास्तववाद
  • पॉप कल्चर आणि डिजिटल कूटनीती

जागतिक पातळीवर सुरू असलेल्या भीषण युद्ध आणि राजकीय तणावाच्या काळात सोशल मीडिया (Iran Trolls UN) हे केवळ संवादाचे माध्यम उरले नसून राजनैतिक अस्त्र बनले आहे. अमेरिकेसोबतच्या वाढत्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपली बाजू मांडण्यासाठी एक नवा आणि अनोखा मार्ग शोधून काढला आहे. भारतातील इराणी दूतावासाने (Embassy of Iran in India) नुकताच आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक अत्यंत मजेशीर आणि बोचरा मीम शेअर केला आहे. या मीमच्या माध्यमातून इराणने जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरणाऱ्या संयुक्त राष्ट्रांवर (UN) थेट निशाणा साधत, त्यांची तुलना बॉलिवूडच्या ‘शोले’ चित्रपटातील प्रसिद्ध पात्र ‘ठाकूर बलदेव सिंग’शी केली आहे.

इराणी दूतावासाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एका बाजूला मार्वल कॉमिक्सचा प्रसिद्ध काल्पनिक सुपरहिरो आणि न्यूरोसर्जन ‘डॉक्टर स्ट्रेंज’ दाखवला आहे. या डॉक्टर स्ट्रेंजला अनेक जादुई हात असल्याचे दिसतात. या चित्राला त्यांनी “शालेय पुस्तकांनुसार संयुक्त राष्ट्र” (UN in books) असे कॅप्शन दिले आहे. यातून असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे की, कागदोपत्री किंवा पुस्तकांमध्ये संयुक्त राष्ट्र ही अत्यंत शक्तिशाली संस्था वाटते, जी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर प्रभावीपणे काम करू शकते. परंतु, फोटोच्या दुसऱ्या बाजूला १९७५ च्या ऐतिहासिक ‘शोले’ चित्रपटातील अभिनेते संजीव कुमार यांनी साकारलेले ‘ठाकूर’ यांचे चित्र लावले असून, त्याखाली “वास्तविकतेतील संयुक्त राष्ट्र” (UN in reality) असे लिहिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

‘शोले’ चित्रपटात डाकू गब्बर सिंगने ठाकूर…

‘शोले’ चित्रपटात डाकू गब्बर सिंगने ठाकूर यांचे दोन्ही हात कापलेले असतात, ज्यामुळे ठाकूर अन्यायाविरुद्ध लढण्याची इच्छा असूनही असहाय्य आणि हतबल ठरतात. इराणने याच ऐतिहासिक दृश्याचा वापर करून संयुक्त राष्ट्रांचे वास्तव जगासमोर मांडले आहे. जागतिक स्तरावर मोठे युद्ध पेटलेले असताना, महासत्ता असणारे देश निष्पापांवर अत्याचार करत असताना संयुक्त राष्ट्र मात्र दोन्ही हात बांधलेल्या किंवा हात गमावलेल्या ‘ठाकूर’प्रमाणे केवळ लाचारपणे आणि असहाय्य होऊन पाहत बसले आहे, असा खोचक टोला या मीमद्वारे लगावण्यात आला आहे.

या मीमच्या टायमिंगची सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात मोठी चर्चा

या मीमच्या टायमिंगची सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची ८१ वी महासभा (UN General Assembly) नुकतीच पार पडली, जिथे जगभरातील बडे नेते एकत्र आले होते. मात्र, या बैठकांमध्ये जगातील रक्तांनपात थांबवण्यासाठी किंवा युद्धबंदीसाठी कोणताही ठोस व निर्णायक निर्णय घेतला गेला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या या अकार्यक्षमतेवर जगभरातून आधीच टीका होत असताना, इराणने योग्य वेळी भारतीय प्रेक्षकांना भावणाऱ्या बॉलिवूड संदर्भाचा वापर करत जागतिक संस्थेला उघडे पाडले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Leaves Iraq : इराक सोडताना अमेरिकेची मोठी कबुली; सामूहिक संहारक शस्त्रांशिवाय अशी उलथवली सद्दाम हुसेनची सत्ता

डिजिटल कूटनीती

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इस्रायलविरोधातील युद्धात इराण आणि जगभरातील इराणी दूतावास अतिशय आक्रमकपणे ‘डिजिटल कूटनीती’ (Digital Diplomacy) आणि ‘पॉप कल्चर’चा वापर करत आहेत. केवळ गंभीर राजकीय विधाने देण्याऐवजी, स्थानिक लोकांना पटकन समजतील असे मीम्स, व्यंगचित्रे, चित्रपट सीन आणि AI-निर्मित व्हिडिओंद्वारे आपले विचार पोहोचवण्याचे तंत्र इराणने आत्मसात केले आहे.

UN according to school books
UN in reality pic.twitter.com/GQ4gOG8fC0
— Iran in India (@Iran_in_India) September 29, 2026

credit – social media and Twitter

इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक डायलॉग

‘इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक डायलॉग’च्या एका अहवालानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून इराणी दूतावासांच्या सोशल मीडिया खात्यांवरील हालचालींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पहिल्या ५० दिवसांत या खात्यांना तब्बल ८९६ दशलक्ष व्ह्यूज आणि २२ दशलक्ष लाईक्स मिळाले, जे पूर्वीच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहेत. भारतीय प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यासाठी इराणी दूतावासाने वापरलेली ही ‘शोले’ डिजिटल ट्रॉलिंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्सकडून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title: Iranian embassy in india trolls un with sholay thakur and doctor strange meme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • iran
  • memes
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US Leaves Iraq : इराक सोडताना अमेरिकेची मोठी कबुली; सामूहिक संहारक शस्त्रांशिवाय अशी उलथवली सद्दाम हुसेनची सत्ता
1

US Leaves Iraq : इराक सोडताना अमेरिकेची मोठी कबुली; सामूहिक संहारक शस्त्रांशिवाय अशी उलथवली सद्दाम हुसेनची सत्ता

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी
2

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
3

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
4

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.