
Irans action against Israel, Mossad spy hangs to death
Iran Israel News : तेहरान : एक मोठे वृत्त समोर आले आहे. इराणने इस्रायली गुप्तचर संस्था मोसादला मोठा धक्का दिला आहे. मोसादच्या दोन गुप्तहेरांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. इराणच्या कोम शहरातील एका व्यक्तीला इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या संशयाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला यासाठी इराणच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. इराणच्या माध्यमांनी याची माहिती दिली.
इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. परंतु संबंधित व्यक्तीने बचावासाठी दया याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत शनिवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी फाशीची शिक्षा सुनावली. सध्या आरोपीचे नाव अधिकृत करण्यात आलेले नाही.
पण आरोपीवर झिओनिस्ट राजवटीला इराणची गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याला भ्रष्टाचार आणि इस्लाम धर्माविरोधी शत्रु ठरवण्यात आले आहे. आरोपीला इस्लामिक दंड संहितेनुसार मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीला २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. इस्रायली गुप्तहेरांशी संपर्क साधल्याच्या आणि त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली होती. आरोपीने इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या मोहिमा इराणमध्ये राबवल्या असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सध्या याबाबत इतर कोणतीही माहिती अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाही.
यापूर्वी देखील जुलै २०२५ मध्ये झालेल्या संघर्षानंतर इराणने इस्रायलच्या मोसादासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली काहींनी अटक केली होती. त्यांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या व्यक्तींवर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी हेरगिरी करण्याच्या या व्यक्तींना अटक केली आहे. या सर्वांवर सायबर स्पेसद्वारे मोसादला इराणची गुप्त माहिती पाठवल्याचा आरोप इराणने केला होता. इराणने या गुप्तहेरांवर कायदेशीर खटलाही चालवला होता.
तसेच काही दिवसांपूर्वी २९ सप्टेंबर रोजी देखील एका संशयिताला इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यानंतर त्याला चौबियासलवर इस्रायलला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोपाखील अरक तुरुंगात फाशी देण्यात आली.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. इराणने इस्रायलविरोधात काय कारवाई केली?
इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी इराणची हेरगिरी करणाऱ्या गुप्तहेराला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
प्रश्न २. इराणने फाशी सुनावलेल्या व्यक्तीवर काय आरोप केले आहेत?
इराणने मोसादच्या गुप्तहेरावर झिओनिस्ट राजवटीला इराणची गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याला भ्रष्टाचार आणि इस्लाम धर्माविरोधी शत्रु ठरवण्यात आले आहे.