IIsrael Iran War : युद्धादरम्यान इराणची मोठी कारवाई; इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्याला सुनावली फाशीची शिक्षा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News Marathi : सध्या मध्य पूर्वेत विनाशाचे वादळ उठले आह. अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणु तळांवर २२ जून रोजी हल्ला केला होता. यानंतर इस्रायल आणि इराणमधील युद्ध टोकाला पेटले आहे. इराण इस्रायलवर हल्ले करत आहे. तसेच इराणने अमेरिकेला देखील प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे. याच दरम्यान आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इराणने एका व्यक्तीला इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा दिली आहे.
अलीकडेच इराणने इस्रायलवरील हल्ल्यानंचक दोन व्यक्तींना अटक केली आहे. इराणने या व्यक्तींवर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी हेरगिरी करण्याच्या या व्यक्तींना अटक केली आहे. यामधील एका इराणने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीचे नाव मोहम्मद अमीन महदवी आहे. तसेच सध्या दुसरी व्यक्ती इराणच्या कैदेत आहे. ही शिक्षा अशा वेळी देण्यात येत आहे, जेव्हा मध्य पूर्वेत अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण आणि इस्रायलमधील युद्ध तीव्र भडकले आहे.
इस्रायलने १३ जून रोजी इराणवर हल्ला केला. यानंतर मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला. इस्रायलने इराणच्या अणु मुख्यालयांवर, तसेच लष्करी तळांवर आणि अधिकाऱ्यांर हल्ला केला होता. इराणने देखील याच्या प्रत्युत्तरात इस्रायलच्या मुख्यालयांवर आणि प्रमुख शहरांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत होते. यामध्ये इराणच्या ६०० हून अधिक लोकांचा बळ गेला तर इस्रायलच्या २४ नागरिकांचा बळी गेला. तसेच इराणच्या अनेत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना इस्रायलने ठार केले.
इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात होती. दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि चर्चेचा मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले जात होते. याच वेळी अमेरिकेन या युद्धात एन्ट्री केली. आधीच इस्रायलला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेने इराणवर हल्ला केला. अमेरिकेने इस्रायलला आपले उघड समर्थन दर्शवले.
अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुथ लष्करी तळांवर बी-२ बॉम्बरने हल्ला केला. यामध्ये इराणच्या नतान्झ, फोर्डो, आणि इस्फाहन या तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत सुरु असलेला संघर्ष अधिक चिघळला आहे. सध्या इराण अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. याच वेळी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत देखील इराणला अणुकार्यक्रम बंद करण्यास सांगितले जात आहे.