Israel Iran War : इस्रायलच्या मोसादला मोठा धक्का! युद्धबंदीच्या चर्चांदरम्यान ६ गुप्तहेरांना इराणकडून अटक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News Marathi : मंगळवारी (२४ जून) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करत म्हटले की, इस्रायल आणि इराण दोन्ही देशांनी माझ्याकडे युद्धबंदीची विनंती केली. आता दोन्ही देशांनी शांती आणि समृद्धीच्या मार्गावर चालावे. कोणत्याही पक्षाने याचे उल्लंघन करु नये असले त्यांनी म्हटले. परंतु इराणने युद्धबंदीचा ट्रम्प यांचा दावा नाकारला आहे. तसेच मंगळवारी सकाळी इस्रायल आणि इराण दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले चढवले आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेला मोठा धक्का बसला आहबे. इराणने दावा केला आहे की, मोसादच्या ६ गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर सायबर स्पेसद्वारे मोसादला इराणची गुप्त माहिती पाठवस्या आरोप आहे. इराणने या गुप्तहेरांवर कायदेशीर खटला चालवला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या सर्व गुप्तहेरांना इराणच्या हमादान प्रांतातून अटक करण्यात आली आहे. यांना पकडण्यासाठी इराणची गुप्तचर संस्था यांच्यावर देखरेख ठेवून होती. मात्र अद्याप इस्रायल किंवा मोसादकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
इराणच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेले गुप्तहेर इस्रायलच्या इशाऱ्यावर काम करत होते. या गुप्तहेरांनी मोसादला इराणसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण माहितीचा पुरवठा केला आहे. तसेच स्थानिक लोकांना देखील इराणी सरकारविरुद्ध भडकवण्याचे कार्य केले आहे. इराणने या गुप्तहेरांनवर देशद्रोहाचा आरोप केला आहे. याअंतर्गत या गुप्तहेरांना फाशीची शिक्षा दिली जाण्याची शिक्षा आहे.
गेल्या आठवड्यात युद्ध सुरु झाल्यापासून इराणने मोसादच्या जवळपास २० गुप्तहेरांना अचक केल्याचे म्हटले आहे. यामध्ये दोन गुप्तहेरांना फाशी देण्यात आली आहे. रविवारी देखील इराणने मोसादासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली होती. सध्या इराण मोसादवर आपली पकड घट्ट करत आहे. इराणच्या इंटननॅशलने म्हटले आहे की, मोसादचे गुप्तहेर ट्रक ड्रायव्हर बनून इराणमध्ये प्रवेश करत आहेत.
सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा जरी करण्यात आली असली तरी दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ले करत आहेत. दोन्ही देशांच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी जात आहे. अशातच युद्धबंदीसाठी ट्रम्प यांनीत विनंती केली होती असा दावा देखील इराणने केला आहे. सध्या या सर्व परिस्थितीमुळे मध्य पूर्वेत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.