Iran's big claim, says Israel's nuclear program secret documents are seized by iran's Intelligence
तेहरान: सध्या इराण आणि इस्रायलमधील तणाव पुन्हा वाढत आहे. इराणच्या अणु कार्यक्रमावर धक्कादाक माहितींचा खुलासा होत आहे. अशातच इराणने आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खतीब यांनी एक वादग्रस्त विधान केली आहे. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान संतापण्याची शक्यता आहे.
मंत्री इस्माइल यांनी इस्रायलच्या अणुकार्यक्रमाशी संबंधीत हजारो गुप्तपत्रे जप्त केल्याचे म्हटले आहे. परंतु या दाव्यावर इस्माइल खतीब यांनी कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खतीबा यांनी रविवारी (८ जून) एक निवेदन जारी केली आहे. या निवेदनात त्यांनी इस्रायलशी संबंधित धोरणात्मक, ऑपरेशनल आणि वैज्ञानिक माहितीची गुप्त कागदपत्रे मिळवल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की, ही सर्व कागपत्रे लकरच सार्वजनिक केली जाणार आहे.
इराणचे गुप्तरच मंत्री इस्माइल खतीब यांनी हा खळबळजक दावा करण्याच्या एक दिवस आधी, तेहरानच्या सरकारी माध्यमांनी याबाबत खुलासा केला होता. इस्माइल खतीब आणि सरकारी माध्यमांनी कोणत्याही ठोस पुराव्यासह इस्रायलची गुप्तचर कागदपत्रे जप्त केली गेल्याची माहिती दिली.
टीव्ही रिपोर्ट्स किंवा खतीब यांनी कोणताही ठोस पुरावा सादर न करता ही माहिती दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परंतु अद्याप इस्रायलकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे हा दावा खरा असण्याचीही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी २०१८ मध्ये इस्रायलने इराणचे अणु दस्तऐवज चोरल्याचा दावा केला होता. याच्या प्रत्युत्तरात इराणने हा दावा केला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यावेळी नेतन्याहूंनी इस्रायलच्या गुप्तचर संस्थांच्या एजंटने तेहरानमधून अर्धा टन अणुसंबंधित माहिती मिळल्याचा दावा केला होता. यामुळे इराण सध्या तेही प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचे दाखवू इच्छित आहे.
सध्या इराण अणु कार्यक्रमांच्या अगदी जवळ पोहचल्याचे म्हटले जात आहे. यामुळे इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेच्या बैठकीत इराणला असहकार्य घोषित करण्यात आले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत हा मुद्दा मांडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. इराणवर कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच अमेरिका आणि इराणमध्ये ओमानच्या मध्यस्थीने इराणच्या अणुकार्यक्रमांबाबत करारावर चर्चा सुरु आहे. परंतु इराणने दिवसेंदिवस आपला युरेनियमचा साठी वाढवत आहे, यामुळे या चर्चेबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराण आणि अमेरिकेत अणुकराराबाबती पाचवी फेरी झाली आहे. पण यानंतर अद्याप एकदाही चर्चा झालेली नाही.
शिवाय अमेरिकेने नवीन प्रस्ताव सादर केला आहे, ज्याला मान्य करण्यास इराणने नकार दिला आहे. यामुळे पाश्चत्य देशांकडून इराणवर दबाव वाढवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरु आहे.
इराणने युरेनिमयच्या साठ्यात ६० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे इराण अणु शस्त्रे बनवण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहे. अमेरिकेची इराणशी अणुचर्चा यशस्वी न झाल्यास आणि इराणने अण्वस्त्रे बनवल्यास जगाला धोका निर्माण झाला आहे.
अमेरिका आणि इस्रायल इराणविरोधी कारवाई करण्याची शक्यता आहे. यामुळे तिसऱ्या युद्धची ठिणगी पडेल. तसेच इराणचा दावा खरा ठरला तर इस्रायलच्या गुप्तचर संस्थाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.