इस्रायलची आता खैर नाही! इराणने चीनसोबत केला 'हा' मोठा करार; ट्रम्प यांनाही मोठा झटका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान: ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहूंना आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. इराणच्या अणुइंधन चक्र पूर्ण झाल्याच्या चर्चांदरम्यान इराणने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. इराणने चीनसोबत मोठा करार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराण चीनकडून अमोनियम परक्लोरेट पावडर खरेदी करणार आहे. या पावडरचा वापर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी केला जातो. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, चीन जूलै महिन्यापर्यंत इराणला अमोनियम परक्लोरेट पावडरची डिलिव्हरी पूर्ण करले. याचा वापर करुन इराण बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा तयरा करणार आहेत.
अहवालात दिले ल्या माहितीनुसार, इराण ८०० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी चीन आणि इराणमध्ये अमोनियम परक्लोरेट पावडरचा करार केला आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायसची चिंता वाढली आहे. सध्या इराणकडे तीन हजारांहून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. अलीकडेच इराणने याचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला होता.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, या ८०० कबॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठी इराण हुथी बडखोरांना देण्याची योजना आखत असल्याचे म्हटले आहे. एकीकडे इस्रायलवर हुथी बंडखोरांचा हल्ला सुरु असताना ही माहिती समोर आली आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
इस्रायलच्या गाझावरील कारवायांमुळे हुथी बंडखोर हल्ला करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या हीच संघटना इस्रायलवर सतत हल्ले करत आहे. हमास आणि हिजबुल्लाह संघटना सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
चीनशी अमोनियम परक्लोरेट पावडरचा करार करण्याच्या एक दिवस आधीच इराणने एक मोठा धक्का ट्रम्प आणि नेतन्याहूंना दिला होता. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इराणने अणु इंधन चक्र पूर्ण केल्याचा दावा केला होता. अणु इंधन चक्र (nuclear fuel cycle) ही एक अणुउर्जेसाठी तयार केली जाणारी इंधन प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे अणुभट्टी उभारण्यास मदत होते. यावरुन इराण आपल्या अण्वस्त्रे बनवण्याच्या जवळ पोहोचला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एकीकडे इराण अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करत आहे, तसचे दुसरीकडे आपल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रचा साठा वाढवण्याच्या तयारीत आहे. यामुळे भविष्यात मोठे काहीतरी घडण्याची शंका निर्माण झाली आहे.