Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: “युद्धविराम नाही, रक्ताचा बदला घेणार…”, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इस्रायलला पहिला कडक इशारा

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनीई यांनी अमेरिकेचा सीजफायर प्रस्ताव फेटाळला आहे. "रक्ताचा बदला घेणार" असा इशारा देत त्यांनी इस्रायलला आव्हान दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 17, 2026 | 08:14 PM
World War 3: “युद्धविराम नाही, रक्ताचा बदला घेणार…”, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इस्रायलला पहिला कडक इशारा
Follow Us
Follow Us:

  • “युद्धविराम नाही, रक्ताचा बदला घेणार…”
  • इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इस्रायलला पहिला कडक इशारा
  • म्हणाले…
Israel Iran War: मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचलेला असताना इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनीई यांनी जागतिक राजकारणात खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. अमेरिकेने दिलेला युद्धविरामाचा (Ceasefire) प्रस्ताव फेटाळून लावत खामेनीई यांनी इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्ही कोणताही समझोता करणार नाही, तर आमच्यावर झालेल्या हल्ल्यांचा आणि सांडलेल्या रक्ताचा सूड घेऊ,” असा कडक संदेश त्यांनी आपल्या पहिल्या अधिकृत परराष्ट्र धोरण बैठकीत दिला आहे.

युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला

न्यूज एजन्सी ‘रॉयटर्स’ने इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दोन मध्यस्थ देशांमार्फत अमेरिकेने तेहरानला युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, मोजतबा खामेनीई यांनी हा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळून लावला. सर्वोच्च नेते म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी घेतलेली पहिलीच बैठक अत्यंत गंभीर होती. या बैठकीत त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेला ‘शत्रू’ संबोधून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची शपथ घेतली.

“शत्रूची मालमत्ता जप्त करू किंवा त्यांना उद्ध्वस्त करू”

आपल्या पहिल्या अधिकृत निवेदनात मोजतबा खामेनी यांनी केवळ इस्रायलला इशारा दिला नाही, तर आक्रमक धोरणाचे संकेतही दिले. ते म्हणाले, “युद्धात मारल्या गेलेल्या आमच्या निष्पाप नागरिकांच्या आणि दिवंगत अयातुल्ला अली खामेनीई यांच्या मृत्यूचा बदला घेणे ही आमची प्राथमिकता आहे. इराण आपल्या शत्रूंकडून नुकसान भरपाई घेऊनच राहील. जर त्यांनी नकार दिला, तर आम्ही त्यांची जगभरातील मालमत्ता जप्त करू किंवा त्यांना त्याच थराला जाऊन नष्ट करू.” शहीद झालेल्यांच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी इराण पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Middle East Conflict : वडिलांची हत्या, कमांडरचे अक्षरशः लचके तोडले…; अमेरिकी हल्ल्यातून कसे बचावले मोजतबा खामेनेई?

मोजतबा यांच्या प्रकृतीबाबत गूढ कायम; रशियात उपचार सुरू?

खामेनीई यांचे हे आक्रमक विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा त्यांच्या आरोग्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कुवेती वृत्तपत्र ‘अल-जरीदा’ने दावा केला आहे की, २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनीई गंभीर जखमी झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतः फोन करून वैद्यकीय मदतीची ऑफर दिली होती, ज्यानंतर एका रशियन लष्करी विमानाने त्यांना उपचारासाठी मॉस्कोला नेण्यात आले आहे.

इस्रायलची टीका: “इराणसाठी ही शरमेची बाब”

दुसरीकडे, इस्रायलने मोजतबा खामेनीई यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने संशय व्यक्त केला आहे. मोजतबा हे कोमामध्ये असल्याचा दावा काही इस्रायली माध्यमांनी केला होता. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, “अनेक दिवसांपासून कोणालाही मोजतबा खामेनीई यांचा चेहरा दिसलेला नाही. आपल्या सर्वोच्च नेत्याची स्थिती स्पष्ट न करणे, ही इराणसाठी शरमेची बाब आहे.” या सर्व दाव्यांच्या पार्श्वभूमीवर मोजतबा खामेनीई यांचे आलेले आक्रमक पत्रक हे केवळ कागदी इशारा आहे की इराण खरोखर मोठ्या युद्धाच्या तयारीत आहे, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.

Kabul Hospital Attack : ‘मोठी चूक केली…’ ; अफगाणिस्तानच्या रुग्णालयावरील हल्ल्यावरुन भारताने पाकिस्तानला सुनावलं

Web Title: Irans new supreme leader mojtaba khamenei issues his first stern warning to israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World War 3

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.