Kabul Hospital Attack : 'मोठी चूक केली...' ; अफगाणिस्तानच्या रुग्णालयावरील हल्ल्यावरुन भारताने पाकिस्तानला सुनावलं (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताने पाकिस्तानच्या काबुलमधील रुग्णालयावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रलयाने (MEA) मंगळवारी (१७ मार्च २०२६) एक अधिकृत निवदेन जारी केले आहे. या निवेदनात भारताने पाकिस्तानच्या काबुलमधील रुग्णालयावरील हल्ल्यांवर तीव्र टीका केली.
भारताने म्हटले की, ‘नि:शस्त्र नागरिक आणि रुग्णांवर केलेली हिंसा कोणत्या प्रकारे लष्करी कारवाई नाही. विशेष म्हणजे रमजानच्या पवित्र महिन्यात हल्ला करण्यात आल्याने भारताने तीव्र संताप व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करणे हे केवळ आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघनच नव्हे, तर अमानवीय कृत्य आहे.
कोणताच धर्म किंवा कायदा रुग्णालयांवर हल्ला करण्याची परवानगी देत नाही असे भारताने ठणकावून सांगितले आहे. याशिवाय भारताने पाकिस्तानवर देशांतर्गत अपयशांवरुन जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी अफगाणिस्तावर हल्ला केल्याचा आरोपही केला आहे.
याच पार्श्वभूमीवर भारताने आंतररष्ट्रीय समुदायला पाकिस्तानच्या या कृत्याची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाचे आणि प्रादेशिख अखंडतेचे उल्लंघन करणारा म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तानला कठीण राळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.
Our statement on Pakistan’s cowardly targeting of Kabul Hospital 🔗 https://t.co/uYbQhhc8MC pic.twitter.com/KVEaLyBtTB — Randhir Jaiswal (@MEAIndia) March 17, 2026
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या हल्ल्याता तीव्र निषेध केला. त्यांनी पाकिस्तानच्या हल्ला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, हल्ल्याच्या वेळी रुग्णालय रुग्णांनी गजबजलेले होते. या हल्ल्यामुळे रुग्णालय जमिनदोस्त झाले असून आतापर्यंत ४०० हून अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर २५० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे प्रवक्ते मोशरफ जैदी यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. काबूलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य केले गेले नाही. पाकिस्तानचे सैन्य फक्त ज्या ठिकाणाहून त्यांच्यावर हल्ले केले गेले, त्यांच्यावरच हल्ला केल्याचे स्पष्ट केले.
Middle East War : आता फक्त भारतच जगाला वाचवू शकतो? युद्ध थांबवण्यासाठी फिनलँडची PM मोदींकडे धाव
Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सोमवारी (१६ मार्च २०२६) रुग्णालयावर भीषण हवाई हल्ला केला.
Ans: भारताने पाकिस्तानच्या काबुलमधील हल्ल्यावर कठोर भूमिका घेतली आहे. भारताने या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंरडेते उल्लंघन म्हटले आहे.






