Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेचे ‘हे’ शस्त्र इराणच्या घरात घुसून घालू शकते धुमाकूळ; 300 फूट खाली लपलेला ‘Fordow Plant’ धोक्यात

Iran Fordow Nuclear Site : इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर तणाव वाढत असताना, इराणच्या अत्यंत गुप्त फोर्डो अणु संवर्धन प्रकल्पावर जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 18, 2025 | 11:30 PM
Iran's nuke threat US betrayal Fordo at risk ash plume hits 11 km

Iran's nuke threat US betrayal Fordo at risk ash plume hits 11 km

Follow Us
Close
Follow Us:

Iran Fordow Nuclear Site : इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर तणाव वाढत असताना, इराणच्या अत्यंत गुप्त फोर्डो अणु संवर्धन प्रकल्पावर जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे. हा प्रकल्प डोंगरात सुमारे ३०० फूट खोल बांधण्यात आलेला असून, सध्या चालू असलेल्या संघर्षात तो रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा बनला आहे.

सीएनएनच्या अहवालानुसार, अलीकडेच उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये या प्रकल्पाचे विस्तृत स्वरूप दिसून आले आहे. पर्वतांमध्ये खोदलेले पाच बोगदे, विस्तीर्ण संरचना आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. अशा भौगोलिक स्थितीत वसलेला हा अणु प्रकल्प इस्रायलसारख्या देशाच्या सध्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीपासून सुरक्षित आहे.

इस्रायलचे हल्ले आणि अमेरिकेचे समर्थन

इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा हा सहावा दिवस असून, आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने नुकतेच फोर्डो प्रकल्पावर हवाई हल्ला केला, ज्यात सुमारे १५००० सेंट्रीफ्यूज नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्रायलला वाटते की इराणकडे अण्वस्त्र तयार होऊ नयेत, यासाठी अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देश एकत्र आले आहेत. मात्र इस्रायलकडे सध्या फोर्डोप्रमाणे खोलवर बांधलेल्या अणु तळावर पूर्णपणे हल्ला करण्याची क्षमता नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  इराणमध्ये 50 इस्रायली लढाऊ विमानांनी कहरच केला; IDFचा मोठा दावा, ‘Centrifuge production site’ नष्ट

अमेरिकेकडे ‘फोर्डो’ नष्ट करण्याची ताकद

अमेरिकेच्या ताफ्यात असे अत्याधुनिक शस्त्र आहे जे फोर्डोसारख्या खोल बंकरला उद्ध्वस्त करू शकते. GBU-57 “बंकर बस्टर” बॉम्ब, ज्याला Massive Ordnance Penetrator (MOP) म्हणतात, हे शस्त्र जमिनीखाली लपलेल्या संरचना नष्ट करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

या बॉम्बचे वजन सुमारे ३०,००० पौंड (13,600 किलो) आहे आणि हे शस्त्र २०० फूट खोलपर्यंत भेदक क्षमतेसह डिझाइन करण्यात आले आहे. फोर्डो प्रकल्प जरी ३०० फूट खोल असला तरी अमेरिकेचे B-2 स्टेल्थ बॉम्बर्स हे शस्त्र अतिशय अचूकपणे टाकू शकतात, आणि त्यामुळे हा हल्ला यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे.

इराणचा गुप्त प्रकल्प, जगाला धोक्याची घंटा?

फोर्डो अणु संवर्धन प्रकल्प गुप्तपणे आणि अत्यंत संरक्षणाखाली बांधला गेलेला आहे. इराणने हा प्रकल्प सार्वजनिक करण्यापूर्वी वर्षानुवर्षे गुप्ततेत ठेवला होता. अणु कार्यक्रमाचे समर्थन करताना इराण म्हणते की, त्यांचा उद्देश शांततामय अणुऊर्जा वापराचा आहे. मात्र, इस्रायल आणि अमेरिका हे म्हणतात की इराण गुप्तपणे अण्वस्त्र तयार करत आहे, आणि त्यामुळेच फोर्डोसारख्या सुविधांचा वापर केला जात आहे.

राजकीय आणि लष्करी परिणाम

जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांमध्ये अणु प्रकल्पांभोवती निर्माण होणारे तणाव तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण करू शकतात, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. अमेरिकेकडे फोर्डोवर हल्ला करण्याची क्षमता असली तरी त्याचा परिणाम प्रचंड विनाशकारी आणि दीर्घकालीन संघर्षाला जन्म देणारा ठरू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : हायपरसोनिक युद्धात नवा अध्याय; इराणने आपल्या शस्त्रागारातून बाहेर काढले ‘हे’ सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र

 शांततेचा मार्ग की आण्विक संघर्ष?

इराणचा फोर्डो प्रकल्प आणि अमेरिकेच्या बंकर बस्टर क्षमतेने जग पुन्हा एकदा अण्वस्त्र संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे. या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी राजनैतिक संवाद आणि संयम हाच एकमेव मार्ग असला तरी, सध्याची स्थिती संघर्षाकडे अधिक झुकते आहे, आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील

Web Title: Irans nuke threat us betrayal fordo at risk ash plume hits 11 km

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • America
  • international news
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
1

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
2

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
3

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
4

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.