Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Mosque Dispute: ‘धर्माविरुद्ध सरकार…’ इराणमध्ये 80,000 मशिदी आहेत निशाण्यावर; पेझेश्कियानांचा स्फोटक आरोप

Iran Mosque Dispute: इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देशातील 80,000 मशिदी जनतेची सेवा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. ते म्हणतात की धर्मगुरू केवळ सरकारी निर्देश जारी करतात, कोणतेही व्यावहारिक काम करत नाहीत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 24, 2025 | 08:30 PM
Iran's President accuses 80,000 mosques of failing public service

Iran's President accuses 80,000 mosques of failing public service

Follow Us
Close
Follow Us:
  1.  इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देशातील ८०,००० मशिदी जनतेची सेवा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.
  2. कट्टर इस्लामिक व्यवस्थेवर आणि धर्मगुरूंच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय वातावरण तापले.
  3. इस्रायल संघर्ष, निर्बंध आणि संकटग्रस्त अर्थव्यवस्था यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची, तर सुधारणावादी आणि कट्टरपंथी संघर्ष पुन्हा तीव्र
Iran Mosque Dispute: इराणमध्ये ( Iran) पुन्हा एकदा धार्मिक राजकारणाचा वाद भडकला आहे. सुधारणावादी विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देशातील मशिदींच्या भूमिकेवर गंभीर शंका उपस्थित करून राजकीय पातळीवर मोठी हलचल निर्माण केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणमधील ८०,००० मशिदी लोककल्याणाच्या वास्तव कामात अपयशी ठरल्या असून त्या फक्त धार्मिक आदेश आणि सरकारी निर्देश प्रसारित करत बसल्या आहेत.

पेझेश्कियान म्हणाले की, सरकार संकटात सापडलं असताना, सामाजिक आर्थिक आव्हानं वाढली असताना आणि सामान्य नागरिक संघर्ष करत असताना, धर्मगुरू आणि मशिदींची भूमिका अधिक सक्रिय असायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात लोकांना मदत करण्याऐवजी मशिदी फक्त प्रशासनिक बोलणी आणि आदेशांचे केंद्र बनल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट

त्यांनी पुढे सुचवलं की, जर देशातील प्रत्येक मशिदीने किमान एक कुटुंब दत्तक घेतलं, तर इराणच्या सामाजिक संरचनेत मोठा आणि परिणामकारक बदल घडू शकतो. त्यांच्या मते, मशिदींचं नेटवर्क इतकं व्यापक आणि लोकांपर्यंत पोहोचणारं आहे की, योग्य सहभाग आणि उपक्रम राबवले तर ते सरकारी यंत्रणेइतकंच प्रभावी ठरू शकतं.

या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर देशाची राजकीय परिस्थिती आधीच तणावपूर्ण आहे. इस्रायल-हमास संघर्षात हमासचे कमांडर याह्या सिनवार यांच्या मृत्यूनंतर इराण-इस्रायल तणाव वाढला आहे. पेझेश्कियान यांनी सांगितले की, त्यांच्या शपथविधीनंतरच्या काही आठवड्यांतच परिस्थिती गुंतागुंतीची झाली असून आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. त्यामुळे काही तातडीचे निर्णय घेणे कठीण झाले आहे.

इराणच्या अंतर्गत राजकारणाचा मोठा भाग कट्टरपंथी आणि सुधारणावादी गटांमध्ये विभागला गेला आहे. पेझेश्कियान हे सुधारणावादी भूमिकेचे प्रमुख चेहरे मानले जातात. त्यांच्या विरोधात कट्टरपंथी गटांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु या वेळी त्यांनी थेट मशिदी आणि धार्मिक नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्याने परिस्थिती अधिक नाजूक बनली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप

धार्मिक मठ, मौलवी आणि इस्लामिक प्रभावशाली गटांचे बहुसंख्य सदस्य कट्टरपंथी गटाशी जोडलेले आहेत, असे मानले जाते. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांनी केलेले विधान हे धर्मप्रस्थ सत्ता आणि कट्टरपंथी विचारसरणीला मोठं आव्हान म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या विरोधकांनी आता खुलेपणाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली असून सोशल मीडियावरही या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे, सुधारणावादी गट आणि जनसामान्यांचा मोठा वर्ग पेझेश्कियान यांच्या विचाराला समर्थन देत आहे. त्यांचा दावा आहे की, धर्म फक्त विधींसाठी नसून मानवसेवेसाठी असतो आणि जर मशिदी लोकांच्या दैनंदिन जीवनात आणि संकटात साथ देऊ शकत नसतील, तर त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. इराणमध्ये सत्तासंघर्ष, धार्मिक सत्ता, सुधारणावाद आणि सामाजिक वास्तव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळला असून या वादाचे पुढील परिणाम प्रदेशातील राजकारणाला नव्या वळणावर नेण्याची चिन्हे दिसत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पेझेश्कियान यांनी मशिदींवर नेमका काय आरोप केला?

    Ans: त्यांनी मशिदी आणि धर्मगुरू समाजसेवेत अपयशी असल्याचे म्हटले.

  • Que: इराणमध्ये किती मशिदी आहेत?

    Ans: सुमारे ८०,०००.

  • Que: या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय?

    Ans: कट्टरपंथी गटांनी विरोध सुरू केला आणि मोठा वाद निर्माण झाला.

Web Title: Irans president accuses 80000 mosques of failing public service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • iran
  • Iran News
  • Islamic Country

संबंधित बातम्या

Iran US Conflict : इराणची ‘डेथ वॉरंट’ घोषणा; अमेरिका आणि इस्रायल ‘हिट लिस्ट’वर; मध्यपूर्वेत युद्धजन्य हालचालींना वेग
1

Iran US Conflict : इराणची ‘डेथ वॉरंट’ घोषणा; अमेरिका आणि इस्रायल ‘हिट लिस्ट’वर; मध्यपूर्वेत युद्धजन्य हालचालींना वेग

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात
2

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात

Iran Protest : इराणमध्ये राजेशाहीचे संकेत? सिंह आणि सुर्यच्या चिन्हांकित जुना ध्वज पुन्हा फडकला
3

Iran Protest : इराणमध्ये राजेशाहीचे संकेत? सिंह आणि सुर्यच्या चिन्हांकित जुना ध्वज पुन्हा फडकला

व्हेनेझुएलानंतर इराणमध्ये सत्तापालट? डोनाल्ड ट्रम्पकडून तेहरानमध्ये लष्करी कारवाईचे संकेत
4

व्हेनेझुएलानंतर इराणमध्ये सत्तापालट? डोनाल्ड ट्रम्पकडून तेहरानमध्ये लष्करी कारवाईचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.