Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iraq News : इराक मधील महिलांचे नवीन शस्त्र मोबाईल ; लैंगिक छळाविरुद्ध कॅमेऱ्याचा वापर

Iraq News : इराकमध्ये लैंगिक छळाविरोधात महिलांनी मोबाईल कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे. महिला हक्क कार्यकर्ती सारा जासिम छळ करणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करत आहे. या मोहिमेमुळे काही आरोपींवर कारवाई झाली; मात्र कार्यकर्तीला जीवे मारण्याच्या धमक्यांचाही सामना करावा लागत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 18, 2026 | 07:29 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मोबाईल कॅमेराच बनला महिलांचे शस्त्र
  • व्हिडीओमुळे आरोपीवर कारवाई करणे सोप्पे
  • कठोर कायद्याची मागणी
Iraq News : इराकमध्ये लैंगिक छळ आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात महिलांनी आता अनोखी लढाई सुरु केली आहे . रस्त्यावर महिलांची छेडछाड करणारे , अश्लील टिप्पणी करणारे , गैरवर्तन करणारे रोड रोमियो आशिक यांना जाब विचारण्यासाठी महिला पटकन आपला मोबाईल काढतात आणि लगेच त्याचा व्हिडीओ शूट करतात . तेव्हा त्या रोमियोंची कॅमेरा पाहून फाटते आणि ते पळ काढतात . नंतर इराक मधील स्त्रिया तो शूटिंग केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करतात .

या मोहिमेमुळे महिलांनी आपला आवाज उठवण्यासाठी नवे व्यासपीठ आणि मार्ग निवडला आहे . आणि एकाच वेळी त्या परिसरातल्या सगळ्याच महिला तो एक व्हिडीओ प्रसारित करत असल्यामुळे तो कमीं वेळेत सगळ्यांकडे पोहोचत आहे . मात्र या सगळ्यात महिलांना धमक्याही मिळत आहेत . पण तरीही महिलांनी ही मोहीम चालवत राहण्याचे संकेत दिले आहेत , असे समजत आहे .

मोबाईल कॅमेराच बनला महिलांचे शस्त्र

इराकची महिला हक्क कार्यकर्ती सारा जासिम ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक छळाविरोधात आवाज उठवत आहे . सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्या व्यक्तींचे व्हिडीओ चित्रित करून ती आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर प्रसिद्ध करते . त्या व्हिडीओसला मोठ्या प्रमाणात लोक पाहत असून त्याच्यावर इराक मध्ये चर्चा व्हायला लागला आहेत .

यावर अनेक पीडित महिला स्वतःचे अनुभव तिच्यापर्यंत पोहचवत आहेत . या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींचे गैरवर्तन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे . कॅमेऱ्यात कैद झालेले व्हिडीओ न्यायालयीन कारवाईसाठी सुद्धा पुरावा ठरू शकतात तसेच आरोपीना सामाजिक पातळीवर जाब विचारण्यास मदत होत आहे . भले भारतात ही गोष्ट एवढी मोठी वाटत नसेल पण इराक सारख्या मुस्लिम धार्मिक देशात याचे महत्व आहे . तिथल्या सामाजिक रचनेला हे पोषक असल्याचे बोलले जात आहे .

Bangladesh Fire : भीषण आग ;समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला आग ;१० जणांचा मृत्यू ,सहा जखमी

व्हिडीओमुळे आरोपीवर कारवाई करणे सोप्पे

या मोहिमेचा परिणामही दिसू लागला आहे . एका व्हिडिओमध्ये शाळकरी मुलींना त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे कथित गैरवर्तन समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे . असे सारा जासिमने सांगितले आहे . मात्र या सगळ्याचा तिला मोठा धोकाही पत्करावा लागतोय .

तिला जीवानिशी मारण्याचे फोन msg येत आहेत . ऍसिड हल्ल्याच्या धमक्या मिळत आहेत . महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवू नये अशी मानसिकता अजूनही समाजात असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे . त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी साराला सार्वजनिक ठिकाणी जाणेही मर्यादित आणि जपून करावे लागत आहे .

Russia – Ukraine Breaking : रशियाला कळायचे बंद झाले ; युक्रेनचा रशियावर १ हजारांहून अधिक ड्रोनचा हल्ला

कठोर कायद्याची मागणी

इराकमध्ये महिलांच्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशा कायद्याची गरज असल्याचे आता बोलले जात आहे . सध्याच्या दंडसंहितेत स्पष्टपणे गुन्हा ठरवण्याच्या तरतुदीचा अभाव असल्याची टीका महिला हक्क कार्यकर्त्यांकडून केली जात आहे . मात्र सोशल मीडियावर अवलंबून न राहता आता सामाजिक आणि प्रशासकीय लोकांकडून मदत होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे . सगळ्यामुळे सध्या तरी महिलांच्या बाजूने वातावरण बनत असून हे महिलांच्या फायद्याच हे असल्याचे बोलले जात आहे .

 

Web Title: Iraq news mobile phones as a new weapon for women in iraq using cameras to combat sexual harassment cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Harrasment of Woman
  • Islamic Country
  • Social Media

संबंधित बातम्या

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
1

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?
2

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?
3

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.