Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Erbil Strike: इराकमधील अमेरिकी तळाजवळ 7 मोठे स्फोट; संपूर्ण मध्य पूर्वेत हाय-अलर्ट, US-Iran संघर्षाने जागतिक बाजारात धुमाकूळ

Iraq US Base Attack: उत्तर इराकमधील इरबिल येथील अमेरिकी लष्करी तळाजवळ झालेल्या सात स्फोटांच्या मालिकेमुळे घबराट पसरली असून, अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 24, 2026 | 04:06 PM
iraq us military base attack erbil explosions iran tensions crude oil 100

iraq us military base attack erbil explosions iran tensions crude oil 100

Follow Us
Follow Us:
  • इरबिल लष्करी तळाजवळ साखळी स्फोट
  • होर्मुझची सामुद्रधुनी अन् तेल संकट
  • इराकी पंतप्रधानांची शांततेची मध्यस्थी

पश्चिम आशिया म्हणजेच मध्य पूर्व (Middle East) भूभागातील राजकीय व लष्करी परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे. शुक्रवारी उत्तर इराकमधील ऐतिहासिक अन् मोक्याच्या ठिकाणी असलेल्या इरबिल (Erbil) शहरात असलेल्या अमेरिकी लष्करी तळाच्या अगदी जवळ एकापाठोपाठ ७ भीषण स्फोटांची मालिका घडली. स्थानिक वेळेनुसार पहाटेच्या सुमारास झालेल्या या अचानक हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट पसरली. स्फोटांची तीव्रता इतकी भयानक होती की, संपूर्ण इरबिल शहर हादरले आणि लष्करी तळाच्या परिसरातून प्रचंड आगीच्या ज्वाला अन् दाट काळ्या धुराचे लोट आकाशात उठताना दिसले.

अमेरिकेने इराणविरोधात राबवलेली सलग १३ रात्रींची लष्करी मोहीम नुकतीच संपल्याची घोषणा केली होती. परंतु, या घोषणेला काही तास उलटत नाहीत तोच झालेल्या या साखळी स्फोटांनी अमेरिकन सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. कुर्द प्रादेशिक सरकारच्या (KRG) प्रशासकीय केंद्र असलेल्या इरबिलमध्ये हा हल्ला नेमका कोणी आणि कसा घडवून आणला, याबद्दल लष्करी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. हल्ल्यामुळे लष्करी तळाला आणि आसपासच्या परिसराला मोठे नुकसान झाले असून जीवितहानीची अधिकृत आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ukraine Russia War: 100 अब्ज रुबलची राख! युक्रेनियन ड्रोन्सचा थरार; रशियाचे लॉजिस्टिक्स नेटवर्क उध्वस्त, 50 उड्डाणे विमान रद्द

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वर्चस्वाची लढाई आणि तेलाचे भडकलेले दर

हा भीषण हल्ला म्हणजे केवळ स्थानिक पातळीवरील संघर्ष नसून, अमेरिका आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या छुप्या आणि उघड युद्धाचाच एक भाग आहे. दोन्ही देशांमधील या रणकंदनाचा मुख्य केंद्रबिंदू हा ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीपैकी तब्बल २० टक्के पुरवठा याच सागरी मार्गावरून होतो. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) या मार्गावरून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी आणि इराणी लष्कराची क्षमता रोखण्यासाठी व्यापक मोहिमा राबवल्या आहेत.

या युद्धाची धग आता केवळ इराण किंवा इराकपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण आखाती देशांमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाल समुद्रात (Red Sea) इराण-समर्थित हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या दोन मोठ्या तेलवाहू जहाजांना (Oil Tankers) क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. या हल्ल्यांमुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Brent Crude) किमतीने प्रति बॅरल १०० डॉलरची सीमा ओलांडली आहे. यामुळे येत्या दिवसांत जागतिक स्तरावर इंधन तुटवडा आणि महागाई वाढण्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : California Diwali Holiday: कॅलिफोर्निया न्यायालयाचा निकाल! सरकारकडून दिवाळीची सुट्टी दिली जाणार नाही; कायदा रद्द

बहरिनमध्ये सायरन अन् इराकी पंतप्रधानांची मध्यस्थीची धडपड

संघर्षाची व्याप्ती वाढत असल्याने बहरीन आणि कुवेतसारख्या शेजारील देशांमध्ये सुरक्षा सायरनचा आवाज दैनंदिन बनला आहे. बहरीन सरकारने संभाव्य क्षेपणास्त्र आणि तोफगोळ्यांचा मारा लक्षात घेऊन आपल्या नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी आणि भूमिगत निवाऱ्यांमध्ये स्थलांतरित होण्याचे निर्देश जारी केले आहेत. या वाढत्या प्रादेशिक संकटाच्या काळात युद्धाची आच सर्वात जास्त सोसाव्या लागणाऱ्या इराकने मात्र शांततेसाठी पुढाकार घेतला आहे.

इराकचे पंतप्रधान अली अल-जैदी यांनी प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वेगवान केले आहेत. अल-जैदी यांनी तातडीने तेहरान दौरा करून इराणी वरिष्ठ नेतृत्वाशी सविस्तर चर्चा केली. “इराकी भूमीचा वापर इराण किंवा इतर कोणत्याही शेजारील देशावर हल्ला करण्यासाठी अमेरिका किंवा कोणत्याही परकीय शक्तीला करू दिला जाणार नाही,” असे आश्वासन त्यांनी इराणला दिले आहे. विशेष म्हणजे, अल-जैदी यांचे वॉशिंग्टन आणि तेहरान या दोन्ही सत्ताकेंद्रांशी सलोख्याचे संबंध मानले जातात आणि त्यांनी नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेतली होती. मात्र, या मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतरही इरबिलमधील अमेरिकी तळावर झालेला हा हल्ला शांततेच्या मार्गात मोठे आव्हान ठरत आहे.

Web Title: Iraq us military base attack erbil explosions iran tensions crude oil 100

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Attack
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
1

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे
2

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ
3

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
4

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.