
Baramati Crime News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा संशय
बारामतीतील उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरील सशस्त्र हल्ला प्रकरणात (Baramati Crime News) पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणात पार्थ वासुदेव अवथळे (वय 19) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय 50) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे बारामतीसह परिसरातील व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला. या प्रकरणी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 19 ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्ल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पुणे शहर पोलिसांनी पार्थ अवथळे आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
चौकशी आणि तांत्रिक तपासातून ज्ञानदेव शिंदे याने हल्ल्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Mumbai Crime : गरबा खेळायला गेली, अन् पतीचा पाराचं चढला, पवईत घडली धक्कादायक घटना
तपासातील प्राथमिक माहितीनुसार, सूर्यवंशी हे आपल्या ताफ्यासह बारामती परिसरात आले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आपण त्यांचे चाहते असल्याचे सांगत छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. याच बहाण्याने जवळ आलेल्या एका हल्लेखोराने पिस्तूल काढल्याचे समोर आले आहे.
पिस्तूल जाम झाल्याने गोळी झाडली गेली नसल्याची माहिती आहे. त्यानंतर सूर्यवंशी यांनी प्रतिकार केला असता हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेवेळी उपस्थित असलेल्या पोलीस अंगरक्षकाने आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र झटापटीत एका आरोपीने त्याच्या हाताला चावा घेतला आणि आरोपी पसार झाले.
जंगलात शिकारीला गेले, प्राण्याचे डोळे समजून साथीदारावर गोळी; मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार
राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कंपनीचे मालक असून, त्यांचे महाराष्ट्रासह गोव्यात व्यावसायिक कामकाज आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, दोन लाखांच्या व्यवहाराचे स्वरूप काय आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत आहेत.
Ans: बारामती परिसरात पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा हल्ला झाला.
Ans: प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोरांनी सूर्यवंशी यांचे चाहते असल्याचे सांगून त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचा बहाणा केला. त्यानंतर एका हल्लेखोराने पिस्तूल काढल्याचे समोर आले आहे.
Ans: बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.