युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणला मोठा धक्का; अमेरिका-इस्रायल हल्ल्यात IRGCचे गुप्तचर प्रमुख ठार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
IRGC Intelligence Chief Majid Khatami killed 2026 : मध्य-पूर्वेतील रणांगणातून आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि इराणचे कंबरडे मोडणारी बातमी समोर आली आहे. इराणची सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली लष्करी संघटना ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) चे गुप्तचर प्रमुख मेजर जनरल माजिद खातमी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. आज ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इराणने अधिकृतपणे या बातमीला दुजोरा दिला असून, यामुळे इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
माजिद खातमी हे केवळ एक लष्करी अधिकारी नव्हते, तर ते इराणच्या गुप्तचर साम्राज्याचे ‘किंगपिन’ मानले जात होते. गेल्या वर्षी जूनमध्ये जेव्हा इस्रायली हल्ल्यात इराणचे तत्कालीन गुप्तचर प्रमुख मोहम्मद काझेमी आणि उपप्रमुख हसन मोहकीक मारले गेले, तेव्हा इराणने अत्यंत विचारपूर्वक खातमी यांची या पदावर नियुक्ती केली होती. खातमी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे अत्यंत निष्ठावान आणि जवळचे सहकारी होते. संरक्षण मंत्रालयातील गुप्तचर सुरक्षा संघटनेचे प्रमुख म्हणून काम केल्यामुळे त्यांना गुप्तहेरगिरी आणि शत्रूच्या हालचाली टिपण्याचा प्रचंड अनुभव होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rising India: जगाला हवी S Jaishankar यांची दुर्बिण! प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञाकडून त्यांच्या ‘या’ 3 मंत्रांची मोठी प्रशंसा
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी इराणच्या सीमेजवळ किंवा त्यांच्या सामरिक तळावर अमेरिका आणि इस्रायलच्या लढाऊ विमानांनी अचूक मारा केला. या हल्ल्याचे स्वरूप इतके भीषण होते की, खातमी यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. खातमी यांचा मृत्यू हा इराणसाठी केवळ एका कमांडरचा मृत्यू नसून, त्यांच्या धोरणात्मक नियोजनाला बसलेला मोठा फटका आहे. आयआरजीसी (IRGC) च्या अंतर्गत गुप्त हालचाली, परदेशी कारवाया आणि इस्रायलविरोधी मोहिमांचे नेतृत्व खातमी करत होते. त्यांच्या जाण्याने इराणच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
गेल्या काही काळापासून इराणच्या गुप्तचर प्रमुखांना सतत लक्ष्य केले जात आहे. मोहम्मद काझेमी, हसन मोहकीक आणि आता माजिद खातमी. एकापाठोपाठ एक वरिष्ठ अधिकारी मारले गेल्यामुळे इराणच्या अंतर्गत सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इस्रायल आणि अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा इराणच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गोटात कशी शिरकाव करते, हा आता इराणसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मोहसेन बाघेरी यांसारख्या वरिष्ठ कमांडरच्या हत्येनंतर खातमी यांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती, मात्र तरीही ते स्वतःला वाचवू शकले नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : दोनतोंडी ट्रम्प! हल्ल्याची वेळ जाहीर करून म्हटले इराणसोबत होणार आज करार; संपूर्ण जगात वाढवला संभ्रम
माजिद खातमी यांच्या हत्येनंतर इराण आता शांत बसण्याची शक्यता धुसर आहे. इराणकडून मोठ्या प्रमाणावर ‘प्रतिशोधा’ची (Revenge) भाषा केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच इराणला दिलेला इशारा आणि आता हा मोठा लष्करी विजय, यामुळे अमेरिका आणि इस्रायलचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, यामुळे मध्य-पूर्वेतील संघर्षाचा वणवा अधिकच पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराण आता आपल्या मित्र राष्ट्रांच्या मदतीने (लेबनॉन, येमेन, सीरिया) प्रतिहल्ला करण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.
Ans: आयआरजीसी (IRGC) चे गुप्तचर प्रमुख मेजर जनरल माजिद खातमी आज सकाळी अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाले.
Ans: खातमी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे विश्वासू होते आणि इराणच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेचे नेतृत्व करत होते.
Ans: खातमी यांच्या आधी मोहम्मद काझेमी आणि हसन मोहकीक यांसारख्या गुप्तचर प्रमुखांना इस्रायली हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते.






