Rising India: जगाला हवी S Jaishankar यांची दुर्बिण! प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञाने त्यांच्या 'या' ३ मंत्रांची केली जागतिक स्तरावर प्रशंसा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Steve Hanke on S Jaishankar 2026 : आज संपूर्ण जग एका अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे मध्य-पूर्वेतील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशा अशांत वातावरणात भारत देश मात्र एका स्थिर खडकासारखा उभा आहे. भारताच्या याच सामर्थ्याचे आणि परराष्ट्र धोरणाचे कौतुक आता खुद्द अमेरिकेतील (America) दिग्गज अर्थतज्ज्ञ स्टीव्ह हँके यांनी केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक सूचक चित्र शेअर करून भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांना ‘दूरदृष्टी असलेला नेता’ म्हणून संबोधले आहे.
स्टीव्ह हँके यांनी शेअर केलेल्या या व्हायरल फोटोमध्ये जगातील सध्याच्या परिस्थितीचे दोन पैलू दाखवले आहेत. फोटोच्या डाव्या बाजूला युद्धाचा वणवा, आर्थिक निर्बंधांचे ओझे आणि संभ्रमात असलेले पाश्चात्य नेते दिसत आहेत. याउलट, उजव्या बाजूला एस. जयशंकर शांतपणे एका दुर्बिणीतून भविष्यातील संधी पाहत असल्याचे चित्रित केले आहे. जयशंकर यांना १- वैविध्यीकरण (Diversification), २- जोखीम कमी करणे (De-risking), आणि ३- संरक्षण करणे (Protecting) अशा तीन महत्त्वाच्या पायऱ्या चढताना दाखवले आहे. या चित्राचा स्पष्ट संदेश हाच आहे की, जेव्हा जग विनाशाकडे पाहत आहे, तेव्हा जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली भारत आपला विकासाचा मार्ग आखत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : दोनतोंडी ट्रम्प! हल्ल्याची वेळ जाहीर करून म्हटले इराणसोबत होणार आज करार; संपूर्ण जगात वाढवला संभ्रम
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच आयआयएम रायपूरच्या १५ व्या दीक्षांत समारंभात भाष्य केले. ते म्हणाले की, “जग सध्या एका संरचनात्मक स्थित्यंतरातून जात आहे. आज देशांनी केवळ व्यापारावर लक्ष केंद्रित न करता, आपली जोखीम कशी कमी करता येईल आणि पुरवठा साखळीत विविधीकरण कसे आणता येईल, यावर भर दिला पाहिजे.” जयशंकर यांचा संकेत स्पष्ट होता भारताला आता कोणत्याही एका विशिष्ट देशावर किंवा गटावर (उदा. अमेरिका किंवा चीन) पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही. जर उद्या एक रस्ता बंद झाला, तरी भारतासाठी जगाचे इतर दरवाजे उघडे असावेत, हीच भारताची रणनीती आहे.
🚨🇺🇸 🇮🇷 THE ENDGAME: WINGING IT TOWARD CRISIS Professor of applied economics at Johns Hopkins University, Steve Hanke, argues that the current administration lacks a clear plan and is essentially “winging it.” Steve Hanke describes this as a crisis of epic proportions, worse… https://t.co/rsxmtUN0fq pic.twitter.com/AwdqXDegmA — Mario Nawfal (@MarioNawfal) April 1, 2026
credit – social media and Twitter
जयशंकर यांनी नमूद केले की, आज पाश्चात्य राष्ट्रांमध्ये आणि इतर प्रगत देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, पण भारताकडे आशावादी राहण्याची अनेक कारणे आहेत. भारत आज जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. कोरोना महामारी असो किंवा जागतिक महागाईचा फटका, भारताने हे धक्के अत्यंत धिरोदत्तपणे सोसले आहेत. “ज्या बदलांशी जुळवून घेणे इतर देशांच्या राजकारणाला कठीण जात आहे, त्या बदलांना भारत संधी मानून पुढे जात आहे,” असे परखड मत जयशंकर यांनी व्यक्त केले.
S. Jaishankar, India’s Minister of External Affairs on the importance of hedging: “Hedge, de-risk, diversify is how India navigates a fractured world.” STRATEGY OVER NOISE. INDIA PLAYS THE LONG GAME. pic.twitter.com/Y303y6Dl2Q — Steve Hanke (@steve_hanke) April 5, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ro Khanna: ‘अशा प्रकारच्या शिव्या, अपमान…’, भारतीय वंशाच्या US खासदाराने ट्रम्पना सुनावले; इराण युद्धावर अमेरिकेतच अंतर्गत कलह
भारताने गेल्या काही वर्षांत संरक्षण क्षेत्र असो किंवा औषध निर्माण, प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा मंत्र जपला आहे. रशियाकडून तेल खरेदी करतानाच अमेरिकेसोबत संरक्षण करार करणे आणि मध्य-पूर्वेतील देशांशी मैत्री टिकवणे, यालाच जयशंकर यांची ‘मल्टी-अलाइनमेंट’ मुत्सद्देगिरी म्हटले जाते. जागतिक पुरवठा साखळी (Supply Chain) अत्यंत असुरक्षित असताना, भारताने स्वतःचे पर्याय निर्माण केले आहेत. यामुळेच जागतिक संकटांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कमीत कमी परिणाम होत आहे.
Ans: जयशंकर यांनी जागतिक अशांततेच्या काळात भारताचे हित जपण्यासाठी जी ३ धोरणे (विविधीकरण, जोखीम कमी करणे आणि संरक्षण) राबवली आहेत, त्याचे हँके यांनी कौतुक केले.
Ans: १. जोखीम कमी करणे (De-risking), २. पर्यायांचे विविधीकरण (Diversification) आणि ३. देशांतर्गत हितसंबंधांचे संरक्षण (Protecting).
Ans: भारताने कोणत्याही एका देशावर अवलंबून न राहता आपल्या पुरवठा साखळीत विविधीकरण केले आहे आणि आत्मनिर्भरतेवर भर दिला आहे, ज्यामुळे जागतिक संकटांचा परिणाम कमी होतो.






