ट्रम्पचा धमाका! स्वत:ला घोषित केले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये तणावाचे वातावरण अधिक वाढले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अटक केली होती. यामुळे व्हेनेझुएलाच्या जनेतेत तीव्र आक्रोश निर्माण झाला होता. व्हेनेझुएलाची जनता ट्रम्प सरकारविरोधात रस्त्यावर उतरली होती. शिवाय याच वेळी ट्रम्प यांनी व्हनेझुएलाचे ५० दशलक्ष बॅरल तेल ताब्यात घेतले असून त्याच्या विक्रीच्या कमाईवरही अमेरिकेचे नियंत्रण राहणार आहे. या सर्व घडामोंडीमुळे आधीच जागतिक स्तरावर गोंधळ सुरु असताना ट्रम्प यांच्या या नव्या धमाक्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, अमेरिका व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करेल आणि त्याच्या विक्रीच्या कमाईवरही अमेरिकाच ताबा असले. अमेरिकेतील उत्पादनांसाठी याचा वापर केला जाईल. यामध्ये कृषी उत्पादने, उर्जा सुविधा, वैद्यकीय उपकरणे, तसेच व्हेनेझुएलाच विद्युत ग्रिड अशा उपकरणांचा वापर अमेरिका करले.
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला गंभीर इशाराही दिला होता. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर दबाव निर्माण करत आणखी एक मोठी मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, चीन, रशिया, इराण आणि क्यूबा या देशांसोबत सर्व प्रकारचे आर्थिक आणि व्यापारी संबंध तोडावेत. रच व्हेनेझुएलाच्या साठ्यातून अधिक तेल काढण्याची परवानगी मिळेल असे ट्रम्प यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी व्हेनेझुएलाने केवळ अमेरिकन कंपन्यांशी भागीदारी करावी असा इशाराही दिला होता.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सध्या अमेरिकेच्या सर्वात क्रूर तुरुंगात ठेवण्यात आले आहे. MDC तुरुंगात मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ठेवण्यात आले असून हे अमेरिकेचे सर्वात क्रूर आणि भयानक तुरुंग मानले जाते. मादुरो यांच्यावर ट्रम्प यांनी ड्रग्ज तस्करी, दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याचे आणि त्यांना शस्त्रे पुरवल्याचा, तसेच अमेरिकेच ड्रग्जचे जाळे पसरवल्याचा आरोप केला आहे.
Oil Sale : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाचे 5 कोटी बॅरल तेल विक्रीला, भारताला खरेदीची संधी?
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वादग्रस्त पोस्ट शेअर करत स्वत:ला व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष घोषित केले आहे.
Ans: ट्रम्प यांनी स्वत:ला व्हेनेझुएलाचे Acting President of Venezuela घोषिक केले आहे. हा दावा अधिकृत नसून तज्ज्ञांच्या मते व्हेनेझुएलावर राजकीय दबाव , तेल करार आणि व्हेनेझुएलातील रशिया-चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
Ans: ट्रम्प यांच्या वादग्रस्त पोस्टनंतर व्हेनेधझुएलात संतापाची लाट उसळली आहे.






