Nepal is former pm oli sharma is hiding in shivpuri
Nepal Crisis : काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Gen Z च्या सरकारविरोधी आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसाचर घडला असून आतापर्यंत २० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान ओलींसह अनेक नेत्यांनी राजीनामा देऊन देश सोडला आहे. सध्या देशात नवे अंतिरम सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरु आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान नेपाळचे माजी पंतप्रधान देश सोडून कुठे गेले आहे, काही जण ओली दुबईत गेले असल्याचे म्हणत आहेत, तर काहीजण चीनमध्ये. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, ओली शर्मा ना दुबईमध्ये गेले आहेत, नाही चीनमध्ये असे सांगितले जात आहे. तर मग नेमकं कुठे लपले आहेत ओली असा प्रश्न तुम्हाला पडाला असले. यावर स्वत: ओली शर्मा यांनी पूर्णविराम लावला आहे.
नेपाळच्या राजकारणात ट्विस्ट! पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून सुशीला कार्की आऊट अन् कुलमन घिसिंग इन?
ओली शर्मा यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आहे. या पत्रात त्यांनी ते शिवपुरीमध्ये सैन्याच्या सुरक्षेत असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी नेपाळच्या जनतेला विशेष करुन तरुणांना संबोधित केले. त्यांनी म्हटले आहे की, मी लष्कराच्या सुरक्षेत आहे आणि या शांततेही देशातील माझ्या मुलांची आठवण येत आहे. मुलांचे निष्पाप हास्य आणि त्यांचे प्रेम आठवत असल्याचे ओलींनी म्हटले.
ओलींनी नेपाळमधील हिंसक निर्दशनांना एक मोठा राजकीय खेळ असल्याचे म्हटले आहे, त्यांनी निदर्शनांच्या मागे खरा आवाज तरुणांचा नसून यामागे कोणता तरी मोठा कट असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, सरकारी कार्यलयांमध्ये आग, तुरुंगातून कैदी फरार यांसारख्या गोष्टींमध्ये निष्पाप तरुणाच हात असू शकत नाही. यामध्ये लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या लोकांचा हाथ असल्याचा दावा त्यांना केला आहे.
Former PM KP Oli writes open letter to Nepal’s Gen Z, urging peace over violence & defending democracy.
Full translation in English ➡️ https://t.co/mCpgGzKhez#Nepal #KPOli #OpenLetter
— Nepal Niceties (@NepalNiceties) September 10, 2025
आपल्या वैयक्तिक दु:खाही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, या हिंसक निदर्नांमुळे त्यांना त्यांच्या मुलांपासून दूर राहावे लागत आहे. यामुळे त्यांना खूप दु:ख होत आहे. त्यांनी म्हटले की, मी हार मानली नसती तर अशी परिस्थिती उद्भवलीच नसती असे म्हटले. यावर त्यांनी लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या भागांना नेपाळचा भाग घोषित करण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला.
FAQs (संबंधित प्रश्न)
नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन?
नेपाळमध्ये ओली सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीच्या निर्णयामुळे आंदोलन सुरु झाले होते, नंतर यामध्ये नेपोटिझम, भ्रष्टाचार आणि देशातील बेरोजगारीही जोडली गेली आणि आंदोलन तीव्र झाले.
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली देश सोडून कुठे गेले?
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली देश सोडून चीन किंवा दुबईत गेले असल्याचे म्हटले जात होते, पण स्वत: ओली यांनी ते शिवपुरीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले आहे.