नेपाळच्या राजकारणात ट्विस्ट! पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून सुशीला कार्की आऊट अन् कुलमन घिसिंग इन?
सुशीला कार्की यांना पंतप्रधान बनवण्यासाठी Gen Z सहमत
खरं तरं नेपाळमध्ये Gen Z तरुणांनी निदर्शनांमध्ये सर्व राजकीय दृश्य बदलून टाकले आहे. केपी ओली शर्मा यांनी राजीनामा दिला असून नव्या अंतरिम सरकाची स्थापन सुरु आहे. यावेळी निदर्शकांना नेपाळच्या माजी महिला सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना पंतप्रधान बनवायचे असा दावा समोर आला होता. हा दावा नेपाळच्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या सचिवांनी केला होता.
यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी आणि प्रमुखाची निवड करण्यासाठी एक व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन करण्यात आली. यात पाच हजार Gen Z तरुणांनी सहभाग घेतला होता. यावेळी सुशीला कार्की यांना पंतप्रधान बनवण्यासाठी पाठिंबाही देण्यात आला. परंतु यामध्ये एक वेगळेच वळण आले असून आता Gen Z तरुणांनीच कुलमन घिसिंग यांचे नाव पुढे केले असल्याचे म्हटले जात आहे.
कसे आले कुलमन घिसिंग यांचे नाव ?
सांगितले जात आहे, Gen Z चा हा युटर्न व्हर्च्युअल बैठक आणि त्यांच्या आपापसांतील वादाचा परिणाम आहे. सुशीला कार्की यांच्यापूर्वी काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना पतंप्रधान बनवण्याची मागणी केली जात होती. पण व्हर्च्युअल बैठकीनंतर सुशील कार्की यांचे नाव आघाडीवर आले. मिळालेल्या माहितीनुसार, बालेंद्र शाह यांनी स्वत: कार्की यांचे नाव सुचवले होते. याला Gen Z नी पाठिंबाही दिला होता.
परंतु सुशीला यांनी आापले नाव मागे घेतले असल्याचे म्हटले जात आहे. सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला सर न्यायाधीश आहेत. त्या त्यांच्या प्रामाणिकपण आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिकेमुळे ओळखल्या जातात. पण सुशीला कार्की तरीही पंतप्रधान होऊ इच्छित नाही. यासाठी त्यांनी लष्करप्रमुखांकडे विनंती करुन आपले नाव मागे घेतले आहे. यामुळे त्यांच्या जागी आता कुलमन घिसिंग यांचे नाव समोर येत आहे.
बैठकीत घेतला निर्णय
गुरुवारी (11 सप्टेंबर) अंतरिम सरकारच्या स्थापनेसाठी शेवटची बैठक पार पडली. यावेळी कार्की यांना पंतप्रधान बनवणाचा शेवटचा निर्णय घेण्यात येणार होता. पण काही Gen Z तरुणांनी यावर आक्षेप घेतला. सुशीला कार्की यांच्या वयावर आणि त्यांना राजकीय अनुभव नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी विरोधकांनी कुलमन घिसिंग यांचे नाव सुचवले.
कोण आहेत कुलमन घिसिंग?
कुलमन घिसिंग यांना नेपाळमध्ये लोडशेडिंगची समस्या दूर करणारे हिरो म्हटले जाते. त्यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, परंतु त्यांना एक उत्तम अधिकारी म्हणून ओळखले जाते. कुलमन घिसिंग हे नेपाळमधील उर्जा क्षेत्रात सुधारणा करतील तसेच भ्रष्टाचारही संपवतील असे म्हटले जात आहे. यामुळे लष्करप्रमुखांनीही यावर सहमती दर्शवली आहे. तसेच जनरल-झेडचाही विश्वास आहे की घिसिंग देशात शांतात प्रस्थापित करु शकतात.
Photo : नेपाळची धुरा महिला नेत्याकडे? कोण आहेत पंतप्रधानपदी आघाडीवर असलेल्या सुशीला कार्की






