ISI with Yunus govt uses LeT to target Hindu temples in Bangladesh
Pakistan ISI LeT Bangladesh attacks : बांगलादेशातील हिंदू मंदिरे आणि पवित्र तीर्थक्षेत्रांवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने थेट युद्ध पुकारल्याचे धक्कादायक दावे समोर आले आहेत. अंतरिम युनूस सरकारच्या काळात आयएसआयला बांगलादेशात मोकळीक मिळाली आणि त्याचा फायदा घेत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेमार्फत हिंदूंवर नियोजित हल्ल्यांची मालिका सुरू करण्यात आली आहे. प्रसिद्ध पत्रकार सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी उघड केले की, पाकिस्तान आयएसआयने बांगलादेशाला आपला ‘प्रयोगशाळा’ बनवले असून भारत आणि हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचा कट रचला जात आहे.
बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या आणि त्यांच्या परंपरांवर धोक्याची घंटा वाजली आहे. चौधरी यांच्या मते, ११ व्या शतकातील चंद्रनाथ धाम (सीताकुंड) हे पहिले मोठे लक्ष्य ठरले आहे. हिंदू श्रद्धेनुसार, येथे सतीदेवीचा उजवा हात पडला होता. दरवर्षी लाखो भक्त शिवचतुर्दशीला या टेकडीवर येतात. पण अलीकडेच कट्टरपंथी गटांनी येथे मशीद बांधण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. यामागे लष्कर-ए-तैयबा आणि हरकत-उल-जिहाद अल-इस्लामीशी संबंधित दहशतवादी हारुन इझहार याचा थेट हात असल्याचे सांगितले जाते.
फक्त चंद्रनाथ धामच नाही तर, चितगावमधील मेधास मुनी आश्रम, बंदरबन जिल्ह्यातील सुवर्ण मंदिर आणि कॉक्स बाजारजवळील महेशखलीचे आदिनाथ मंदिर हीही आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. ही सर्व मंदिरे दक्षिण आशियाच्या आध्यात्मिक वारशाचे केंद्र असून त्यावर होणारे हल्ले म्हणजे हिंदू संस्कृतीवर थेट आघात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी; हजारो जीव धोक्यात
गेल्या वर्षी युनूस यांच्या अंतरिम राजवटीदरम्यान आयएसआयला शस्त्रसाठा आणि अमली पदार्थ तस्करीसाठी मोकळीक देण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून निर्माण होणारा पैसा पुन्हा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात आहे. रोहिंग्या व बिहार पार्श्वभूमी असलेल्या तरुणांची झपाट्याने भरती केली जात असून त्यांना नेपाळ व पाकिस्तानातील प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाठवले जाते. यामध्ये अल-कायदा व अन्सार अल-इस्लामशी संबंधित कट्टर गटांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
आयएसआयच्या या कारवायांमुळे भारतही सतर्क झाला आहे. कारण दहशतवादी हालचालींबरोबरच अंमली पदार्थांची तस्करी भारताच्या पूर्वेकडील सीमेवर मोठे संकट निर्माण करू शकते. यामुळे भारतीय तरुणांना व्यसनाच्या विळख्यात ओढले जाऊन भारताच्या जागतिक प्रतिष्ठेलाही धक्का बसू शकतो. चौधरींच्या मते, बांगलादेशाला जिहादींचा बालेकिल्ला बनवणे हे पाकिस्तानचे दीर्घकालीन धोरण आहे. हे केवळ बांगलादेशाच्या धर्मनिरपेक्षतेसाठी नव्हे तर भारताच्या सीमावर्ती सुरक्षेसाठीही गंभीर धोका ठरत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?
हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि भारताच्या सीमावर्ती सुरक्षेला हादरे देणे हे पाकिस्तानच्या ‘अंतहीन युद्धा’चा भाग असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते. बांगलादेशातील मंदिरे आणि हिंदू समाजाला लक्ष्य करणे म्हणजे दक्षिण आशियाच्या सामूहिक सांस्कृतिक वारशावर आघात आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर बांगलादेश कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांचे ‘लॉन्चपॅड’ बनू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.