Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Islamic NATO: आशियात नव्या लष्करी युतीचा थरार! भारतासाठी ठरणार ‘लार्जर थ्रेट’; अण्वस्त्रे आणि आधुनिक शस्त्रांचा नवा गेमप्लॅन

Islamic Nato: २०२५ मध्ये, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने एक युती स्थापन केली, म्हणजेच यापैकी एका देशावर हल्ला करणे हा दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल. या युतीमध्ये तुर्कीचाही समावेश असू शकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 14, 2026 | 01:45 PM
islamic nato turkey saudi arabia pakistan defense pact impact on india 2026

islamic nato turkey saudi arabia pakistan defense pact impact on india 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘इस्लामिक नाटो’चा उदय
  • शक्तींचे महामिलन
  • भारतासाठी धोक्याची घंटा

Islamic NATO 2026 Turkey Saudi Pakistan : जागतिक राजकारणात सध्या एका नव्या लष्करी ध्रुवीकरणाची चर्चा वेगाने सुरू झाली आहे. ज्याप्रमाणे पाश्चात्य देशांची ‘नाटो’ (NATO) संघटना आहे, अगदी त्याच धर्तीवर आता ‘इस्लामिक नाटो’ किंवा ‘मुस्लिम नाटो’ साकार होताना दिसत आहे. तुर्की आता सौदी अरेबिया आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील ‘स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स’ करारात सामील होण्यासाठी अंतिम टप्प्यातील वाटाघाटी करत आहे. हा करार केवळ कागदोपत्री नसून, तो या तिन्ही देशांना एकमेकांच्या संरक्षणासाठी रणांगणावर एकत्र आणणारा ठरू शकतो.

काय आहे हा ‘इस्लामिक नाटो’ आणि नाटोचे कलम ५?

सप्टेंबर २०२५ मध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये एक ऐतिहासिक संरक्षण करार झाला होता. या कराराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात ‘नाटो’च्या कलम ५ सारखी तरतूद आहे. म्हणजेच, जर यापैकी कोणत्याही एका देशावर परकीय आक्रमण झाले, तर ते तिन्ही देशांवरील आक्रमण मानले जाईल आणि तिन्ही राष्ट्रे मिळून त्याचा प्रतिकार करतील. तुर्की या युतीमध्ये सामील झाल्यामुळे ही केवळ द्विपक्षीय युती न राहता एक शक्तिशाली त्रिपक्षीय लष्करी गट बनणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest 2026: रस्ते रक्ताने माखले, शवागारे भरली; इराणमधील नरसंहाराचा ‘हा’ खळबळजनक अहवाल वाचून डोळे पाणावतील

तिन्ही देशांची ‘थ्री-डायमेंशनल’ शक्ती

या युतीमध्ये प्रत्येक देशाची भूमिका महत्त्वाची आणि पूरक आहे:

  • सौदी अरेबिया: या गटाचा ‘फायनान्सर’ असेल. तेलाच्या उत्पन्नामुळे सौदी या युतीला लागणारा प्रचंड आर्थिक निधी पुरवेल.
  • पाकिस्तान: हा या गटाचा ‘अण्वस्त्र पुरवठादार’ आणि ‘मनुष्यबळ’ असेल. जगातील एकमेव अण्वस्त्रधारी मुस्लिम देश म्हणून पाकिस्तानची अण्वस्त्रे या गटासाठी ‘न्यूक्लियर अंब्रेला’ म्हणून काम करतील.
  • तुर्की: तुर्कीकडे अद्ययावत लष्करी तंत्रज्ञान आणि युद्धाचा अनुभव आहे. तुर्की आपले पाचव्या पिढीतील ‘काण’ (Kaan) लढाऊ विमान आणि प्रगत ड्रोन तंत्रज्ञान या देशांसोबत शेअर करणार आहे.

 

𝐓𝐮𝐫𝐤𝐞𝐲’𝐬 𝐄𝐧𝐭𝐫𝐲 𝐢𝐧𝐭𝐨 𝐚 ‘𝐌𝐮𝐬𝐥𝐢𝐦 𝐍𝐀𝐓𝐎’: 𝐖𝐡𝐲 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐂𝐚𝐧𝐧𝐨𝐭 𝐀𝐟𝐟𝐨𝐫𝐝 𝐭𝐨 𝐋𝐨𝐨𝐤 𝐀𝐰𝐚𝐲 What is taking shape is not a slogan or a rumour, but a hard security alignment. As Turkey, Pakistan and Saudi Arabia draw closer, India faces a… pic.twitter.com/7GfqcXqj8Z — IndiaToday (@IndiaToday) January 13, 2026

credit : social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protests : ‘हल्ला केल्यास स्वतःचीच कबर खोदून घ्याल’ इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारताची चिंता

भारतासाठी ही युती चिंतेचा विषय का आहे, याची मुळे मे २०२५ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी संघर्षात आहेत. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव टोकाला पोहोचला होता, तेव्हा तुर्कीने उघडपणे पाकिस्तानची पाठराखण केली होती. तुर्कीने दिलेले ड्रोन आणि तांत्रिक मदतीमुळे पाकिस्तानला बळ मिळाले होते. आता हा औपचारिक लष्करी करार झाल्यास, भविष्यात काश्मीर मुद्द्यावर किंवा सीमेवरील वादात भारत विरुद्ध ‘तिन्ही देश’ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इराण आणि इस्रायलवरही परिणाम

तज्ज्ञांच्या मते, ही युती केवळ भारताला डोळ्यासमोर ठेवून केलेली नाही. इराणची वाढती अण्वस्त्र शक्ती आणि मध्य पूर्वेतील इस्रायलचा प्रभाव यांना संतुलित करण्यासाठी हा ‘सुन्नी ब्लॉक’ एकत्र येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनिश्चित धोरणांमुळे हे देश आता स्वतःची सुरक्षा स्वतःच्या हातात घेऊ पाहत आहेत. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, या देशांची पहिली नौदल बैठक नुकतीच अंकारा येथे पार पडली, जे या युतीच्या अंमलबजावणीचे पहिले पाऊल मानले जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'इस्लामिक नाटो' म्हणजे नक्की काय?

    Ans: हा तुर्की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील एक प्रस्तावित लष्करी करार आहे, जो नाटोच्या धर्तीवर सामूहिक संरक्षणाची हमी देतो.

  • Que: या युतीमुळे भारताच्या सुरक्षेला काय धोका आहे?

    Ans: तुर्की आणि पाकिस्तानचे संरक्षण संबंध सुधारल्यास भारताला सीमेवर प्रगत तंत्रज्ञान आणि ड्रोन युद्धाचा सामना करावा लागू शकतो.

  • Que: तुर्की नाटो सोडून या गटात सामील होत आहे का?

    Ans: नाही, तुर्की नाटोमध्ये कायम राहूनही आपली प्रादेशिक स्वायत्तता आणि मुस्लिम देशांमधील प्रभाव वाढवण्यासाठी या युतीमध्ये सामील होत आहे.

Web Title: Islamic nato turkey saudi arabia pakistan defense pact impact on india 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Nato
  • pakistan
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Iran Protests : ‘हल्ला केल्यास स्वतःचीच कबर खोदून घ्याल’ इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण
1

Iran Protests : ‘हल्ला केल्यास स्वतःचीच कबर खोदून घ्याल’ इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण

अशी फिल्डिंग पाकिस्तानीच करू शकतात! जगभरात पुन्हा नाचक्की, पहिले बाबर-रिझवान आणि आता हसन अली
2

अशी फिल्डिंग पाकिस्तानीच करू शकतात! जगभरात पुन्हा नाचक्की, पहिले बाबर-रिझवान आणि आता हसन अली

World News: पाकिस्तानचे वाजले बारा! ‘या’ महत्वाच्या प्रांतात IED चा ब्लास्ट; एसएचओ अन् 6 पोलिस जखमी
3

World News: पाकिस्तानचे वाजले बारा! ‘या’ महत्वाच्या प्रांतात IED चा ब्लास्ट; एसएचओ अन् 6 पोलिस जखमी

World War 3: Greenlandच बनणार तिसऱ्या महायुद्धाचे कारण? आता जर्मनी आणि ब्रिटन मैदानात; अमेरिकाही मागे हटेना
4

World War 3: Greenlandच बनणार तिसऱ्या महायुद्धाचे कारण? आता जर्मनी आणि ब्रिटन मैदानात; अमेरिकाही मागे हटेना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.