
Israel airstrike gaza despite trump's stop bombing demand on gaza
परंतु इस्रायलने गाझावर पुन्हा एकदा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त मिळाले आहे. गाझातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझावर आणखी एक हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला गाझाच्या खान युनूस शहरात करण्यात आला आहे.
अखेर युद्ध संपणार! गाझातील योजनेला हमासची मंजुरी मिळताच ट्रम्पचे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश
ट्रम्प यांच्या आवाहानाकडे इस्रायलचे दुर्लक्ष
शुक्रवारी (०३ ऑक्टोबर) ट्रम्प यांनी हमासकडून गाझातील त्यांच्या योजनेला सहमती मिळाल्यानंतर इस्रायलला गाझातील कारवाया कमी करण्याचे आवाहनही केले होते. यामुळे ओलिसांची लवकर आणि सुरक्षित सुटाक होईल असे त्यांनी म्हटले होते. यावर शनिवारी (०४ ऑक्टोबर) ट्रम्प यांच्या योजनेला इस्रायलने सहमती दर्शवली होती.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांनी गाझा योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबाजवणी सुरु असल्याचेही म्हटले होते. पहिल्या टप्प्यात इस्रायल गाझातील लष्करी हालचाली कमी करणार होता. याची सुरुवात झाल्याचे इस्रायलच्या लष्करप्रमुखांनी पुष्टीही केली होती. पण सध्या इस्रायलने गाझावर हल्ला केला आहे. यामुळे हा हल्ला ट्रम्प यांच्या गाझा योजनेला धक्का मानला जात आहे.
ट्रम्प यांच्या मते, गाझातील युद्ध तेच थांबवू शकतात. त्यांच्या मते हमासला शांतात हवी आहे. यामुळे इस्रायलने गाझातील बॉम्ब हल्ले थांबवले पाहिजेत. तसेच सर्व ओलिसांच्या सुरक्षितपणे आणि लवकर येण्यासाठी तयारी सुरु केली पाहिजे. त्यांचा हा प्रयत्न केवळ गाझातच नव्हे तर मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी देखील असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. यावर इस्रायलने, आम्ही युद्ध संपवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या टीमला संपूर्ण सहाकार्य करु असे म्हटले होते.
प्रश्न १. इस्रायलने ट्रम्प यांना कोणता धक्का दिला?
इस्रायलने ट्रम्प यांच्या गाझातील हल्ले थांबवण्याच्या आवाहानानंतरही गाझावर हवाई हल्ले केले आहेत, ज्यामुळे गाझा शांतात योजनेला धक्का बसाला आहे.
प्रश्न २. इस्रायलने कुठे केला हल्ला आणि किती जीवितहानी झाली?
मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलने गाझात आणि गाझाच्या खान युनूस शहरावर हल्ला केला आहे, ज्यात ६ ठार झाले आहेत.