Israel and Hamas ceasefire agreement document mentions terms and conditions and Donald Trump
Israel-Hamas ceasefire : गाझा : आंतरराष्ट्रीय स्तरावर पश्चिम आशियाच्या शांततेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील अनेक वर्षांपासून हमास आणि इस्त्रालयमध्ये युद्ध सुरु असून यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता युद्धबंदीची तयारी पूर्ण करण्यात आली असून काही अटी-शर्तींसह ही युद्धबंदी केली जाणार आहे. इस्रायली मंत्रिमंडळाने युद्धबंदीला सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे. दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी कराराशी संबंधित एक कथित “संमती दस्तऐवज” समोर आला आहे. यामधील युद्धबंदीच्या अटी सांगण्यात आल्या आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी कराराशी संबंधित एक कथित “संमती दस्तऐवज” समोर आला आहे. यामध्ये युद्धबंदीच्या अटी लिहिण्यात आल्या आहेत. युद्धबंदीच्या या दस्तऐवजाचे शीर्षक “गाझा युद्धाचा पूर्ण अंत” असे आहे. हा दस्तऐवज इस्रायली न्यूज वेबसाइटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे आणि त्यावर मध्यस्थी करणाऱ्या देशांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “गाझामधील युद्धाचा शेवट जाहीर केला” असा उल्लेख करणारा हा दस्तऐवज या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या युद्धबंदीला औपचारिक स्वरूप देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे आणि दोन्ही बाजूंनी आवश्यक पावले उचलण्यास सहमती दर्शविली आहे असे देखील यामध्ये म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रप्म हे सध्या जगातील सर्व युद्धे संपवण्याच्या मार्गावर काम करत आहेत. नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न सुरु असून त्यांच्या यशामध्ये आणखी एक युद्ध संपवण्याचा विक्रम जोडण्यात आल्याचा दावा या दस्ताऐवजामध्ये करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हमास अन् इस्त्रालयच्या युद्धबंदीच्या दस्ताऐवजामध्ये नेमके लिहिले काय?
वर्ल्ड संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कान न्यूजने ट्विटरवर हिब्रू भाषेत हा दस्तऐवज शेअर केला. त्यात म्हटले आहे की, “इस्रायल आणि हमास यांच्यातील ‘व्यापक युद्धबंदी करार’ मध्ये असेही म्हटले आहे की हमासने ७२ तासांच्या आत सर्व मृतांची माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाला द्यावी. कैद्यांची देवाणघेवाण शांततेत होईल, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाशिवाय किंवा मीडिया कव्हरेजशिवाय हे केले जाणार आहे” अशी माहिती युद्धबंदीच्या दस्ताऐवजामध्ये देण्यात आली आहे.