मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी पुन्हा केलं मोठं विधान; म्हणाले...
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे. ‘सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे. समता परिषदेने हा मोर्चा आयोजित केला आहे. कुणाला भाषणाला संधी द्यायची. नियंत्रण राहील त्यासाठी आमच्या सभेत मराठा समाजाला टार्गेट करत नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या हे आमचं म्हणणं आहे. इथं गर्दी केली तर कुणालाच फायदा होणार नाही’, असे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘EWS दिले तेव्हा महाराष्ट्रात मराठा समोर होताच तेव्हा आम्ही विरोध केला नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या हे आमचं म्हणणं आहे. इथं गर्दी केली तर कुणालाच फायदा होणार नाही. खोटी सर्टिफिकेट घेतले जात आहे. सकाळी अर्ज केले की, संध्याकाळी सर्टिफिकेट मिळत आहे. खऱ्या कुणबी समाजाने विरोध केला आहे. सोकोल्ड नेता उगवला आहे. आमच्या विरोधात बोलला नसता तर आम्हीही बोललो नसतो. कधी मला, कधी मुख्यमंत्री आणि राहुल गांधींना बोलला. नेते आहेत ते, फडणवीस राज्य चालवत आहे. शिवीगाळ करतो, पत्नीला बोलतो. वाटेल ते बोलायला काय परवाना घेतला का?, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…
दरम्यान, हॉलंड, पोलंड आणि पुढे काय बोलला? यशवंतराव चव्हाण म्हणाले आहे, राज्य मराठ्यांचं नाही तर मराठीचे होणार आहे. आता हे सगळे विसरलेले दिसतात. मी काल टीव्हीवर पाहिले, विखे मंत्रिमंडळ का पक्षाचा निरोप घेऊन गेले. मला माहिती नाही. मात्र, जो जीआर निघाला, त्यानंतर काल आत्महत्या झाल्या. 14 ते 15 आत्महत्या झाल्या. आमचं आरक्षण संपलं असा ठाम विश्वास झाला. अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नारायण राणे झाले. सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केले. पण आत्ता जे चाललं आहे ते तुम्ही पाहत आहात.
भटक्या समाजात भ्रम
भटक्या समाजात भ्रम निर्माण होतो आहे. पुढे काय होईल सांगण्याएवढा मोठा मी नाही. पण एक निश्चित सांगतो की, मागासवर्गीय समाज मोठा आहे. ओबीसी वर्ग मोठा आहे. कुठल्या एका जातीसाठी लढत नाही. वेगवेगळ्या समाजातील लोक आत्महत्या करत आहेत. विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा ओबीसीचा DNA सांगितले. आता त्यांना किती आवश्यकता आहे की नाही माहिती नाही, असेही भुबजळ यांनी म्हटले आहे.