
israel attack on gaza today
इस्रायली धमाक्यांनंतर निसर्गाचा कहर! गाझात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती
इस्रायली सैन्याने म्हटले की, नियंत्रण रेषेजवळ कारवाईदरम्यान तोफगोळा डागण्यात आला होता. त्यांनी कोणत्याही प्रकारची सिमा ओलांडलेली नाही. तोफगोळाचे लक्ष्य चुकले असले असे लष्कराने म्हटले आहे. येलो लाईन म्हणजेच नियंत्रण रेषा ही इस्रायलच्या ताब्यात आहे. या रेषेद्वारे उर्वरित गाझाला वेगळे करण्यात आले आहे.
इस्रायलने नुकत्याच केलेल्या हल्ल्याात किमान १० जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी इस्रायल सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत असून येलो लाईनच्या बाहेर हल्ले करत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. युद्धबंदी लागू झाल्यपासून आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा इस्रायली गोळीबारात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये १० ऑक्टोबर २०२५ रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर याती पहिल्या टप्प्यात कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु हमसाने दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास नकार दिला, तेव्हापासून इस्रायलने सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. हमासने शस्त्रे सोडण्यास आणि गाझातील सैन्य तैनातीस नकार दिला आहे.
याच वेळी गाझावर निसर्गाने देखील मोठा प्रहार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गाझाच्या खान युनूस सारख्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला असून परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका स्थलांतरित लोकांना बसला आहे. लोकांचे टेंट, अन्न, कपडे सर्वकाही पाण्यात गेले आहेत. तसेच अस्वच्छतेमुळे रोगराईचा संसर्गही वाढला आहे.सर्व अन्न, कपडे, जीवनावश्यक सामान भिजले आहे. नेक भागांमध्ये कच्च्या रस्त्यांमुळे चिखल निर्माण झाला आहे. गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. तसेच पावसाच्या पाण्यामुळे कचऱ्याचे ढिग आणि सांडपाणे धबधब्यासारखे वाहत आहे.
इस्रायलचा मोठा प्रहार! हमासचा कुख्यात कमांडर राद सादचा खात्मा, कारवाईचा VIDEO आला समोर
Ans: इस्रायली सैन्याने नुकतेच गाझातच पॅलेस्टिनींच्य रहिवाशी भागावर हल्ला केला आहे, यामध्ये १० जखमी झाले आहेत.
Ans: येलो लाईन गाझातील इस्रायलच्या नियंत्रणाखालील भाग आहे. तसेच या गाझातील उर्वरित भागांना वेगळे करणारी रेष आहे.
Ans: इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, हा हल्ला चुकून झाला असून त्यांच्या लक्ष्यापासून भरकटलेला आहे. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे.
Ans: इस्रायल-हमासमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली असून यातील कैद्यांच्या सुटकेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यात गाझात सैन्य तैनाती करण्यास आणि शस्त्रे सोडण्यास हमासने नकार दिला आहे. यामुळे इस्रायल सतत गाझात हल्ले करत आहे.