इस्रायलचा मोठा प्रहार! हमासचा कुख्यात कमांडर राद सादचा खात्मा, कारवाईचा VIDEO आला समोर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, राद साद हा हमासच्या लष्करी शाखेतील शस्त्रास्त्र निर्मितीचा प्रमुख होता. तसेच ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने तीव्र हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात राद साद सहभागी होता. इस्रायलने म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यात साद अत्यंत सक्रिय झाला होता. तो हमासच्या दहशतवाद्यांपैकी धोकादायक दहशवादी बनला होता.
सध्या इस्रायल हमासमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत दोन्ही देशात कैद्यांच्या देवाण-घेवाणीचा टप्पा पूर्ण झाला आहे. पंरुत दुसऱ्या टप्प्याला हमासने मान्यता दिलेली नाही. यामुळे इस्रायल सातत्याने गाझामध्ये कारवाई करत आहे. इस्रायल हमासच्या लष्कर आणि शस्त्रास्त्र निर्मितीला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच इस्रायलमे हमासच्या सैनिकांवर स्फोट हल्ला केला होता. याच हल्ल्यात हमासचा टॉप कमांडर राद साद मारला गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
आतापर्यंत ७ ऑक्टोबर २००२३ रोजी झालेल्या हल्ल्यात १,२०० हून हमासच्या नेतृत्त्वाखाली मारले गेले होते तसेच हमासने जवळपास २५१ लोकांना कैदी बनवले होते. यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध (Israel Hamas War) सुरु झाले. या युद्धामुळे आतापर्यंत ७० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे. तसेच लोकांनी युद्धामुळे पलायन देखील केले होते. परंतु सध्या इस्रायल आणि हमासमधील १० ऑक्टोबर रोजी झालेलेल्या युद्धबंदीमुळे लोक परतत आहे. परंतु इस्रायलच्या हमासविरोधी सततच्या कारवाईमुळे पुन्हा संघर्षाची भीती व्यक्त केली जात आहे. इस्रायलच्या या कारवाईत अनेक निरापराध लोकांचा बळी जात असल्याने आंतरराष्ट्रीय मानवी संघटनांनी याला विरोध केला आहे.
🔴 ELIMINATED: Ra’ad Sa’ad, Head of the Weapons Production Headquarters of Hamas’ Military Wing and One of the Architects of the Brutal October 7th Massacre Sa’ad was one of the last remaining veteran senior militants in the Gaza Strip and a close associate of Marwan Issa, the… pic.twitter.com/nIa1VUqryI — Israel Defense Forces (@IDF) December 13, 2025
Ans: राद साद हा हमासच्या सैन्यातील वरिष्ठ कमांडर होता. तो हमासच्या शस्त्रनिर्मिती मुख्यालयाचा प्रमुख होता. तसेच ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या इस्रालवरील हल्ल्याचा नियोजनात साद सहभागी होता, असा इस्रायलचा दावा केला आहे.
Ans: इस्रायली संरक्षण दलाच्या माहितीनुसार, १३ डिसेंबर रोजी गाझातील कारवाई दरम्यान हमासचा टॉप कमांडर राद साद ला ठार करण्यात आले आहे.






