Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य

Ramon Crater : 44 वर्षांपूर्वी इस्रायलने इराणकडून भेट म्हणून ११ गाढवांची मागणी केली होती. आज इस्रायलचा वाळवंटी प्रदेश या गाढवांनी भरलेला आहे. ही गाढवे लहान घोड्यांप्रमाणे धावतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 11, 2026 | 04:10 PM
Negev desert transformation donkeys Israel wild donkeys Ramon Crater

Negev desert transformation donkeys Israel wild donkeys Ramon Crater

Follow Us
Follow Us:
  • ४४ वर्षांनंतरची ऐतिहासिक क्रांती
  • इराण आणि आफ्रिकेशी मुत्सद्देगिरी
  • पर्यावरणाचे रक्षक

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इस्रायलच्या नेगेव वाळवंटात जंगली गाढवे मोठ्या प्रमाणावर आढळत असत. मात्र, अनियंत्रित आणि अति शिकारीमुळे ही प्रजाती या भागातून पूर्णपणे नामशेष झाली. वाळवंटाची ढासळती परिसंस्था (Ecosystem) सावरण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी इस्रायली (Ramon Crater) अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी या ऐतिहासिक भूमीत पुन्हा एकदा जंगली गाढवांचा अधिवास निर्माण करण्याची एक धाडसी योजना आखली. ही सामान्य पाळीव गाढवे नव्हती, तर ‘पर्शियन ओनेजर’ (Persian Onager) आणि ‘आफ्रिकन वाईल्ड अॅस’ (African Wild Ass) या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जंगली गाढवांच्या अत्यंत दुर्मिळ प्रजाती होत्या. या गाढवांना इस्रायलमध्ये आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी राजनैतिक मुत्सद्देगिरी आणि एक धाडसी मोहीम राबवण्यात आली.

इराणच्या शाह यांच्याकडून गुप्त कराराद्वारे ११ गाढवांची भेट

१९७९ मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीपूर्वी इराण आणि इस्रायल यांच्यात अत्यंत चांगले व मैत्रीपूर्ण संबंध होते. इस्रायलच्या ‘नेचर अँड पार्क्स अथॉरिटी’चे तत्कालीन महासंचालक अव्राहम योफे यांनी इराणचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्याशी गुप्तपणे चर्चा केली. या चर्चेनंतर, १९६८ मध्ये इराणच्या शाही अभयारण्यातून ११ जंगली गाढवे इस्रायलला भेट म्हणून देण्यात आली, ज्यांना विमानाने सुरक्षितपणे योतवाता वन्यजीव अभयारण्यात आणण्यात आले. यानंतर, या प्राण्यांमध्ये अनुवांशिक विविधता (Genetic Diversity) राखण्यासाठी इस्रायलने आफ्रिकेतील इथिओपिया या देशातून विशेष जहाजे आणि ट्रक्सचा वापर करून आफ्रिकन जंगली गाढवे आणली. योतवाता येथील अभयारण्यात शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रजनन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?

१९८२ ची ऐतिहासिक सुरुवात आणि रामोन क्रेटरमधील बदल

सुमारे एका दशकाच्या प्रजनन आणि संगोपनानंतर, १९८२ मध्ये इस्रायली शास्त्रज्ञांनी २८ निरोगी जंगली गाढवांचा पहिला गट नेगेव वाळवंटातील अत्यंत तीव्र, कोरड्या आणि आव्हानात्मक ‘रामोन क्रेटर’ (Ramon Crater) प्रदेशात सोडला. या प्राण्यांनी निसर्गाशी जुळवून घेत स्वतःमध्ये अद्भूत शारीरिक बदल घडवून आणले. आज ४४ वर्षांनंतर, या वाळवंटी प्रदेशात या गाढवांची संख्या ५०० ते ६०० च्या वर पोहोचली आहे. ही गाढवे ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने धावू शकतात. त्यांचे शरीर ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सहन करण्यास सक्षम बनले असून ती पाण्याशिवाय अनेक दिवस जगू शकतात. पाण्याच्या अभावामुळे त्यांच्या शरीराचे वजन ३० टक्क्यांपर्यंत कमी झाले तरी ती जिवंत राहतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?

निसर्गाचे पुनरुज्जीवन: गाढवांनी वाळवंटात कशी आणली हरियाली?

या गाढवांनी केवळ स्वतःचा बचाव केला नाही, तर संपूर्ण वाळवंटाचे रूप पालटून टाकले. कडक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात ही गाढवे आपल्या पायांनी वाळूमध्ये खड्डे खणतात. या खड्ड्यांमधून जमा होणारे पाणी प्यायला मिळल्यामुळे कोल्हे, हरणे आणि इतर वन्यजीवांना दुष्काळात जीवनदान मिळते. याशिवाय, ही गाढवे वाळवंटातील बाभळीची (Acacia) झाडे आणि त्यांची फळे खातात. त्यांच्या पचनसंस्थेतील पाचक रसांमुळे या बियांचे कठीण आवरण मऊ होते. जेव्हा ही गाढवे मैलोन्मैल प्रवास करून शेणाद्वारे या बिया बाहेर टाकतात, तेव्हा वाळवंटात नवीन झाडे उगवण्यास मदत होते. त्यांच्या या दैनंदिन हालचालींमुळे आज रामोन क्रेटर परिसर एका नंदनवनात रूपांतरित झाला असून जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ या मॉडेलचा अभ्यास करत आहेत.

Web Title: Israel desert transformed into oasis by iranian wild donkeys ramon crater

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • iran
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?
1

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?

Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने ‘असे’ उत्तर दिले
2

Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने ‘असे’ उत्तर दिले

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच
3

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण
4

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.