Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकीला काळीमा! बाप-लेकाने केला इस्रायली महिलेवर बलात्कार आणि हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिसून येत आहे. बाप आणि लेकाने एका इस्रायल महिलेवर अत्याचार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 24, 2024 | 05:23 PM
माणुसकीला काळीमा! बाप-लेकाने केला इस्रायली महिलेवर बलात्कार आणि हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर
Follow Us
Follow Us:

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, माणुसकीला काळीमा फासणारे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऑक्टोबर २०१६ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला. या व्हिडिओमध्ये हमास दहशतवादी बाप आणि लेकाने सामूहिक बलात्काराची कबुली देखील दिली आहे. दोघांनी एकाच महिलेल्या क्रूरतेची शिकार बनवले असल्याचे देखील म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये, हमासचा एक दहशतवादी आणि त्याचा मुलगा इस्रायली अधिकाऱ्यांना सांगतांना दिसत आहे की, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यादरम्यान त्यांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली.

जमाल हुसेन अहमद रादी (४७) असे इस्रायली महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या हमास सेनानीचे नाव आहे. जमाल हुसैनचा १८ वर्षीय मुलगा अब्दुल्ला यानेही एका इस्रायली महिलेवर बलात्कार केला. ‘डेली मेल’च्या रिपोर्टनुसार, हमास सेनानी जमाल हुसैन यांनी सांगितले की, जेव्हा तो 7 ऑक्टोबर 2023 रोजी गाझा सीमेवरून किबुत्झ नीर या इस्रायली सीमा भागात प्रवेश केला. त्यावेळी त्याला एका घरातून रडण्याचा आवाज आला. जमाल म्हणाला- मला जे करायचे होते ते मी केले…मी तिच्यावर बलात्कार केला.

NEW: “My father raped her, then I did and then my cousin did and then we left but my father killed the woman after we finished raping her.” Captured Hamas terrorists confess to sexual violence against Israelis on 7/10. They even made it a family outing. The sickness runs deep. pic.twitter.com/21NETXGNjZ — Heidi Bachram ?️ (@HeidiBachram) May 23, 2024

इस्रायलच्या लष्कराने गाझामध्ये लष्करी कारवाईदरम्यान जमाल हुसेन आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत बाप-लेकाने एक धक्कादायक खुलासा केला. 47 वर्षीय जमाल हुसैन अहमद रादी आणि त्यांचा 18 वर्षीय मुलगा अब्दुल्ला यांना इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) गाझा पट्टीतून अटक केल्याचे सांगितले जात आहे.

हमासचा सेनानी जमाल हुसैन अहमद रादी पुढे म्हणाला, ‘मी तिला (इस्रायली महिलेला) बंदुकीचा धाक दाखवला आणि नंतर तिला निवस्त्र होण्यास सांगितले. जमाल हुसैन यांनी दावा केला की, इस्त्रायली महिलेवर तिच्यावर बलात्कार केल्यावर तिचे काय झाले ते मला माहीत नाही. इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि महिलांना बसला आहे. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासच्या सैनिकांनी 1200 हून अधिक लोकांना ठार केले.

व्हिडिओमध्ये जमाल आणि अब्दुल्ला ट्रॅक सूट घालून बसले आहेत, तिथे त्यांची चौकशी केली जात आहे. त्याचे हात बांधलेले आहेत आणि समोर इस्रायलचा ध्वज आहे. इस्त्रायलवरील हल्ल्यादरम्यान नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्येही महिलांना लक्ष्य करण्यात आले होते.

80 जणांचे अपहरण

7 ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी 400 लोकसंख्या असलेल्या किबुत्झ नीरमध्ये कहर केला होता. या हल्ल्यात किमान 20 लोक मारले गेले, तर 80 जणांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून गाझा येथे नेले.

Web Title: Israel hamas war father and son duo confess to raping israeli woman and killing her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • Israel Hamas War
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
2

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
3

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
4

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.