Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Binance Crypto Heist : ६अब्ज डॉलरच्या क्रिप्टो चोरीवरून उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा; हॅकिंगचे आरोप फेटाळले

Binance Crypto Heist : बायनान्सवरील ६ अब्ज डॉलरपेक्षा अधिक किमतीच्या क्रिप्टोकरन्सी चोरीप्रकरणी अमेरिकेच्या FBI ने उत्तर कोरियाच्या हॅकर्सवर आरोप केले आहेत. मात्र, किम यो जोंग यांनी हे आरोप फेटाळत अमेरिकेच्या घोषणेला 'क्षुल्लक चिथावणी' संबोधले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 03, 2026 | 08:22 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • बायनान्सवरील सायबर हल्ल्याने क्रिप्टो जगतात खळबळ
  • किम यो जोंग यांच्याकडून अमेरिकेवर जोरदार टीका
  • क्रिप्टो चोरीच्या तपासाकडे जगाचे लक्ष
Binance Crypto Heist : जगातील आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजपैकी एक असलेल्या बायनान्सवरील मोठ्या सायबर चोरीप्रकरणी अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बायनान्समधून ६ अब्ज डॉलरपेक्षा अधिक किमतीची क्रिप्टोकरन्सी चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

जेव्हा या घटनेची माहिती समजली तेव्हा जगभरात एकच खळबळ उडाली आणि चर्चा सुरु झाल्या कि या हल्ल्यामागे कोण आहे .काही काळातच या हल्ल्यामागे उत्तर कोरियाचे हॅकर्स असल्याचा आरोप अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) केला. मात्र, उत्तर कोरियाने हे आरोप फेटाळून लावत अमेरिकेची घोषणा म्हणजे ‘क्षुल्लक चिथावणी’ असल्याचे म्हटले आहे.

बायनान्सवरील सायबर हल्ल्याने क्रिप्टो जगतात खळबळ

बायनान्सने शुक्रवारी झालेल्या सायबर चोरीत ६ अब्ज डॉलरपेक्षा अधिक किमतीची डिजिटल मालमत्ता चोरीला गेल्याचे सांगितले. ही घटना क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चोरींपैकी एक मानली जात आहे. या प्रकरणाचा तपास करताना अमेरिकेच्या FBI ने उत्तर कोरियाशी संबंधित हॅकर्सवर संशय व्यक्त केला. ‘TraderTraitor’ या हॅकिंग गटाने हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यातील एका आरोपीचा चेहरा सुद्धा FBI ने नोटीस काढून जाहीर केला आहे . याच गटाचा मागील वर्षी झालेल्या बायबिट एक्स्चेंजवरील मोठ्या सायबर हल्ल्याशीही संबंध जोडण्यात आला होता.

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक

किम यो जोंग यांच्याकडून अमेरिकेवर जोरदार टीका

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या बहीण किम यो जोंग यांनी अमेरिकेच्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. जगातील कोणत्याही मोठ्या सायबर गुन्ह्याचा संबंध उत्तर कोरियाशी जोडण्याची अमेरिकेची सवय असल्याचा आरोप त्यांनी केला. FBI च्या घोषणेला त्यांनी ‘क्षुल्लक चिथावणी’ आणि ‘बिनबुडाचे वक्तव्य’ असे संबोधले.

अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय समुदायात उत्तर कोरियाबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. या आरोपांमुळे अमेरिकेचा उत्तर कोरियाबद्दलचा शत्रुत्वाचा दृष्टिकोन पुन्हा स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला.

ज्याची भीती होती तेच झालं! इराणवर अमेरिकेचा पुन्हा हल्ला; केशम बेटावर गुप्त कारवाई, ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेने चिंता वाढली

क्रिप्टो चोरीच्या तपासाकडे जगाचे लक्ष

या घटनेनंतर बायनान्सच्या सुरक्षेवर आणि ग्राहकांच्या डिजिटल मालमत्तेच्या संरक्षणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंपनीने चोरीमुळे प्रभावित झालेल्या मालमत्तेतील मोठा हिस्सा स्वतःच्या निधीतून भरून काढण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, उत्तर कोरियाकडून क्रिप्टोकरन्सी चोरी आणि सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून परकीय चलन मिळवले जात असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीही करण्यात आला आहे.

अशा निधीचा वापर देशाच्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी होत असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. मात्र, बायनान्स चोरीप्रकरणी उत्तर कोरियाचा सहभाग असल्याचा अमेरिकेचा आरोप आणि उत्तर कोरियाचा इन्कार यामधील सत्य तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

Web Title: Url slug north korea denies binance crypto heist allegationscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • America news
  • Cryptocurrency
  • Marathi News
  • North Korea

संबंधित बातम्या

Mumbai News : चेंबूरमध्ये होमलेनचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर; मुंबईतील उपस्थिती आणखी मजबूत
1

Mumbai News : चेंबूरमध्ये होमलेनचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर; मुंबईतील उपस्थिती आणखी मजबूत

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक
2

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन
3

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
4

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.