In which countries are Hamas bases located
Israel Hamas War news in Marathi : दोहा : मंगळवारी (०९ सप्टेंबर) कतारची राजधानी दोहावर तीव्र हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलने दोहामधील हमासच्या पॉलिटिकल ब्युरोवर हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये युद्धविरामावर चर्चा करणाऱ्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले होते. सध्या या हल्ल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यामुळे इस्रायलला युद्ध संपवायचे नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच वेळी इस्रायल पुढील हल्ला तुर्कीमध्ये करणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हमासने तुर्कीमध्ये शेवटचा तळ उभारला होता. यामुळे सध्या तुर्कीवर हल्ल्याच्या चर्चा सुरु आहेत.
कतारवर का केला इस्रायलने हल्ला
इस्रायलच्या मते, कतार गेल्या अनेक काळापासून हमासला आश्रय देत आहे. २०२१ मध्ये कतारमध्ये हमासचे मुख्यालयही उभारण्यात आले होते. यापूर्वी हे मुख्यालय सीरियामध्ये होते. कतारने खालिद मशाल आणि खलील अल-हय्यासारख्या हमासच्या वरिष्ठ नेत्यांना देशात आश्रय दिला होता. यामुळे कतार हे मध्यस्थी, कूटनीती आणि निधी उभारण्यासाठी हमासचे केंद्र असल्याचे मानले जाते. यामुळे इस्रायलने कतारमध्ये हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे.
तुर्की ठरू शकते इस्रायलचे पुढील लक्ष्य
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कतारनंतर तुर्की हा देश इस्रायलचा पुढील निशाण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हमासने २०११ मध्ये शेवटचे तळ तुर्कीमध्ये उभारले असल्याचे सांगितले जाते. तुर्कीची राजधानी इस्तांबुल आणि अंकार येथे हमासची ही कार्यालये कार्यरत आहेत. तसेच या ठिकाणी हमासचे अनेक अधिकारी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे विश्लेषकांच्या मते, इस्रायल आता तुर्कीला टारगेट करु शकते.
FAQs (संबंधित प्रश्न)
कुठे कुठे पसरले आहे हमासचे जाळे?
मिळालेल्या माहितीनुसार, हमासचे जाळे तुर्की आणि कतारच्या पलीकडेही आहे. लेबनॉन, इराण, सीरिया, आणि इराकमध्ये हमासचे कॅडर-नेटवर्क आहे. लेबनॉन आणि इराणमध्ये हिजबुल्लाच्या गटांकडून हमासला पाठिंबा मिळतो. तसेच अल्जेरिया, सूडान, यमन आणि सौदी अरेबियात मध्येही हमासचे निधी गोळा करण्यासाठी फंडिग नेटवर्कही उभारण्यात आली आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये का सुरु आहे युद्ध?
०७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. तसेच अनेक इस्रायली लोकांना कैद केले होते. यामुळे इस्रायलने हमासविरोधी युद्ध पुकारले.
In which countries are Hamas bases located
२०२२ृ३ मध्ये सुरु झालेल्या या युद्धात आतापर्यंत १२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. गाझा, लेबनॉन अशा भागांमध्ये हल्ले करण्यात आले आहेत. तसेच अनेक लोकांनाही कैद करण्यात आले आहे.
मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरता! जगाचे लक्ष नेपाळकडे असताना इस्रायलने ‘या’ देशासोबत सुरु केले युद्ध