मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरता! जगाचे लक्ष नेपाळकडे असताना इस्रायलने 'या' देशासोबत सुरु केले युद्ध (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Attack on Doha : दोहा : मंगळवारी (०९ सप्टेंबर) संपूर्ण जगाचे लक्ष नेपाळकडे लागले असताना दुसरीकडे मोठे युद्ध सुरु झाले आहे. इस्रायलने आणखी एका देशासोबत लढाई सुरु केले आहे. इस्रायलने कतारची राजधानी दोहावर हवाई हल्ले केले आहेत. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात हमासला लक्ष करण्यात आले असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हवेत धुराचे काळेलोट पसरलेले दिसत आहे. या हल्ल्याने दोहा हादरला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान इस्रायलने या संदर्भात एक निवेदनही जारी केले आहे. इस्रायलच्या लष्कराने (IDF) जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, हल्ला अगदी अचूक करण्यात आला असून याचा उद्देश हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार करणे होता. इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हमासच्या लक्ष्य करण्यात आलेल्या वरिष्ठ नेत्यांचा इस्रायलवरील ७ ऑक्टेबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यात सहभाग होता. या हल्ल्याचे ते मुख्य सूत्रधार होते. यामुळे हा हल्ला करण्यात आला आहे.
इस्रायलने हल्ल्याच्या ठिकाणाची अद्याप माहिती दिलेली नाही. केवळ कतारच्या दोहा शहरात कारवाई झाल्याची पुष्टी झाली आहे. दरम्यान या हल्ल्याने दोहामधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. नागरिकांनी म्हटले की, त्यांना एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. तसेच त्यानंतर आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसले. पंरतु अद्याप हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
🇮🇱🇶🇦 QATAR STRIKE HITS RESIDENTIAL AREA
Israeli fighter jets hit a target in Doha’s residential zone – home to embassies, civilians, and a Lebanese school.
Source: Channel 13, Al Jazeera
#خسوف_القمر #Israele pic.twitter.com/Vt2oR57O4B— Global Guru (@Uptoguru786) September 9, 2025
इस्रायलच्या सैन्याचे प्रमुख इयाल जमीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोहामधील नागरिकांना आधीच हल्ल्याचा इशारा देण्यात आला होचा. तसेच हमासलाही याचा गंभीर इशारा जारी करण्यात आला होता. इस्रायलने म्हटले होते की, हमासचे सैन्य परदेशात कुठेही लपले असले तरी त्यांना सोडले जाणार नाही.
इस्रायलच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून कतार हे हमासच्या राजकीय नेत्यांचे आश्रयस्थान राहिलेले आहे. इस्रायल आणि हमासच्या संघर्षाच्या काळात कतारने मध्यस्थीची भूमिकाही बजावली होती. यामुळे हा हल्ला केला असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
शिवाय या हल्ल्याच्या एक दिवस आधीच सोमवारी (०८ सप्टेंबर) जेरुसेलमध्ये दहशतवाद्यांनी यहुदी वस्तीवर गोळीबार केला होता. एका बसमध्ये घुसून नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये १५ जखमी तर सहा ठार झाले होते. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इस्रायलने दोहावर हल्ला केला.
कतारकडून हल्ल्याचा निषेध
दरम्यान कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे, इस्रायलच्या या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. मात्र दुसरीकडे इस्रायलचे मंत्री याचे कौतुक करताना दिसत आहे. मात्र यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
इस्रायलने कतारमध्ये कुठे केला हल्ला?
इस्रायलने कतारची राजधानी दोहावर हल्ला केला आहे. दोहामध्ये नेमकं कुठे हल्ला झाला हे अस्पष्ट आहे.
इस्रायलने दोहावर का केला हल्ला?
इस्रायसने हा हल्ला कतारमधील हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार करण्यासाठी केला आहे, कारण इस्रायलवरील ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्याचे हे अधिकारी मुख्य सूत्रधार होते.
इस्रायलच्या हल्ल्यावर कतारने काय प्रतिक्रिया दिली?
दरम्यान कतारने इस्रायलच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला असून या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हणून वर्णन केले आहे.