दहशतवादाला पाठिंबा देतायत ट्रम्प? पहिले तालिबान, मग सीरिया आणि आता हमासशी हातमिळवणी; नेमकं चाललंय काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हमास ओलिसांची सुटका करणार?
दरम्यान ट्रम्प यांनी यावर पत्रकार परिषदेत सांगितले की, वॉशिंग्टन हमाससोबत खूप खोलवर चर्चा करत आहे. आम्ही त्यांना ओलिसांची लगेचच सुटका करण्यास सांगितले आहे, नाहितर परिस्थिती अधिक कठीण होईल आणि धोकादायक बनले असे सांगितले आहे. ट्रम्प यांनी संकेत दिले आहे की, सध्या हमासने काही अटी मांडल्या आहे, ज्या मान्य करण्यासारख्या आहेत. यानंतर ओलिसांची सुटका होईल असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अद्याप या अटींवर कोणताही खुलासा करण्यात आला नाही.
अमेरिकेने दहशतवादाविरोधात कागदोपत्री करारला विरोध केला आहे. परंतु प्रत्यक्षात अमेरिका दहशतवादी गटांशी वाटाघाटी करत आहेत. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, २०२१ मध्ये अमेरिकेने अफगणिस्तानमधून घेतलेली माघार. ही माघार तालिबानसोबतच्या करारामुळे झाली होतील. हा कररा ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात कतारच्या मध्यस्थीने झाला होता.
सध्या हमासकडे ५० इस्रायली ओलिस अजूनही कैदेत आहे. यातील केवळ २० लोक जिवंत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यावेळी २५० हून अधिक इस्रायलींना कैदेत ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर इस्रायलने देखील जोरदार कारवाई करत गाझातील हजारो लोकांना मारले. इस्रायलवर आंतरराष्ट्रीय पातळीवर नरसंरहार आणि युद्धगुन्ह्यांचे आरोपही करण्यात आले आहे, ज्याला इस्रायलने नकार दिला आहे.
ॲस्ट्रोनॉमर कंपनीच्या EX-HR पतीला देणार घटस्फोट; न्यू हॅम्पशायर न्यायालयात याचिका दाखल






