Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट

Benjamin Netanyahu मेजर जनरल रोमन गोफमन यांची मोसादचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. नेतान्याहू यांनी त्यांच्या क्षमतेची प्रशंसा केली असली तरी, विद्यमान प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी या नियुक्तीला तीव्र विरोध केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 13, 2026 | 01:50 PM
israel internal crisis roman gofman appointed mossad chief david barnea protest 2026

israel internal crisis roman gofman appointed mossad chief david barnea protest 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • मोसादमध्ये बंडाची ठिणगी
  • गंभीर आरोप
  • गृहयुद्धाची भीती

Major General Roman Gofman Mossad Chief : जागतिक राजकारणात आपल्या अचूक आणि धडाकेबाज कारवायांसाठी ओळखली जाणारी इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ (Mossad) सध्या अंतर्गत वादाने पेटली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये खळबळ उडाली आहे. मेजर जनरल रोमन गोफमन यांची मोसादचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा नेतान्याहू यांनी १२ एप्रिल रोजी केली. मात्र, या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच इस्रायलच्या लष्करी आणि गुप्तचर वर्तुळातून विरोधाचा सूर उमटू लागला आहे.

नेतान्याहूंची ‘पॉवर गेम’ आणि गोफमन यांची एन्ट्री

सध्याचे मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असून २ जून रोजी रोमन गोफमन ही जबाबदारी स्वीकारतील. नेतान्याहू यांनी गोफमन यांची स्तुती करताना त्यांना “धाडसी आणि सर्जनशील अधिकारी” म्हटले आहे. गोफमन यांनी युद्धकाळात दाखवलेली चतुराई आणि साधनसंपन्नता पाहून ही निवड केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, इस्रायली लष्कराचे (IDF) चीफ ऑफ स्टाफ आयल झमीर यांनीही गोफमन यांच्या निवडीचे समर्थन केले आहे. मात्र, या समर्थनामागे राजकीय हात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peace Talks Fail : शांतता चर्चेमागे मोठा कट! JD Vance ना नेतान्याहूंचा फोन अन् चर्चा फिसकटली; इस्लामाबादमध्ये नक्की काय घडले?

विद्यमान प्रमुख डेव्हिड बार्निया यांचे खळबळजनक आरोप

या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत मोसादचे विद्यमान प्रमुख डेव्हिड बार्निया. बार्निया यांनी केवळ गोफमन यांच्या नियुक्तीला विरोधच केला नाही, तर त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. “गोफमन हे आपल्या अधिकारांचा गैरवापर करू शकतात, त्यांचे व्यक्तिमत्त्व या पदासाठी योग्य नाही,” असे विधान बार्निया यांनी केले आहे. जेव्हा एखाद्या गुप्तचर संस्थेचा विद्यमान प्रमुख आपल्याच उत्तराधिकाऱ्यावर असे आरोप करतो, तेव्हा त्या देशाची सुरक्षा व्यवस्था किती खिळखिळी झाली आहे, याचे दर्शन जगाला घडते.

The advisory committee on senior appointments chaired by retired Supreme Court President Asher Grunis has approved this evening, Maj.-Gen. Roman Gofman as Director of the Mossad. 1/2 — Prime Minister of Israel (@IsraeliPM) April 12, 2026

credit – social media and Twitter

इस्रायलमध्ये जनआक्रोश: “ही नियुक्ती रद्द करा!”

केवळ मोसादमध्येच नव्हे, तर इस्रायलच्या रस्त्यावरही आता या नियुक्तीविरोधात लोक उतरले आहेत. इस्रायली टीकाकार आणि राजकीय विश्लेषकांनी याला इस्रायलच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा अंतर्गत धोका म्हटले आहे. एल्माकायेस यांसारख्या प्रभावशाली व्यक्तींनी या नियुक्तीविरोधात न्यायालयीन किंवा कायदेशीर लढा देण्याची तयारी दर्शवली आहे. ही नियुक्ती केवळ राजकीय सोयीसाठी केली गेली असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात असून, यामुळे इस्रायली लष्करात आणि मोसादमध्ये दोन तट पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Price Hike: ‘पेट्रोलच्या किमती विसरू नका!’ ट्रम्प यांच्या नाकेबंदीला इराणचे ‘गणितीय’ उत्तर; अमेरिकेला रडवणारं समीकरण VIRAL

गृहयुद्ध की लष्करी उठाव?

तज्ज्ञांच्या मते, जर मोसाद आणि इस्रायली लष्कर (IDF) यांच्यात असाच वाद कायम राहिला, तर इस्रायलला गृहयुद्धासारख्या (Civil War) परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. शत्रू राष्ट्रांशी लढत असताना अंतर्गत कलह वाढणे हे कोणत्याही देशासाठी विनाशकारी असते. नेतान्याहू यांनी घेतलेला हा निर्णय मोसादला अधिक शक्तिशाली बनवणार की ती आतून पोखरली जाणार? हा प्रश्न आता जगभरातील संरक्षण तज्ज्ञांना पडला आहे. २ जून पर्यंत या वादाला कोणते वळण लागते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोसादचे नवे प्रमुख कोण असणार आहेत?

    Ans: मेजर जनरल रोमन गोफमन यांची पंतप्रधान नेतान्याहू यांनी मोसादचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली असून ते २ जून रोजी कार्यभार स्वीकारतील.

  • Que: विद्यमान प्रमुख डेव्हिड बार्निया यांचा विरोध का आहे?

    Ans: बार्निया यांचा आरोप आहे की रोमन गोफमन आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करू शकतात, ज्यामुळे मोसादच्या स्वायत्ततेला धोका पोहोचू शकतो.

  • Que: या नियुक्तीमुळे इस्रायलमध्ये तणाव का वाढला आहे?

    Ans: गुप्तचर संस्था आणि लष्कर यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे देशाच्या सुरक्षेवर परिणाम होण्याची भीती असल्याने इस्रायलमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत.

Web Title: Israel internal crisis roman gofman appointed mossad chief david barnea protest 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • World War 3

संबंधित बातम्या

UN Blacklist : दहशतवादी संघटनांच्या यादीत रशिया-इस्रायल? UN च्या ‘या’ निर्णयाने जग हादरलं
1

UN Blacklist : दहशतवादी संघटनांच्या यादीत रशिया-इस्रायल? UN च्या ‘या’ निर्णयाने जग हादरलं

Gaza Crisis : ‘भारत सर्वात मोठा समर्थक’,गाझा युद्धादरम्यान बेंजामिन नेतान्याहूंचे मोठे वक्तव्य; 70% लष्करी नियंत्रणाचे दिले आदेश
2

Gaza Crisis : ‘भारत सर्वात मोठा समर्थक’,गाझा युद्धादरम्यान बेंजामिन नेतान्याहूंचे मोठे वक्तव्य; 70% लष्करी नियंत्रणाचे दिले आदेश

Abraham Accords: ‘इस्रायलला पाठिंबा दिला तर गाडून टाकू!’ Lashkar e Taibaची पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुखांना थेट धमकी
3

Abraham Accords: ‘इस्रायलला पाठिंबा दिला तर गाडून टाकू!’ Lashkar e Taibaची पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुखांना थेट धमकी

Eid al-Adha : इस्रायलच्या Eid al-Adha च्या शुभेच्छांवर इराणची टीका; म्हणाला, ‘कसाईसुद्धा…’
4

Eid al-Adha : इस्रायलच्या Eid al-Adha च्या शुभेच्छांवर इराणची टीका; म्हणाला, ‘कसाईसुद्धा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.